तळजाई वरील निसर्ग

Submitted by प्रिति १ on 31 October, 2011 - 12:51

रविवारी सकाळी तळ्जाई पठारावर फिरायला गेलो होतो. तेंव्हा काढलेले काही फोटो टाकत आहे.
PA290241.JPGPA290242.JPGPA290248.JPGPA290250.JPGPA290252.JPGPA290253.JPGPA290254.JPGPA290253.JPGPA290254.JPGPA290256.JPGPA290257.JPGPA290259.JPGPA290262.JPGPA290265.JPGPA290267.JPGPA290271.JPGPA290272.JPGPA290272.JPGPA290277.JPGPA290281.JPGPA290287.JPGPA290290.JPGPA290294.JPGPA290299.JPGPA290300.JPGPA290302.JPGPA290303.JPGPA290304.JPGPA290305.JPGPA290306.JPGPA290307.JPG

गुलमोहर: 

राग येणार नसेल तर एक सांगू का...
हललेले किंवा खराब आलेले फोटो काढता आले तर पहा...
कारण त्यामुळे चांगले फोटो असले तरी ते पटकन नोटीस होत नाहीत...
१०-१२ फोटो तरी तसे आहेत...सरसकट हातात असलेले फोटो प्रकाशित करण्याऐवजी निवडकच केले तर त्याने जास्त परिणास साधता येऊ शकतो....

<<<<राग येणार नसेल तर एक सांगू का...>>>>
आशुचँप, राग कसला? चुका कळल्या तरच सुधारणा होतील ना? धन्स! काही फोटो डिलीट केलेत.....

आपल्या पुण्यातीलच तळजाई हे एक सुंदर ठिकाण आहे. सहकारनगर च्या पुढे आणि अरण्येश्वर जवळ आहे.

आपल्याला हवे असेल तर खालुनच सुंदर रस्त्याने चढ्त वरती जाता येते. वेळ नसेल तर गाडी हाफ वे पर्यन्त

नेउन जाउ शकत्तो. वरती तळ्जाई देवीचे मस्त मदीर आहे. भरपुर झाडी आणी फीरायला खुप परीसर आहे.

खुप लोक रोज पहाटे फीरायला नेमाने जातात..

प्रिति १, मोर दिसले का तुम्हाला?

जिप्सी, सिंहगड रोड वरून सुद्धा जाता येते. सकाळच्या वेळेस मस्त वाटते.

स्वाती, मला मोराचे आवाज ऐकु येत होते. पण बघायला मिळाला नाही. कधी कधी मोर दिसतात पण. Happy

तो सर्व परिसरच इतका छान आहे कि रोज गेले तर किती मस्त वाटले असते असे वाटत राहते... झाडी पण

खुप घनदाट आहे. त्यामुळे मस्त फेरफटका होतो पहाटेचा...

जिप्स्या - माझ्या घराच्या मागेच आहे तळजाई...या टेकडीच्या पलिकडच्या बाजूने डांबरी रस्ता आणि बाकी सुधारणा केल्या आहेत त्यामुळे बर्यापैकी वर्दळ असते..पण सिंहगड रोड साईडने गेलो तर अगदी मस्त झाडीतून वाट जाते...माझे आख्खे बालपण या तळजाईच्या डोंगरावर फिरण्यात गेले आहे..तेव्हा तर नीरव शांतता असायची...मोर तर कित्येक वेळेस पाहिलेच आहेत. पण कितीतरी पक्षी, साप, सरडे भरपूर...
तु येच रे एकदा...

सिंहगड रोडवरून हिंगण्यातून एक मेन रोड डायरेक्ट कॅनॉलपर्यंत जातो...त्या कॅनॉलना पार केल्यानंतर एक पायवाट समोरच दिसणार्या डोंगरावर चढते..त्या दमछाक करणार्या चढणीनंतर चांगला लांबरुंद असा कच्चा रस्ता लागतो...त्यानंतर पुन्हा थोडी चढण आणि आपण तळजाई मंदिरात जाऊन ठेपतो