कट्‍टा- असा नात्यांचा

Submitted by bnlele on 7 November, 2011 - 22:01

कट्‍टा- असा नात्यांचा

नोकरी निमित्त दिल्ली सारख्या महानगरात अठ्ठावीस वर्ष वास्तव्याला होतो. ती युगांसारखी वाटली तरी

आम्ही दांपत्य, पांडुरंग-रखुमाई नव्हतो.मुलांच्या संगोपनात मग्न असे संसारी होतो.सरकारी कामानिमित्त

मी महिन्यातून १०-१५ दिवस भारतात वेगवेगळ्या राज्यांत अधिकारी प्रशिक्षण सत्रांचं संचालना साठी जात

असे. त्यामुळे एका अर्थी सौ. एका विटेवर बहुतांशी तो डोलारा सांभाळून होती.

माझी निवृत्ति दृष्टिक्षेपात येता अनपेक्षित वादळ आलं.एव्हाना, मुलगी सासरी गेलेली आणि मोठ्या

मुलाचं लग्न होऊन तो ही परदेशी जाण्याच निश्चित झालं होतं.त्याचं तिथेच स्थाईक होण्याचं स्वप्न होतं.

धाकटा ईंजिनियर झालेला स्थानिक एका कंपनीत रुजू झाला होता. सौ पुण्याच्या फर्ग्यूसन मधून बीएऑनर्स

म्हणून पुण्यात स्थाईक होण्याचा हट्ट- हा वादळी विचार चर्चेला आला.

"गरज म्हणून दिल्लीच्या पिंजर्‍यात आजवर कुचंबणा सहन करून राहिले तुमचा संसार सांभाळून.

उरलेलं आयुष्य पुण्यनगरीच्या सांस्कृतिक विश्वात हवंय. आणि म्हणून पुण्यात फ्लॅट घेऊन तिथेच स्थाईक

व्हायचय मला". मी तर जन्म्जात मध्यप्रदेशातला-- राहतं घर,आई-वडील, भाऊ-बहीण कोणीच तिथे उरले नव्हते. पण

तरूण वयात जगलेल्या कर्म-भूमीचं आकर्षण आधीपासून मनांत होतं.

पुणे शहराचा अगदी बालपणीचा उनाळ्याच्या सुट्टीत आणि नोकरीत असता दौर्‍या निमित्त भेटी इतकाच त्रोटक परिचय.

मुलांना आईचा पुळका स्वाभाविक. तीन विरुद्ध एक-मी.! 'अजून अवकाश आहे- बघू काय ते नंतर कधी' असं म्हणून

मी वेळ मारून नेली. पण वादळ शांत झालं नव्हतच. सुनेचं पहिल बाळंतपण व्हायचं होतं आणि त्यासाठी तरी तूर्त इतर

कुठे न जाणं बरं अस म्हणता क्षणि--सून आणि मुलाचा एक स्वरात घॊष- "ते, आम्ही जाणार त्या ठिकाणी जास्त सोईचं नक्की.

वैद्यकीय सोई तर आहेच आणि खर्च कंपनीचा. तुम्ही पुण्यात फ्लॅटचं तेवढं पहा. लाथ मारीन तिथे पाणी काढीन

म्हणता नं नेहमी? पैजेवर करून दाखवा"

चार दिवसांनी मुलानी गोवाएक्सप्रेसचं तिकिट काढलं आणि ते सौ नी मला देताना म्हणली- "दौर्‍यासाठी जशी

तुमची सूटकेस भरत असे तशी आजही सज्ज केली आहे.आणि हो, तिथे माझे दोन भाऊ आहेत नं त्यांच्या जवळपासच

बघा. दोन खोल्यांचा पुरेसा होईल आपल्याला. आल्यागेल्यासाठी एक खोली असावी म्हणून. अजून एक- फायनल करण्यापूर्वी

फोन करा मी येईन,बघीन मगच ओक्के करायचं"

निरुपाय म्हणून आलो आणि आठच दिवसात बिल्डरशी बोललो. कारण त्यांचा प्लान सौ नी सांगितलेल्या

सर्व निकशांना अनुकुल होता. बांधकामाला सुरवात व्हायला लागणारा वेळ मला सुखावह दिसला-- हो,म्हणजे, वर्ष-दोन वर्ष अजून वेळ होता तर!!

आजमितिला पंधरा वर्ष झाली पुण्यात येऊन.

दुसर्‍या मजल्यावर रूंद रस्त्याला लागून असलेली जागा. बजबजाटा पासून दूर पण रोजच्या गरजांच्या सोईं उपलब्ध अशी आहे.

तीन, मजली चार इमारतींचे हे संकुल. रस्त्यापलिकडे त्याच बिल्डरनी विकलेले/बांधलेले बंगलोप्लॉट आणि रोहाउसेस. रस्त्याला समांतर

आमच्या हॉल आणि एका खोलीला सहा Xचारची खिडकी आहे. दुतर्फा झाडी बांधकामाच्या सुरवातीलाच लावल्यामुळे छान वृक्ष झालेत.

आमच्या इमारतीच्या समोरच्या भागात पारंब्यांनी सजलेलं रबराचं झाड, आणि त्या शेजारी विरळ फांद्या-पानांच्या वृक्षाला बांधलेला कट्टा

आणि बाक आहे.

सुरवातीला सकाळी मुलामुलींच्या शाळांची वाहनं येणार म्हणून त्यांच्या आया बस किंवा रिक्षा मुलांना घेऊन जाईस्तोवर

कट्ट्यावर थांबायच्या. घर कामांची आठवण त्यांना लवकर आटोपते घ्या म्हणायची. मग संध्याकाळ पर्यंत शुकशुकाटच.चुकुन, कोणी भाजीवाला

आणि जवळच्य्या कॉलेजातील कुणी विद्यार्थी थोडावेळ, श्रम परिहार किंवा पुस्तक/नोट्स आदानप्रदानापुरता वापरायचे.

संध्याकाळ व्हायला येताच सोसायटीतले जेष्ठ तिथे येऊन बसायचे. ठराविक जागी. बसले तरी आपसात संवाद कमीच. एकमेकांचे हालहवाल,विचारपूस

इतकंच. नाही म्हणायला आवारातल्या दोन कुत्र्या शेपटी हलवत आल्या कि एक जेष्ठ, लाडिक नांवांनी त्यांना गॊंजारून पायाशी बसवून कौतुक करायचे.

एरवी सर्व दृष्टि शून्यात किंवा मध्य रस्त्यात खेळणार्‍या मुलांवर रोखून, येणार्‍या-जाणार्‍या वाहनां पासून सावध करण्याच्या हेतूने खेकसायचे.

हिंवाळ्यात, डोक्यावर घोंगावणार्‍या डासांच्या सैन्याचा नायनाट करण्यासाठी खिशात लाइटर किंवा आगपेटीच आणायचे;जवळपास पडलेला पाचोळा

मुलांकडून गोळा करवायचा आणि दिमाखात पेटवायचा. मुलांनापण कोलत्या खेळायची हौस होतीच. काही मुलं त्या उद्देशानी गरून येताना चड्डीच्या

खिश्यात वर्तमानपत्राचे कपटे कोंबून आणयची.

मी क्वचितच जाऊन बसत असे. खिडकीत दिसलो कि हाका मारून कुणी बोलवायचे.त्यांचा अनादर टाळण्यापुरता गेलो तर काही

निमित्त काढून तिथून बाहेर पडत असे.

सुरवातीला, घर कामातून थोडा वेळ काढून, बायकांचा घोळका, कधी भाजी घेऊन येताना, किंवा, कुणाला औषधाची आठवण द्यायला

यायच्या. नंतर त्यांच्या पैकी काही गप्पा मारायला येऊ लागल्या. तेंव्हा मात्र एरवी मौन पाळणारे बोलके व्हायचे ! गंमत सांगू? कुंटणखान्यावरच्या धाडींचं

वर्णन ऎकताना, नेहमी काठीचा आधार घेऊन सुद्धा लटलट्णारे एक जेष्ठ, ताठर डोळे ,ताठ मान, आणि कान टवकारून ऎकायचे !

गेल्या पाच सात वर्षात चित्र पार बदलून गेल आहे. एकामागून एक स्वर्गीय कट्ट्यावर विराजमान झाले. हमरस्त्याचं रुंदी करण रॆगाळल्यामुळे

आमच्या समोरच्या रस्त्यावर वर्दळ इतकी वाढली कि पलिकडे जायला खूप वाट पाहावी लागते. शाळेच्या मुलांची ने-आण शाळांच्या बसनेच.

कट्ट्याची संस्कृति पार बदलून गेलीये. रात्री-अपरात्री प्रेमींची बैठक दिसते.गळ्यात रुमाल बांधलेले सामाजिक सांड स्वैर फिरताना सुद्धा कधी दिसतात.

रात्रीच्या वॉचमनची निष्प्रभ आरोळी- शिट्टी, दांडूचा मरगळलेला आवाज त्यांना घाबरलेला वाटतो !

मन रमेना म्हणून वाटलं दुसरीकडे जिवंत असा कट्टा पाहावा. हमरस्त्यावरून लांब कुठे जायची संधी बँकेत किंवा मॉल मधे भाजीपाला आणायचा

असला अथवा एखाद्या मित्राला गाठायच झालं तर. रिक्षा किंवा बसनी गेलं तर फारसं काही नजरेला नाहीच पडत.ठासून गर्दी आणि पाकिटाची काळजी !

म्हणुन पाईच झेपेल इतकं जायचं ठरवलं.त्यात मोठठा अडथळा रहदारीचा.घरातून मुख्य रस्ता आला कि उजव्या हातानीच चालायच. एक तर रुंदीकरण

रेंगाळल्यामुळे अरुंद झालेला आणि कट्टा शोध , तो ही जिवंत असलेला म्हणजे संध्याकाळीच शक्य. भरधाव गाड्यांचे प्रखर झोत माझ्या मोतीबिंदूचे

वैरी.रस्ता क्रॉस करणं दुरापास्त. आपुले मरण दिसते आपुल्या डोळा ! उजवं जायचं आणि तसच परतायचं हेच सुरक्षा-नियमात बसतं. असो.

हमरस्त्यावर अडथळ्यांची दौड - नव्हे, धडपड-चालीने अदमासे दोन किलोमीटर संध्याकाळी पांच ते सात वाजे पर्यंत गेलो. शोध घेतला .मधेमधे थांबून थांबून.

पलिकडच्या बाजूचे बघायची संधी फारच कमी. जाम झाल्यामुळे रहदारी थांबली कि गाड्यांच्या मधल्या फटीं मधून थोडं काय दिसेल तेव्हढं ! बेशिस्त कोणच्या थराला

गेली आहे लक्षात यायला वेळ लागलाच नाही.जाण्या-परतण्याची घाई काय शिगेला पोहोचली आहे ! बापरे !

एक बँक आहे उजव्याच हाताला; त्या इमारतीच्या आवाराची कुंपण भिंत दोन-तीन फूट ऊंच अगदी फुटपाथला लागून. तिथे बरेच जेष्ठ ओळीने बसलेले पाहिले अ‌न कट्टा

सापडल्याचा अपूर्व आनंद झाला. सुदैवानी अनोळखींशी ओळख करण्याची माझी हातोटी आहे. म्हटलं चालवावं आपलं शस्त्र. लाईनीच्या एका टोकाला डावीकडून उजवीकडे

भारतीय भाषांच्या नियमानुसार ओळीनी परिचय-विचारपूस सदरात करावी. सगळे पंचात्तरी ओलांडून होते. वेष घरगुती, पायात सपाता, कुणा जवळ पिळदार-नक्षिची काठी.बोलत कुणीच नव्हते.

उठून दिसणारी एक मूर्ती- पँट-कोट,गळ्यात मफलर, डोक्याला रंगीत टोपी आणि पायात चप्पल. ही आगळी मूर्ती खोकत होती अगदी उबळ लागल्या सारखी.

ओळीत पहिले दिसले ते थोडे बोलके असावे. त्यांनाच विचारलं - रोज येता कां याच वेळी? काय मिळालं असेल उत्तर मला? म्हणले आमच्या या ओळीत शेवटाला बघा बसायला जागा असली तर. उगीच छेडू नका ! अजून कुणाला काही विचारायचा धीरच झाला नाही. तेव्हढ्यात ते खोकणारे गृहस्थच मान थोडी वर करून म्हणले - उद्या मी इथे येणार नाहीए.

या माझ्या जागी बसू शकाल ! उद्या, घरी नातवाचा वाढदिवस आहे. घरीच इथल्यासारखी वर्दळ असणर. विनाकारण चालून कशाला यावं म्हणून

अंधार गड्डद होत होता आणि गारवा पण वाढता होता. परतीची वाट कठीण होणार या धास्तीने बंरssय़ ! एव्हढच म्हणलॊ.

वाटतं तो कट्टा आपला म्हणत नाही मला, कां?

कट्ट्याचं नातं आणि नाताचा कट्टा दोन्ही हरपल्याची खंत . अथांग नात्याचा निष्फळ थांग घेतानाच दिसतं.

असं वाटत कि नात ना त्यांचं आणि कट्ट्याचं,

अथांग नातं, माझं आणि कट्ट्याचं !

गुलमोहर: