मुलांसाठी नोकरी/व्यवसायात केलेला बदल

Submitted by me_surabhee on 11 August, 2008 - 00:30

मी सुरभी. व्यवस्थापन शास्त्रातली मास्टर्स पदवी घेतलीये. एका MNC मध्ये उच्च पदावर २/३ वर्षे नोकरी केली. नवरा software engi तो ही एका MNC मध्ये आहे. कामाच्या निमीत्तानी दोघेही १२/१३ तास घराबाहेर असायचो. मुलाकडे ( आता वय ४ वर्षे ) लक्ष देता यावे म्हणून मी नोकरी सोडली ( घरी सांभाळायला कोणी नाही ) आधी खुप बर वाटल पण आता अस्वस्थ पणा येतो. इतक शिकुन सुद्धा घरी बसलीये असे टोमणे ऐकावे लागतात. घरी कंटाळा येतो मुलगा शाळेत जातो तेव्हा. पुढल्या वर्षी त्याची पुर्ण वेळ शाळा सुरु होईल. तेव्हा आणखीन कंटाळा येईल अस वाटत.
कोणतीही कला नाही की ज्यात मन रमवावे. काही सुचत नाही. पुन्हा नोकरी करायची तर मुलाकडे दुर्लक्ष होईल अस guilty feeling येत. पण मी घरी असल्यापासुन तो जाम खुष असतो. एवढच काय ती जमेची बाजु.
नोकरी करणे किंवा सोडणे निर्णय माझा आहे. नवरा पुर्ण पणे मदत करायला तयार असतो, पण मुलासाठी नोकरी नको वाटते करायला आणि घरी पण बसायला नको वाटत. नशिब नोकरी करायची गरज नाहीये, नाही म्हणटल तरी तो factor पण विचारात घ्यावा लागतो.
मी काय करु? म्हण्जे काय करता येईल की ज्यानी माझा वेळ सार्थकी लागेल ? ( माझ्या आईच्या म्हणण्या प्रमाणे बहुदा सुख मला बोचतय, हेच खर असाव!!)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतःला उगीच त्रास करून घेऊ नये हे अगदी खरे. पण H4 वर आलेल्या बायका/पुरुष यांची तळमळही मला समजते. खासकरून जेव्हा त्यांनी त्यापूर्वी शिक्षण व करियरसाठी कष्ट केलेले असतील तर, ते वाया गेल्यासारखे वाटतात. पण तडजोड ही सर्वांनाच करावी लागते. पुष्कळदा मुलांना पाळणाघरात ठेवण्याची तयारी नसते, घरातील इतर माणसांचे सहकार्य नसते, किंवा जे काम करू त्यातून मिळकत किती होईल याबद्दल साशंकता असते. आपण आपले professional ज्ञान विसरू नये, म्हणून जरूर प्रयत्न करावे. Online courses करून ज्ञान वाढवावे. Tutoring करण्यासारखे असल्यास त्याचा प्रयत्न करावा. मुले शाळेत असल्यास शाळेत volunteer केले, तर इतर माणसे भेटतात, गाडी चालवण्याचीही सवय रहाते.
घरातील कामे, जबाबदार्‍यांमधेही थोडा रस घ्यावा, थोडे छंद जोपासावे म्हणजे त्रास कमी होईल. पुन्हा जेव्हा करियर करण्याची संधी मिळेल, तेव्हा ती जरूर घ्यावी. याआधीच्या संधींचा आपण फायदा घेऊ शकलो नाही याचे वाईट वाटून घेऊ नये, पुढे पहावे.
नातेवाईक अधिकउणे बोलले, तर जास्ती मनावर घेऊ नये. कोणी फारच मागे लागले, तर त्यांनाच विचारावे, ते काही मदत करू शकतील का.

सगळ्याना मनःपूर्वक धन्यवाद .खूप हलक वाटतय सगळ्या posts वाचून.
मला एक प्रश्न असा पडला आहे की कोणत्या भाषेला जास्त वाव आहे? मी पुढे स्पॅनेश continue करावे की french शिकवे? कोणी मार्गदर्शन करेल का?

नमस्कार ...
माझा मुलगा २ वर्षाचा आहे. मी सध्या नोकरी करते. डिलीव्हरीनंतर मी ७ महिने घरी होते. माझी जॉईंट फॅमिली आहे. घरी सासू सासरे असतात त्याला बघायला. तसा माझा जॉबचा टाईम अगदी सुटेबल आहे, म्हणजे सकाळी बारा वाजेपर्यंत घरी असते आणि संध्याकाळी आठ वाजता कामावरून येते. जवळच आहे माझे ऑफिस.
माझा प्रोब्लेम असा आहे, माझ्या मुलाला सतत सर्दि, खोकला असतो, तो थोडा आजारी पडला की सासू मला लगेच घरी राहायला सांगतात. स्वताहून अशी जबाबदारी घ्यायला मागतच नाही, दुपारी मेडिसीन द्यायला सांगितले , तर ठरलेल्या वेळेला द्यायला त्यांना जमतच नाही. कधी कधी तर मलाच घरी बोलावून घेतात. मी असली की तो फार खुष असतो. त्यांना वाटते मी घरी राहावे. कधी कधी अगदी साधी सर्दि असली तरी मला घरी राहायला सांगतात. कधी कधी यातून वाद पण़ होतात.
मला नेहमी ऑफिसमध्ये रजा घ्यायला नाही आवड्त... तस बघितल तर माझे महिन्यातून दोन तीन रजा असतात. सुदेवाने माझे सर देखील फार मदत करतात, मुलासाठी घरी राहिले तर ते मला कधीच ओरडत नाही.
माझा नवरा सांगतो, मुलाकडे दुर्लक्ष होता कामा नये. म्हणून तू नोकरी सोडून दे. पाळणाघरात ठेवणे आमच्याकडे कोणालाच पटणार नाही.. मलासुद्धा...
नोकरी सोडण्याबद्द्ल मी सरांशी बोलले तर ते मला म्हणाले... मुल लहान असताना हे सगळ चालूच असत. शिवाय ऑफिसमधून काहीहि त्रास नाही आहे. मग कशाला सोडतेस.
मी काय करू..

जुई, साधी सर्दी खोकला असेल तरी मुलं पुष्कळ किरकिरी होतात. दिवसभर कडेवर घे, माझ्याशी खेळत बस असे हट्ट असतात हे तुम्हाला माहिती असेलच. आणि तुम्हीच सांगितलत की मुलाला नेहेमीच सर्दी खोकला असतो. तुमच्या सासुबाईंना वयोमानाप्रमाणे झेपत नसेल. त्यांच्या मदतीला म्हणुन पूर्णवेळ/अर्धवेळ बाई लावुन बघा. बाळाला पाळणाघरात ठेवायचे नाही हा तुमचा/तुमच्या नवर्‍याचा निर्णय. त्याला पर्याय काय ते तुम्ही आणि तुमच्या नवर्‍याने मिळुन शोधा. त्यासाठी सासुबाईंना का वेठीस धरायचे. लहान मुल असले की महिन्यातुन २-३ रजा तर असतातच. त्या देऊन तुमचे सर काही विषेश करत आहेत असे मला तरी वाटत नाही.

सिंडीला अनुमोदन.. सासूबाईंना भितीच असते की काही कमी जास्त झाले तर काय घ्या. माझी आई सध्या लेकीकडे बघते पण तरीही घाबरते जरा काही झाले की. कोणी अर्धवेळ बाई वै. मिळाली तरी ही चिंता असणारच आहे.

माझ्या लेकीला अजूनही सर्दी असतेच अधनं मधनं (वय २ वर्षे). रात्री झोपताना बाळाच्या उशीवर, कपड्यावर दोन तीन थेंब नीलगिरी टाका बरेचदा फायदा होतो. फारच सर्दी असेल तेंव्हा मुळे किरकिरी होतात त्यासाठी डॉक्टर वेगळे औषध देतात कधी कधी.

साधारणतः एवढी लहान मुले, सकाळी आणि दुपारी अशी दोनदा झोपतात. तुम्ही दोन शिफ्टमध्ये नोकरी करून बघा. मी निमो लहान असताना तसे करीत असे. म्हणजे ती सकाळी १० - १०:३० ला आंघोळीची झोपली की मी ऑफिसला जात असे. मग १ ते १:३० ला परत येत असे. त्यांनंतर तिचे खाऊ, माझे जेवण इतर आवरणे, झोपवणे असे धरून तिला पुन्हा २:३० - ३:०० ला ऑफिस.

मग ती ५ - ५:३० ला उठून खाली स्ट्रोलरमधून फिरायला जात असे.. मी बिनधास्त ७:३० - ८ पर्यंत परत येत असे. आता तिला शिंग आलीत नि ती मुळीच दोनदा वै. झोपत नाही. पण आता तिला इतर खेळ, मैत्रिणी, सायकल, सिडीज असे छंद जडलेत. त्यामुळे ती सुटवंग असते.

तुमच्या कामाचे स्वरूप, काम करत रहाण्याची तुमची मानसिक आणि आर्थिक गरज तसेच उपलब्ध सपोर्ट सिस्टमच्या जोरावर निर्णय घ्या. आणि एकदा घेतलात की तो मनापासून एन्जॉय करा.

धन्यवाद सिंडरेला , जाईजुई.. सॉरी ऊशिरा प्रतिसाद दिल्याबद्द्ल ...
तुमचे म्हणण नीट वाचले , पटलही..

माझा खरा प्रॉब्लेम काय आहे सांगू का.. मला माहीत नाही ईथे सांगणे योग्य आहे का. पण सांगावेसे वाटले , काही तरी मदत मिळेल निर्णय घ्यायला.
माझी जॉईंट फॅमिली आहे. मी साधारण कॉलेजला असल्यापासून पार्ट टाईम जॉब करायचे. लग्नानंतर मी तो जॉब सोडला. तीन चार महिने घरी होते. पण आमच्या धरी माझ्या सासूबाईंचे कामाच्याबाबतीत फार सोहळे असतात, म्हणजे घरी जरी एक माणूस असला तरी , कामाला तीन चार वाजणार, आणि चार माणसे असली तरिही तोच वेळ .. संध्याकाळी परत तीच कामे..फार कंटाळा यायचा. स्वतःसाठी वेळच नाही मिळायचा, वाद वगेरे नको म्हणून मग मी फुल टाईम जॉब बघितला, टाईम देखील अगदी सूट व्हायच. थोडा चेंज मिळायचा, मन देखील शांत राहायच.

नंतर मला मुलगा झाला , सात आठ महिने घरीच होते. परत कामाला जायला लागले . वाटल काहीतरि मदत होईल , हल्ली मुलांचे खर्च किती असतात, एकटे किती पुरे पडणार. पुन्हा जॉब सुरू करताना मी त्यांना सांगितले कि आपण सकाळीच सगळ जेवणाच आवरून घेऊ, म्हणजे तुम्हाला त्याच्याकडे बघायला वेळ मिळेल. सुरूवातीला काही दिवस त्यांनी तस केले, पण नंतर मात्र मी करेन , एवढच करायला काय वेळ लागणार आहे अस म्हणायच्या. तेव्हाही मी त्यांना सांगितले की तुम्हाला छोटा करून देणार नाही , पण त्या एकायच्या नाही. तस मी त्याच दुपारपर्यंत सगळ करून जाते, अगदी भरवण्यापासून सगळ.

आता तर त्या कधी कधी खुप त्रागा करतात , म्हणतात मी सांगणार आहे तिला नोकरी सोडायला , आणि कधी कधी काही कारणास्तव वाद झाला तर मला म्हणतात मी तुमच्या भविष्यासाठी , संसारासाठी करते.
हिला मात्र त्याच काही नाही. कधी कधी एकदम नॉर्मल असतात.

तुम्ही सांगितलेले विचार मला पटले , नवर्र्याने सांगितले की बाई ठेवण्यापेक्षा तुच घरी रहा, छोट्याकडे नीट लक्ष देता येईल. मला हि तेच वाटते.
मला अस विचारायच आहे. माझा मुलगा आता दोन वर्षाचा आहे , अडिच वर्षानंतर playgroup , शाळा सगळ सुरू होईल. घरी बसूनही मला काही करता येईल का.. जेणेकरून माझा हातभार माझ्या संसाराला लागेल, माझा वेळही जाईल.

ल्यापटोप वर फ्रीलान्स करता येत असेल तर फक्त चेक घ्यायला ऑफिसात जावे. ही अतिशय महत्त्वाची फॉर्मेटिव वरषे असतात. ती मिस करू नको. अगदीच पैशाची गरजच असेल तर गोष्ट वेगळी. आइ मूल बॉन्डिन्ग महत्त्वाचे असते. त्यां ना घराचा चार्ज देऊन बालसंगोपनावर लक्ष केन्द्रित करता आले तर बरे. काही शिक्षण घेता येइल.

नम्रता, सहकारनगर मधे मुक्तांगण शाळेच्या समोर "Little Hearts" म्हणून एक डे केअर आहे. खुप छान आहे.... माझी मुलगी तिथेच जाणार आहे पुन्हा मी पुण्यात आल्यावर.

नम्रता, सहकारनगर मधे मुक्तांगण शाळेच्या समोर "Little Hearts" म्हणून एक डे केअर आहे.
यांची "फी" पाहुन मी चाट पडलो ...

सुरभी Congratulations !!! अतिशय पण नोकरी सोडण्याचा योग्य निर्णय घेतल्याबद्दल !

पुरुष असूनही माझ्या २ वर्षाच्या मुलासाठी आणि upgradation आणि international certification च्या उद्देशाने मी ६० days unpaid leave घेतलेली होती .
१ लाख INR चे नुकसान आणि इतरांचे टोमणे या पेक्षा मला माझ्या मुलाचे सुख महत्वाचे होते आणि आज हि मला त्याचे दुख नाही कारण त्या दोन महिन्यांमुळे माझे careear आज ज्यास्त चांगल्या स्थितीत आहे

जर तुला वाटलंच तर तू foreign langauge साठी upgrade करून घरूनच translation चे काम करू शकतेस
classes हि घेऊ शकतेस किंवा part time lecturer म्हणून काम करू शकतेस.
part time foreign langauge lecturer म्हणून तुला ३० hrs /month साठी INR ९००० ते १२००० आरामात मिळू शकतात .!!!
तूझं मुल हि तुझ्या आयुष्यातल्या भविष्यातली तू केलेली सर्वात महत्वाची आणि सर्वात secured भावनिक गुंतवणूक आहे !!!

माझा प्रश्न ही वर लिहिलेल्या प्रश्नांपैकीच एक आहे. म्हणून नवीन धागा न काढता इथेच लिहित आहे. मी (Manual)टेस्टिंग मधे गेली ४ वर्ष काम करते. आता बाळाच्या प्रतिक्षेत आहे. मला घरी बसून किंवा १२ तासाच्या नोकरीच्या तुलनेत थोडा कमी वेळ देउन काही करता येइल का? ज्यायोगे अर्थार्जन सुधा होउ शकेल. कारण अर्थार्जनाची पण गरज पण एवढ्या लहान बाळाला सोडून जायचंदेखील खूप जीवावर येतंय. Sad
क्रुपया मला मार्गदर्शन करा.

धनश्री, मला देशातलं माहित नाही पण अमेरिकेत घरुन कामाचा पर्याय स्त्री काय पुरूष ऑफिस पॉलिसि असेल तर मिळतो.. काम शोधतानाच तसं रिक्वायरमेंट मध्ये स्पष्ट करायचं.. आय टी टेस्टिंगमध्ये मिळायला हरकत नाही . Talk to local placement agencies in your area and start networking... If you are on linked in spread a word in your contacts. If someone has an opening you would surely get to know about it...

शुभेछा..

धनश्री, आत्ताच्या कामाच्या ठिकाणीच तुम्ही विचारून पाहिले का? कमी तास, कमी पगार पण नोकरी तेथेच चालू ठेवायचा पर्याय काही महिने. व नंतर (बाळ मोठे झाल्यावर) पुन्हा पहिल्यासारखे असे काहीतरी?

सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या. मी सध्या याच तणावाखाली आहे. माझी जुळी मुल असल्यामुळे मला ३ वर्षापूर्वी नोकरी सोडावी लागली. ऑफिसने राजा दिली परंतु नंतर राजीनामा द्यावा लागला. दोन मुलांना ठेवून जॉईन कारण शक्यच नव्हत. नवरा आणि मी दोघेही software मध्ये. नवरा मी प्रेग्नंट असताना अमेरिकेला गेला. मागचं १ वर्ष मी आणि मुलही तिकडेच होतो. आता सध्या भारतात आलेय. आधी तो L2 वर होता, त्यामुळे मला तिथे नोकरी करता येत होती. मुलं लहान असल्यामुळे करू शकले नाही ते वेगळ. पण आता तो H1 वर गेलाय, म्हणजे आता H4. म्हणजे अमेरिकेत परत गेलं कि घर सांभाळत बसा. आताही मी तेच करतेय. पण प्रचंड घुसमट होतेय. आमच्या क्षेत्रात २/३ वर्षाची gap झाली कि पुन्हा जोब मिळवण कठीण होत. software सतत बदलणार क्षेत्र असल्यामुळे interview साठी call मिळवण आणि तो clear होण सगळाच कठीण होऊन बसत. मुलांना आपली गरज असते हे खरय पण ती लहान असेपर्यंत. त्यांच्या शाळा सुरु झाल्या त्यांचे मित्र मैत्रिणी मिळाले कि आपली गरज कितीशी राहणार? हल्ली मला काही करावस वाटत नाही, म्हणजे कशातच लक्ष लागत नाही. H4 वर घरात बसण अजिबात पटत नाहीये आणि नवर्याला आता तरी भारतात परतण शक्य नाहीये. मी जर इथेच राहायचं ठरवलं तर मग मुलाचं काय? त्यांना बाबा नको का असही वाटत. कधी कधी स्वताचा रागही येतो. मुल झाली म्हणजे बाईचं/ आईचंच करिअर का संपत? माझ्या आईनेही आम्ही लहान होतो, सांभाळायला कोणी नाही म्हणून नोकरी सोडली. नंतर आम्ही मोठे झालो , आपापल्या व्यापात बुडलो आणि तिच्या नशिबी रिकामपण आलं. म्हणून माझ असं घरात बसण तिलाही मान्य नाही. स्त्रीकडे स्वताच काहीतरी असाव असं ती सतत म्हणत असते. मलाही माझ आर्थिक स्वातंत्र आवडत. कशालाही काही कमी नाहीये. पण नवर्याच्या पैशांवर जगतोय असं काहीतरी सतत वाटत रहात.

अनेकांच्या आयुष्यात अनेक प्रश्न असतात. माझ्या काही मैत्रीणीना मुल नाहीत त्यांना वाटत हिला चांगली मुल आहेत, सगळ आहे तर काहीतरी डोक्यात येतंय. मुल होऊनही नोकरी सोडायला न लाग्णार्याही अनेकजणी आहेत, थोडक्यात काय तर डोक्यात सतत भुंगा चालू आहे. आताही कधीतरी वाद झाला कि मी नवर्याला ऐकवते ' माझ करिअर संपल, तुला माझ दुख काय कळणार? ' आणि त्याला खरच समजत नाही माझी नक्की तक्रार काय आहे? माझी डॉक्टर मला म्हणते तू अमेरिकेला जा, तिथे कधीही काहीही करू शकशील. भारतासारख वयाची आडकाठी नाही आणि घरात बसू नको. काहीतरी कर, पण काय करायचं हेच सध्यातरी समजत नाहीये.

माझ करिअर संपल,>> मीमराठी, तुमचे करीअर आहे अजून पुढे. तुम्हाला करीअर करायच आहे ना, मग प्रयत्न करा. नक्की होइल ते.

तुम्ही ज्यामधून जात आहात तीथे तुमच्या बरोबरीने बर्‍याच असतील/ आहेत. मार्ग सापडेल. नक्की सापडेल.

@मीमराठी! तुझं वाचुन मला तुला माझ्या एका मैत्रिणिच उदा. द्यायचं आहे.. दोघं आय टी वाले तिला जुळ्या मुली झाल्यावर तिने आधी छ ंद म्हणुन शिकलेल बेकिंग तिने शिकवायला सुरुवात केली घरच्या किचनमध्ये...आज रांगा लागताहेत तिचे सगळॅ क्लासेस फुल्ल असतात.. मुली घरी इतर देखरेखीखाली सांभाळल्या जातात...तिला ती जे काम करते त्यातल्या निर्मितिचा आनंद ती आय टि त असताना मिळायचा त्यापेक्षा जास्त आहे...
and just so you know she learnt this baking/food decorations when she travelled with her husband oversees and she could not work that times.. It's about how you wanna utilize your time.. Give it to kids when you need to and side by side try to find out an option for you..and if you think you cannot live without your current profession, while you take break for kids, make sure you stay in touch with your work and upgrade your knowledge .. This is not an easy task but you got be determined for what you are aiming for...
Good luck .. Happy

मीमराठी एवढा प्रॉब्लेम येणार नाही. असा थेट अनुभव घेतलेले जास्त सांगू शकतील, पण अमेरिकेत २-३ वर्षांच्या गॅप मुळे (मुळात अनुभव असेल तर) पुन्हा नोकरी मिळण्यास अडचण येणार नाही. उलट मुले लहान असल्याने नोकरी सोडली व आता पुन्हा पाहात आहे असे सरळ सांगतात.

सॉफ्टवेअर क्षेत्रात खूप वेगात बदल होत असले तरी ३ वर्षांपूर्वी प्रचलित असलेले सगळे कालबाह्य होत नाही.

I took a 3 year break after my first daughter was born. Somethings I and my friends in similar situations did.

Take any courses / certification to refresh / update your professional skills. It will also help you when you try to re-enter professional world agian.

One of my friends did some volunteer work to design website for a non profit. It gave her some experience as well. (She was working on it part time)

Other friend was a comercial artist, she tought a couple of classes to kids. it was mainly to do something interesting, don't think she earned much.

वरच्या पॅराला अनुमोदन. मोकळ्या वेळात तुमच्या क्षेत्राशी निगडीत कोर्स करा, नियमीत लायब्ररीत जा (मुलांना घेऊन) वाचा. व्हॉलुंटरी कामे करा, टिचिंग ने सुरुवात करा, १-२ वर्षे पगार कमी मिळेल पण नंतर जोम धरायला हा काळ आणि काम मदत करेल. मी यांतुन गेलिये आणि जाम फ्रस्टेट पण झालेले होते, पण कोर्स करताना आणि प्राविण्य मिळवताना गेलेला काँफीडंस परत आला Happy आणि काम सुरू केले.

पण मुलांना दोष देऊ नका, त्यांच्या बाललीला बघण्याचे सोउभाग्य (कसे लिहावे हे? Uhoh ) तुमच्या दैवात आहे असे समजून स्वतःला भाग्यवान समजा खरं तर! शुभेच्छा Happy

पण मुलांना दोष देऊ नका, त्यांच्या बाललीला बघण्याचे सोउभाग्य (कसे लिहावे हे? ) तुमच्या दैवात आहे असे समजून स्वतःला भाग्यवान समजा खरं तर! शुभेच्छा
<<<<<<<<<<< अनुमोदन ++++ १०००००००

खरोखर आपल्या मुलांच्या बाललीला बघण्याचे सौभाग्य आपल्याला मिळाले हि खरोखर भाग्याची गोष्ट आहे...... हे सुख सहजपणे मिळाले तर याची किंमत कमी वाटते......

माझ्या मनात मिमाराठी सारखे विचार येत राहायचे. नवर्‍याच्या आय टी मधल्या जॉब मुळे सारख फ़िरतीच आयुष्य, कधी विसाचे प्रॉब्लम्स. पण एका मैत्रिणेने दिलेला सल्ला मला पटला. तुला जॉब करायचा आहे की क्ररीयीर ते ठरव. मूलीना सांभाळून उरलेला वेळ चांगला जावा आणि जमल तर चार पैसे कमवावे असा उद्देश मुली लहान असताना ठेवला. मिळतील ते पार्ट टाइम जॉब केले, काही वेळा वॉलेंटीर वर्क केल. आता मुली मोठ्या झाल्या. त्या डे बोर्डींग शाळेत जातात. आता मी त्यांच्या शाळेच्या वेळात निर्धास्त नोकरी करू शकते.

कामानिमीत्त ११/१२ तास घराबाहेर राहाणार्या मैत्रिणिना विचारायचयः१) तुमच्या मुलाना तुम्ही क्वालिटी टाईम. कसा देता? काय काय करता त्या वेळात? २) ज्यान्ची मुले चौथी पाचवी च्या पूढे आहेत त्या अभ्यास. कसा घेतात? ३) ज्या मुलाना पाळणाघरात ठेवतात त्या मुलान्चा वेळ जावा म्हणून काय करतात?

Pages