वाढदिवसासाठी केक कसा तयार करायचा ?

Submitted by अतरंगी on 30 October, 2011 - 09:02

मला वाढदिवसासाठी केक तयार करायचा आहे साधारण ५ ते ७ लोकांना पुरेल असा
शक्यतो चॉकलेट नाहि तर स्र्टॉबेरी हवा आहे.
कोणी सांगु शकेल का?
मी http://www.maayboli.com/node/2548/by_subject/14/629 येथे सगळ्या पाककृती वाचल्या पण एक दोनच मला करता येण्या सारख्या आहेत. मला जरा सोप्या, शक्यतो (स्वयंपाकघरात) नवखा माणुस पण तयार करु शकेल अशी पाककृती हवी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद साधना,

सेल्फ रेसिंग फ्लार,आयसिंग शुगर >>>>> म्हणजे काय ? कुठे मिळेल ? वाण्याच्या दुकानात मिळते का ?

आता हे फ्लार हलके हलके वरच्या बटर-अंडे मिश्रणात 'फोल्ड' करा.>>>> म्हणजे नक्की कसे ?

हि सगळी प्रमाणे अशीच्या अशी वापरली तर ५ ते ७ लोकांसाठी केक होइल का ?

मी अगदीच अज्ञान आहे हो या बाबतीत. अशीच एखादी सोप्पी पाकक्रिया वाचुन trial & error करणार आहे. मी ज्या बाकिच्या वाचल्या त्यातल्या त्यात हि जरा सोप्पी वाटते आहे.

मी सामन्यता: स्वयंपाक घराच्या वाटेला जात नाही. बायकोच्या वाढदिवसाला तिला सरप्राईझ म्हणून स्वता: ने तयार केलेला केक द्यायचे ठरविले आहे, त्यासाठी हा सगळा उपद्व्याप Happy

http://www.maayboli.com/node/18701 सांगितलेले प्रमाण व्यवस्थित वापरले तर हा केक अतिशय उत्तम होतो. बिघडत नाही.
अर्थात ह्यात तुम्ही सांगितलेले चॉकलेट नाहि तर स्र्टॉबेरी हे नाहीये. पण कुठला नाही जमला तर हा करण्याचा विचार करुन शकता. सामान वाण्याच्या दुकानात मिळू शकत.

सेल्फ रेझिंफ फ्लोर दुकानात मिळते. नाही मिळाले तर ३/४ कप ऑल परपझ फ्लोर( मैदा) + १ टीस्पुन बेकिंग पावडर+ १/४ टीस्पून मीठ चाळून घ्या. आयसिंग शुगर दुकानात मिळेल.
फोल्ड करणे - http://www.youtube.com/watch?v=es8mbiMF5MQ

रेडीमेड केक मिक्स आणि आयसिंग वापरुन झटपट केक करता येतो.

धन्यवाद अनु आणि स्वाती

ऑल परपझ फ्लोर म्हणजे मैदा होय....
दोन चार ठिकाणी वाचलं पण कळालंच नाही, आत्ता कळालं

वरच्या पाकक्रिया अगदीच नाही जमल्या तर रेडिमेड्च्या वाट्याला जावं म्हणतो.
ओव्हन मधे ठेवताना सिरॅमिक च्या भांड्यामधे केक बनवता येतो का ? का अ‍ॅल्युमिनियम च भांडच लागेल ?

जर तुम्हाला केकवर आयसिंग करायचे असेल तर केक साधारण २४ तास आधी फ्रीझरमधे ठेवायचा. असे केल्याने हवा तसा शेप द्यायला व आयसिंगचा थर केकवर नीट बसायला मदत होते.
रेडिमेड केक मिक्स आणुन त्यात चोको चीप्स , फळांचे तुकडे टाकुन पट्कन होईल.

माझ्याकडे एक बिस्कीट केक ची कृती आहे, एकदम सोपी

१ hide n seek चा पुडा (18 rs वाला)
१ parle चा पुडा ( 5 rs वाला)
1 कप दुध
५ चमचे साखर
१ eno

आधी बिस्कीटचे दोन्ही पुडे मिक्सर मधुन बारीक करुन घ्या. मग दुधात साखर घालुन ते बिस्कीट पावडर मध्ये हळूहळू मिक्स करा. एकदम पातळ मिश्रण करु नका. सर्वात शेवटी त्यात eno मिक्स करा. मग केक च्या भांड्याला तुप लावुन त्यावर थोडेसे गव्हचे पिठ किंवा मैदा टाकुन त्यात हे मिश्रण टाकुन बेक करा.

माझ्याकडे ओव्हन नाहिये त्यामुळे ति setting महित नाहि, मि कुकर मध्ये करते

बायकोच्या वाढदिवसाला तिला सरप्राईझ म्हणून स्वता: ने तयार केलेला केक द्यायचे ठरविले आहे, त्यासाठी हा सगळा उपद्व्याप >>> यासाठी तुम्हाला १०० मार्क्स आणि त्या पोस्टला +१

अभिजीत, इथे मायबोलीवर एक सोपा केक आहे. अंडी न घालता (सोडा घालून) तो अवश्य करा. एकदम्सोपा आहे. आणि बिघडायची शक्यता फार कमी. त्यातच थोडेसे कोको पावडर घातले तर चॉकोलेट केक होतो.

@ शुभांगी हेमंत, ४० मिनीट् तरि लागतात. अधि कुकर गरम करुन घ्यायचा अनि केक ठेवल्यावर मिडियम वर ठेवायचा. केक झाल्यावर वास येतो, किंवा ३५ मिनीट् नंतर टेस्ट करुन बघा सुरी किवा टुथपिक वापरुन

अवंतिका,

ह्याच्यावर आयसिंग करता येते का ? हा केक जास्त मोठा होत नसेल नाही? ह्यात सुका मेवा वगैरे टाकुन अजुन विविधता आणता येइल का ?

नंदिनी,
http://www.maayboli.com/node/12486
याबद्दल बोलत आहात का ?

कोको पावडर दुकानात मिळते का ? म्हणजे दुकानात गेलं आणि कोको पावडर मागितली कि लगेच मिळते ?

(कोको पावडर नाही मिळाली तर बोर्नव्हिटा वापरुन बघु का ? Happy )

सगळ्यांना धन्यवाद, पहिल्यांदा केक करताना हमखास होणार्‍या चुका सांगितल्यातर मला अजुन थोडे मार्गदर्शन मिळेल.

नाही अभिजीत. आता सापडली ही रेसिपी/ हाच केक मिरींडा किंवा तत्सम कोल्ड्रिंक वापरून मस्त होतो.

कोको पावडर बर्‍याच दुकानात मिळते. तुम्ही कुठला केक बनवायचा ते आधी ठरवा. मग सामानाची लिस्ट करा. मोअर/बोग बझार्/डीमर्ट वगैरे ठिकाणी जाऊन सामान घेऊन या, तिथे मिळालेच नाही विचारा इथले जाणकार एकसोएक पर्यायी पदारर्थ सुचवू शकतात. अशा ठिकाणी बरेच सामान मिळून जाते. शंभर दुकाने फिरावी लागत नाही.

या वरच्या रेसिपीमधला केक मी बनवते तेव्हा एकदाही बिघडलेला नाही. (हा एकच केक आहे जो अजून माझ्या हातून बिघडलेला नाही) त्यामुळे बिन्धास्त बनवा.

त्या पाकक्रिये खालीन केकचा जो फोटो आहे तसं रंगकाम कसं करायचं ? ह्यालाच आयसिंग म्हणतात ना ?

बेसिक बटर आयसिंग:

१२५ ग्रॅम सॉफ्ट अनसॉल्टेड बटर,
१+१/२ कप आयसिंग शुगर,
१ चमचा दुध/पाणी >>>>>>>>>>>

हे असं करुन त्यामधे खाण्याचे रंग टाकले कि होइल ना केक वरचं रंगकाम तयार?

तुम्ही पिल्सबरीचा रेडी टु कुक केक का आणत नाही.
मायक्रोवेव असेल तर १० मिनीटांत लय भा री केक होतो.
दोन तीन आयसिंगच्या कल्पना असतात.
अगदीच काही सुचलं नाही तर कपभर साय साखर घालून खूप फेटा आणि गार केलेल्या केकवर पसरा.
मग वर किसणीने १० रु चे डेअरी मिल्क किसून पसरवा.

http://www.expresshospitality.com/20031215/equipmart04.shtml

पिल्सबरी ची वेबसाइट पाहिली, घाईघाईत पाहिल्या मुळे काही कळालं नाही,
घरी जाउन निवांत पहातो.

या बीबी मुळे अनेक पर्याय कळाले. एक दोन दिवसामधे निवांत वेळ काढुन हे सगळे प्रयत्न करतो.

अभिजीत, तुमच्या प्रतिक्रियांवरुन तुम्हाला केकमधले फारसे काही कळत नाही असे वाटते. लाजोने अतिशय छान टिप्स दिल्यात केकसाठी (http://www.maayboli.com/node/17974) या वाचा. खुप मदत होईल. शिवाय मधुन मधुन 'आहारशास्त्र नी पाककृती' या गृपवर येत जा. थोड्याच दिवसात केकच काय इतरही पदार्थ जमु लागतील Happy

अभिजीत, तुमच्या प्रतिक्रियांवरुन तुम्हाला केकमधले फारसे काही कळत नाही असे वाटते. >>>>>>>>>>>>
फारसे काय, काहीच कळत नाही Happy
पण आता शिकायचं आहे.

तुम्हा सर्वांच्या अमुल्य मार्गदर्शना मुळे मी एक छानसा (खाता येण्या सारखा) केक बनवु शकलो.

केक अगदी म्हणजे अगदीच छान झाला. सगळ्याना आवडला, आणि माझा पहिलाच प्रयत्न असल्याने थोडं साखरेचं प्रमाण जास्त असलेला तो केक सगळ्यानी गोड मानून खाल्ला..... Happy

सर्वांना धन्यवाद.

अश्विनी,
पोळ्या शिकायची गरज वाटत नाही, जवळच रिलायन्स मार्ट आहे, तिथे रेडी टू कूक पराठे मिळतात.... तेच आणायचे.... Happy

सुरुची, बायको जाम खुष झाली होती..... Happy आता पुढच्या वाढदिवसाला, चॉकलेट्स बनविणार आहे.... ते शिकायला सुरुवात करेन एक दोन महिन्यामधे...... Happy