don't judge me! एक आत्मचिंतन

Submitted by हृषिकेश_देशपांडे on 27 October, 2011 - 23:20

don't judge me!.. खरंच मराठीत असा वाक्प्रचार प्रचलीतच नाही! का नाही? कारण कदाचित एखाद्या चांगल्या वाईट गुणावरून कुणाला judge करणे हा आपला स्थायीभावच असावा. आपल्या दैनंदिन जीवनात आपण कित्येकांना judge केलं असेल. तुकारामांनी "तोची साधू ओळखावा...देव तेथेची जाणावा" आणि समर्थांनी सुद्धा ".. तो य्येक मूर्ख " वगैरे सांगून लोकांना judge च नाही का केले?

अमेरिकन लोकांना त्यांच्या वर्तणुकीवरून judge केलेले आवडत नाही. त्या लोकांचा स्वाभिमान अथवा अहंकार त्यांना ती judgement स्वीकारू देत नसेल. याचा अर्थ असाही नाही का होत की कुणी चांगुलपणाने वागला तरी सुद्धा आपण judge करू शकत नाही? हे judgement नेहमी फक्त वाईट मुल्यांकानासाठीच का ग्राह्य धरलं जातं? don't judge me! म्हणणारा व्यक्ती कुणी त्याची प्रशंसा केली तर का म्हणत नाही? कदाचित त्यांचा तो स्थायीभाव नसेलही पण याचा अर्थ असा नव्हे की ते गुणावगुण त्यांच्यात नाहीच. don't judge me! म्हणणे कदाचित "living in denial" तर नसेल?

आजच्या युगात एखाद्या व्यक्तीत फक्त साधूची किंवा मूर्खाची लक्षणे असतील असं मला वाटत नाही. कोणाही व्यक्तीत काही ना काही गुणावगुण हे असतातच. काहींचे कधी अवगुण दिसतात तर काहींचे सद्गुण! अशा लोकांना "तोची साधू ओळखावा किंवा तो य्येक मूर्ख " म्हणून कसं चालेल? अहो वाल्मिकी ऋषीसुद्धा पहिले वाल्या कोळी होताच ना! कित्येकदा घरातल्या मोठ्यांकडून तुम्ही ऐकलं असेल की मांस खाल्लं की तमोगुण वाढतो, कारण त्या प्राण्याच्या मरण यातना त्यातून आपल्या अन्नात शिरतात आणि कृरभावना वाढते. याचा अर्थ असा का की सर्व मांसभक्षी लोक तमोगुणीच असतात? माझ्या थोड्याफार अनुभवातून मी कित्येक सात्विक मांसभक्षी आणि कित्येक तामसी वृत्तीचे शुद्ध शाखाहारी बघितले असतील. अर्थात हे माझं त्यांचा बाबतीतलं judgement च म्हणावं लागेल पण सगळ्यांना त्यांच्या आहारावरून एकजात judge करणे कदाचित आततायी ठरेल.

आयुष्यभर साचत आलेले पूर्वग्रह आपल्याला judge करायला भाग पाडत असावेत. जर कुणी मांसभक्षण आणि तमोगुणाचा संबंध सांगितलाच नसता तर judge कदाचित केलंही नसतं. आपल्या पुराणात किंवा कोणत्याही समाजाच्या तत्सम साहित्यात एवढ्या काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत की प्रत्येक व्यक्ती त्यातून थोडाफार जो निकष काढता येईल तो काढतो आणि आपापले पूर्व ग्रह साचवत राहतो. बऱ्याच वेळा हे निकष योग्य रीतीने judge करण्यासाठी उपयोगात सुद्धा येत असतील पण ते तेवढ्याच सामाजिक ठेवणीत!! जेव्हा आपण एका संपूर्ण नवीन जगात पाउल ठेवतो, हे पूर्वग्रहदुषित निकष बऱ्याचदा चुकीचे judgement देऊ शकतात.

बऱ्याचदा भारतीय लोक अमेरिकन लोकांना judge करतात. हे भौतिक सुखाच्या आहारी गेलेले आहेत, त्यांच्यात कुटुंब भावना कमी आहे किंवा मुलांना 'शिंग फुटले' की आपल्या जन्मादात्यांबाद्दल प्रेम राहत नाही वगैरे वगैरे..
पण इथे आल्यावर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की एखादा माणसाचे बरेच स्वभावगुण असू शकतात. आणि ते इथल्या परिस्थितीमुळे वर येतात. तेव्हा त्याच्या एखाद्या गुणधर्मावरून आपण पास नापास ठरवू शकत नाही.

मी इतर ethnicities जास्त अभ्यास केला नाहीये पण विशेषकरून अमेरिकेत बहुदा माझ्या पाहण्यात आलेले लोक जास्त पुर्वग्रही नाहीत. कदाचित कुणा समर्थांनी त्यांना मूर्खाची-थोरांची लक्षणे सांगितली नसतील किंवा कुणी घरातील जेष्ठ व्यक्तींनी खाणे आणि वागणे यातील संबंध बिंबवला नसेल. पण ह्या गोष्टी त्यांना इतरांबाबत काहीशी 'कोरी पाटी' ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच चांगलं वाईट याबद्दल किंवा इतरांबद्दल ते आपलं स्थायी judgement बनवू शकत नसावेत. आणि म्हणूनच हा वाक्प्रचार इथे रूढ झाला असावा.

तेव्हा आपला विचार केला असता हा प्रश्न पडतो की खरंच, आपण येवढे मतवादी आहोत का? दुसऱ्याचा तर सोडाच पण स्वतःचाही शोध कुणाला आतापर्यंत पूर्णपणे लागला आहे? वैश्विक पातळीवरील कितीतरी विचारवंतांनी पहिले स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि तो अंतहीन आहे. कुणाचाही स्वभावधर्म हा एखाद्या stock market index सारखा असतो. अनंत कारणास्तव परिस्थितीनुरूप चांगला वाईट बदलत राहतो. आपण फक्त भूतकाळातील कर्मांवरून एखाद्याला भविष्यासाठी judge करू शकत नाही. त्याचा जमाखर्च हा सरते शेवटीच होणार..!

गुलमोहर: 

काय वाईट आहे एखाद्याला Judge करण्यात ? फार्फार तर माझं Judgement चूकीचं असेल. So what ?

या जगात प्रत्येक चूक स्वत: करणं परवडणारं नाही. त्यामुळे बरचसं दुसर्‍यांना आलेल्या अनुभवावरही विसंबून रहावं लागतच. मग त्याला कोणी पूर्वग्रह का म्हणेनात.

" हे भौतिक सुखाच्या आहारी गेलेले आहेत, त्यांच्यात कुटुंब भावना कमी आहे किंवा मुलांना 'शिंग फुटले' की आपल्या जन्मादात्यांबाद्दल प्रेम राहत नाही"
हे खरेच आहे, पण तसे भारतीयांनी म्हंटले तरी अमेरिकन लक्ष देत नाहीत!!!! काही आवडले नाही तर ते खटला
करतील, नाहीतर खून करतील, अनमँड ड्रोन ने बाँब टाकतील!

Wink

हृषिकेश, तुमचे म्हणणे पटले. एक दोन अनुभवांवरून एखाद्या माणसाबद्दल कायमस्वरूपी मत बनवू नये ह्या मताचा मी पण आहे.
आणि >>हे judgement नेहमी फक्त वाईट मुल्यांकानासाठीच का ग्राह्य धरलं जातं? don't judge me! म्हणणारा व्यक्ती कुणी त्याची प्रशंसा केली तर का म्हणत नाही?>> हे पण खरे आहे.
पण अमेरिकेतसुद्धा अनेक लोक पूर्वग्रह ठेवून असतात. अस्सल अमेरिकन लोकांना (ज्यांचा इतर परप्रांतियांशी फारसा संपर्क आलेला नसतो) बर्याचदा पूर्वग्रह नसतात. पण न्यू जर्सी, कॅलिफोर्निया, टेक्सास इ. ठिकाणी जिथे बाहेरील देशातली मंडळी भरपूर असतात, तिथले अमेरिकनसुद्धा त्यांच्याबद्दल पूर्वग्रह ठेवून असतात हे मी अनुभवले आहे,

चांगलं आहे चिंतन. Happy अमेरिकन इतरांबद्दल फारसा विचार करत नाहीत. साधे चार शब्द बोलायला लोकांबद्दल काही 'समज' असण्याची गरज नसते. ज्या संदर्भात किंवा कामाबद्दल बोलायचे आहे तेवढे माहीत असले की झाले. प्रत्येकवेळी खोलात शिरायची गरज नाही. सोपं.

>>अस्सल अमेरिकन लोकांना (ज्यांचा इतर परप्रांतियांशी फारसा संपर्क आलेला नसतो) बर्याचदा पूर्वग्रह नसतात. >>पण न्यू जर्सी, कॅलिफोर्निया, टेक्सास इ. ठिकाणी जिथे बाहेरील देशातली मंडळी भरपूर असतात, तिथले >>अमेरिकनसुद्धा त्यांच्याबद्दल पूर्वग्रह ठेवून असतात हे मी अनुभवले आहे

चौकट, हे उलटंच आहे म्हणायचं! Wink

@ बागुलबुवा : हा काही आपले Judgement किती चूक की बरोबर याबद्दलचा प्रश्न नाही. आपले Judgement आपल्या वागण्यातून जेव्हा जाणवायला लागते, तेव्हा आपले first impression कदचित चुकीचे पडू शकते. अंदाज बांधणं आणि Judge करणं वेगळं.

@चौकट राजा : अच्छा..! शिता वरून भाताची परीक्षा म्हणावी लागेल याला..! पण इथे थोडा फरक आहे, निदान ज्यांचा परप्रांतियांशी संपर्क येतो त्यांनी पूर्वग्रह ठेवणं हे सर्रास कुणाच्या संपर्कात न येता मत बनवणं (जे बरेच आपले देशबांधव करतात) या पेक्षा बरे नाही काय?

@अन्कॅनी : कामाशी काम हे तुमचं तत्व बरोबर आहे पण ते professional जीवनाबाहेर फार कामात पडू शकेल असं मला वाटत नाही.

चांगली सुरुवात आहे (आत्मचिंतनाची). पण याही पुढे जाता येईल.

> अनंत कारणास्तव परिस्थितीनुरूप चांगला वाईट बदलत राहतो.
चांगला आणि वाईट हा फरक करणे म्हणजेच मुल्यमापन करणे.

> आपण फक्त भूतकाळातील कर्मांवरून एखाद्याला भविष्यासाठी judge करू शकत नाही. त्याचा जमाखर्च हा सरते शेवटीच होणार..!

शेवटी तरी जमाखर्च होतो हे कशावरुन? म्हणजे कोणती तरी शक्ती मुल्यमापन करते? मग ती तर आपल्यापेक्षाही 'वाईट' असली पाहिजे!

आजच प्रायोगीक फिलॉसॉफी बद्दल वाचत होतो. तुम्हाला आवडेल कदाचीतः http://www.scientificamerican.com/article.cfm?id=thought-experiments-phi...
(you may need a free registration)