दीपावली -शुभेच्छा

Submitted by प्रभा on 27 October, 2011 - 19:56

दीपावली -शुभेच्छा
---------------

अमेरिकेत यावेळी
सा़जरी केली दिवाळी
नाही पुरेस अंगण,
रेखाटली छोटी रांगोळी
जीवनात हवी विविधता
सांगती रांगोळीतील रंग
आनंदाचे डोही आनंद तरंग
अमेरिके सारख्या सम्रुद्ध देशात
रोजच असते "धन"-तेरस
तरीही उत्साहात साजरा केला
"लक्ष्मी"-पूजनाचा दिवस
नाही तेल, नाही तूप नाही कापसाची वात
विद्द्युत-रोशनाई घरा-घरात
लाडु-चिवडा, शेव नि कडबोळी
भावनांना पुरेत शब्दांच्या चार ओळी
करंजी , अनारसा खाऊया चकली
तुम्हा सगळ्यांना ' शुभ-दीपावली

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नको तेल, नको तूप नको कापसाची वात>>>>>देवासमोर निरांजन,समई नाही लावली तर ती दिवाळी होईल का?
आपणास दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा!
तुम्हा सगळ्यांना ' शुभ-दीपावली>>>>>धन्यवाद प्रभाजी.