सारणासाठी:
१ खोबरं डोल. काळी पाठ काढून किसलेला. (किंवा बाजारात मिळणारा खोबर्याचा चुरा)
अर्धी वाटी कणीक चाळून
१ डाव खसखस
वेलदोडा जायफळ पावडर (जायफळ ऐच्छिक)
कुठलाही सुका मेवा नाही (कानोला तोंडात विरघळायला हवा, त्यात सुका मेवा चावायला लागायला नको. )
साखर (प्रमाण कृतीत दिलंय)
पारी:
२ वाट्या बारिक रवा
दूध पाणी एकत्र करून (१:१)
अर्धी वाटी साजुक तूप
१ डाव लोणी
१ डाव कॉर्न फ्लावर
सारणाची:
* खोबरं किसून अगदी मंद आचेवर गुलाबी भाजावं. थंड करून हातानी चुरून घ्यावं
* चाळलेली कणिक साजुक तुपावर (मंद आचेवर) भाजावी. फार खरपूस नको.
* खसखस भाजून घ्यावी.
* खोबरं, कणिक आणि खसखस एकत्र करून (थंड झाल्यावर) हे मिश्रण जितकं असेल तितकीच पिठीसाखर घालावी.
पारीची कृती: हा सगळ्यात ट्रिकी भाग. पारी छान झाली तरच पापुद्रे सुटून कानोला छान होतो.
* रवा दुध्-पाण्यात घट्ट भिजवून घ्यावा. तासभर ओल्या (पण घट्ट पिळलेल्या) कापडाखाली झाकून ठेवावा.
* या रव्याच्या गोळ्याला थोडं थोडं तूप टाकून व्यवस्थीत कुटून घ्यावं. (साधारण अर्धी वाटी साजुक तूप लागेल)
* कुटलेल्या रव्याच्या दोन पोळ्या लाटाव्या. एकीला बोटांनी खड्डे करून त्यात कॉर्न फ्लावर्-लोण्याचं मिश्रण लावावं (खड्ड्यात जरा भरपूर मिश्रण मावेल). त्यावर दुसरी पोळी ठेवून खड्डे-कॉर्न फ्लावर मिश्रण प्रकार रिपीट करावा.
* या दोन्ही पोळ्यांची लांबट गुंडाळी करून १ इंचाचे तुकडे करावे.
* प्रत्येक तुकड्याची दोन टोकं दोन्ही हातांच्या बोटात धरून उलट दिशेला अलगद फिरवावीत आणि अलगद दाबावी. हे झालं पागोटं.
* १ डाव लोणी आणि कोर्न फ्लावर एकत्र फेसून घ्यावं.
कानोला भरताना:
* पागोट्याची ओवल शेपमधे पोळी लाटावी. (फार दाब न देता, नाहीतर पापुद्रे सुटणार नाहीत). लाटताना कोर्न फ्लावर घ्यावं. लाटताना उरलेली पागोटी ओल्या फडक्याखाली झाकावी म्हणजे कोरखंडणार नाहीत.
* अर्धी पोळी हातानी झाकून उरलेल्यात सारण भरावं.
* किंचित दुधाचा हात लावून कानोला बंद करावा. कडा कातरणीनी कातरून कानोले ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावे.
* ८-१० कानोले झाले की मध्यम आचेवर तुपात गुलाबी रंगावर तळावे.

फोटो सौजन्य : रंजना कर्णिक, अन्कॅनी.
कॉर्नपिठाऐवजी तांदळाची पिठी देखिल वापरतात.
काल आम्ही कानोले केले. रवा
काल आम्ही कानोले केले. रवा छोट्या खलबत्त्यात कुटायचे आणि कानोले मंद आचेवर तळायचे काम नवर्याने केले.







सुंदर फोटो आणि कानवले तर फारच
सुंदर फोटो आणि कानवले तर फारच देखणे!
ओये ती पागोटी राह्यली ना फोटु
ओये ती पागोटी राह्यली ना फोटु काढायची...
एकदा खरंच एकदा खाऊन बघितलाच पाहिजे हा कानोला/ कानवला कसा असतो ते.
धन्स मृ नी, त्या पागोट्याचा
धन्स मृ
नी, त्या पागोट्याचा विडियो काढलाय. पण इथे कसा टाकायचा ते मला माहित नाही.
मृण, थँक्यू. तुझ्या
मृण, थँक्यू. तुझ्या 'आकृती'मुळे पागोटं कसं असतं त्याचा अंदाज आला.
स्वाती२, इकडे पाठवता की मला बोलावता चव बघायला?
स्वाती युट्युबवर व्हिडीओ
स्वाती
युट्युबवर व्हिडीओ टाकून त्याचा दुवा इकडे देता येईल.
सुरेख जमलेत , स्वाती.
सुरेख जमलेत , स्वाती.
स्वाती, फराळालाच या. धन्स
स्वाती, फराळालाच या.
धन्स बिल्वा.
भारीच!!!! काय सही दिसतायत हे
भारीच!!!!
काय सही दिसतायत हे कानोले!!!
मृ आनि स्वाती मानलं बा तुम्हाला
स्वाती२, मस्तच जमलेत. मला ते
स्वाती२, मस्तच जमलेत.
मला ते पागोटं प्रकरण झेपलं तर आज करून पहाणार.
ये मेरे बस की बात नही! फोटोवर
ये मेरे बस की बात नही!
फोटोवर समाधान मानावे झालं.
कणिक कुटायला काहीच साधन
कणिक कुटायला काहीच साधन नसल्याने जरा मळून आणि जरा लाटून कणिक मऊ करायचा प्रयत्न केला.
अगदीच छान नाही पण असे जमले...
नलिनी, काय प्रचंड उरक आहे
नलिनी, काय प्रचंड उरक आहे तुझ्यात! खरंच कौतुक!
कानोले छान दिस्ताहेत.
सह्हीच. आईच्या हाताखाली
सह्हीच. आईच्या हाताखाली वर्षानुवर्षे हे केलेले आहेत. आणि दिवाळीकरता हा एकहाती करण्याचा प्रकारच नव्हे. किमान दोन सुगरणी लागणारच. एक दिवस हिच्याकडे आणि मग एक दिवस तिच्याकडे. आम्ही हौशी, होतकरू लिंबुटिंबु. शिवाय तळण्याचे सोपस्कार ते केवढे! अगदी मंद गॅसवर तळायचं. वाटल्यास तूप बदलायचं .. कारण ते स्वच्छ पांढरेच झाले पाहिजेत (जर रंगित करणार नसू तर) आणि सुरेख पापुद्रे सुटलेच पाहिजेत. इतर करंज्याना 'फोडाच्या' करंज्या असा शब्दप्रयोग वापरात होता.
आणि असा कानवला काहीसा गरम असतानाच खाल्ला ना, तर केवळ अप्रतिम लागतो.
१ डाव लोणी आणि कोर्न फ्लावर एकत्र फेसून घ्यावं. >>> याला 'मथणे' म्हणतात. परातीत तळहात पूर्णपणे वापरून बराच वेळ म्हणजे सारण हलके होईपर्यंत फेटत रहावे लागायचे.
आशुतोषा, खव्याचे कानवले वेगळे. हे केवळ पिठीचे.
अवल .... खुळखुळ्याच्या वाक्याबद्दल अतिअनुमोदन!
किमान १० वेळा तरी ऐकायला लागायचंच.
कणिक कुटायला काहीच साधन
कणिक कुटायला काहीच साधन नसल्याने जरा मळून आणि जरा लाटून कणिक मऊ करायचा प्रयत्न केला.>>>>>
नलिनी, भिजवलेल्या कणकीचे छोटे गोळे मिक्सरच्या छोट्या भांड्यात टाकून तीन - चार वेळा फिरवून घेतले की कणिक मस्त कुटली जाते. विनाकष्टाचे आणि सोपे काम होते एकदम.
कसं काय? हे पूर्ण साजुक तुपात
कसं काय?
हे पूर्ण साजुक तुपात तळलेले आहेत. काही माबोकरांनी चाखलेत सुद्धा
काय मस्त दिसतायत सगळ्यांचे
काय मस्त दिसतायत सगळ्यांचे कानवले ! एकदाच खाल्लाय एका सीकेपी मैत्रिणीने दिलेला. तो पिवळा रंग कसा आला?
एक सीकेपी मैत्रिण हायली
एक सीकेपी मैत्रिण हायली वॉन्टेड नाऊ..
(No subject)
(No subject)
वरिल फोटो माझ्या घरच्या
वरिल फोटो माझ्या घरच्या कानवल्यांचे आहेत.वरचे गुलाबी रंगाचे आहेत ते खाज्याचे कानवले,आणि दुसरा फोटो खिम्याच्या कानवल्यांचा आहे.
सगळ्यांचेच प्रकार सुंदर
सगळ्यांचेच प्रकार सुंदर दिसताहेत.
हे कानवले होत आले कि आमच्याघरी त्याच पिठाचे मोदक, चंपाकळी आणि चांदण्या करायची पद्धत होती.
मस्त आहेत सगळ्यांचे कानोले.
मस्त आहेत सगळ्यांचे कानोले.
अक्षर्मन, सुखदा, काय अफाट
अक्षर्मन, सुखदा, काय अफाट सुंदर कानवले आहेत!! 'तोंडात टाकले की विरघळतील' असं फोटो बघूनच जाणवतंय.
अक्षर्मन आणि सुखदा, अगदी
अक्षर्मन आणि सुखदा, अगदी सुरेख झाले आहेत कानवले. किती नाजूक.
नलिनी, कौतुक आहे तुझं.
अश्विनी के, लाटलेल्या पाच
अश्विनी के, लाटलेल्या पाच पोळ्यांच्या थरांपैकी चार पांढरे आणि मध्ये एक पिवळा थर. रोल केल्यामुळं फायनली पांढर्यामध्ये पिवळे पदर दिसतात.
धन्यवाद, कानवल्यांचं कौतुक
धन्यवाद, कानवल्यांचं कौतुक निर्मात्यांपर्यंत पोचवण्यात आलं आहे.
पुण्यात असाल तर कळवा, कानवले घरपोच मिळण्याची सोय केली जाईल
अक्षर्मन, काय भारी दिसतायत
अक्षर्मन, काय भारी दिसतायत तुमचे कानवले! पापुद्रेदार आणि अजिबात तुपकट दिसत नाहीयेत!
(मुंबईत पाठवता का? :P)
सुखदा, नलिनी, तुमचेही मस्त!
अक्षर्मन आणि सुखदा, अगदी
अक्षर्मन आणि सुखदा, अगदी सुरेख झाले आहेत कानवले. किती नाजूक.>>> अनुमोदन.
मंजूडी, हे लक्षातच नाही आलं माझ्या. पुढच्यावेळी ऐसाहीच करूंगी.
मृ, आर्च, स्वाती, कौतुकासाठी धन्यवाद. परत परत प्रयत्न करून छान, सुबक कानवले बनवण्यासाठी ही प्रेरणा.
मुंबईत पाठवता का?<< हो प्लीजच
मुंबईत पाठवता का?<< हो प्लीजच पाठवा
Pages