हातपंप

Submitted by पाषाणभेद on 7 November, 2011 - 08:20

हातपंप
ह्या दुष्काळानं लई ताण दिला ग बया
मला हातपंपाचा आधार हाय ग बया ||धृ||

घरचा नळ नाय कामाचा
सार्वजनीक हाय नळ गर्दीचा
वाही रातंदिस पानकाळ्याचा
त्याला उन्हाळ्यात पानी काही येईना ग बया
मला हातपंपानं आधार दिला ग बया ||१||

खालीवर दांडा करावा बरं
थोडं कष्टांचं काम हाय सारं
पानी येतंयं हापसून न्यारं
बाकी ठिकाणी माझी घागर रिकामी र्‍हाती ग बया
मला हातपंपानं पानी दिलं ग बया ||२||

सार्‍या बायांनी याची चव घेतली
एकजात सार्‍यांनी पसंती दिली
हंडेगुंडेकळशांची रांग मोठी लागली
त्यांनी हातपंपाचा ताबा घेतला ग बया
मला हातपंपानं पानी दिलं ग बया ||३||

- पाषाणभेद
०७/११/२०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आज सकाळीच शोधत होतो की दगडफोडयाची कविता अजुन कशी आली नाही.
तर समोर कविता हजर!
गावरान तडका ! छान!