जुन्या मायबोलीवरच्या फेमस तांदळाच्या पिठाच्या चकल्या

Submitted by बिल्वा on 21 October, 2011 - 09:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. १ छोटा कुठल्याही ब्रँडचा sour cream चा डबा.
२. तांदळाचे पीठ
३. अगदी बारीक किसलेलं आलं
४. चवीप्रमाणे तिखट, मीठ
५. खसखस
६. ओवा

क्रमवार पाककृती: 

sour cream मध्ये मावेल येवढचं तांदळाचं पीठ घालायचं. त्याची consistency भाजणीचं पीठं जसं भिजवल्यावर असतं तशी झाली पाहिजे.
त्यात ओवा, तिखट, खसखस, आलं, आणि मीठ घालायचं. आणि लगेच चकल्या करायच्या.

वाढणी/प्रमाण: 
खाऊ तश्या :)
अधिक टिपा: 

अगदी, नाजूक, खुसखुशीत चकल्या होतात. चकलीच्या पिठात हळद घालायची नाही. हळद deep fry करताना जळते आणि मग काळपट रंग येतो.

ही मूळ कृती आर्चची आहे. जुन्या माबोवर तिने २००५ मध्ये लिहीली होती. आजपर्यंत दरवर्षी मी ह्याच रेसिपीने चकल्या केल्या आहेत. कधीही बिघडल्या नाहीत. अतिशय मस्त चवीच्या चकल्या होतात.

फोटो नाही. तुम्हीच करा आणि फोटो डकवा इथे.

माहितीचा स्रोत: 
मूळ रेसिपी आर्च ची आहे. जुन्या माबोवर ती इथे आहे. http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/91783.html?1130424502
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यंदा करून बघाव्यात का, अगदीच बेसिक पाककौशल्य असणार्‍यांना जमतील का या? मी एकदाही चकल्या केलेल्या नाहीयेत.
हवाबंद डब्यात किती दिवस टीकतात या चकल्या?

रुनी बिन्धास्त गो फॉर इट. Happy
मी खूप टिकण्याच्या एवढ्या प्रमाणात कधी केल्या नाहीयेत. पण आठवडाभर तर नक्कीच कुरकुरीत राहतात. अजिबात मऊ पडत नाहीत.

बिल्वा, बरं झालं जुन्या हितगुजातून इकडे आणलीस ही पाकृ.

अगदी जास्त विचार न करता करावी. आत्तापर्यंत एकदाही बिघडली नाही.

बिल्वा मी पण ही रेसिपी जुन्या माबो वरुन करत होते , बरं झालं आता दर वेळी शोधावं नाही लागणार.
आणि याची चव मस्त लागते , लगेच संपतात तोंपासु Happy

हे जरा अतिच विचारतेय Proud पण चकलीचा सोर्‍या नसेल तर दुसरी कुठली आयडिया आहे का चकली पाडायला? या चकल्या छान आणि सोप्या वाटतायत.करून पाहायच्या आहेत.

फडक्याला भोक पाडून त्यात पीठ घेऊन दाबून चकल्या पाडा... Proud उत्तर भारतात जिलेबीचे पीठ घट्ट कालवून फडक्यातून अशा जिलेब्या पाडतात

अंजली_१२, हा प्रश्न तुम्ही विचारलात म्हणून लिहिण्याचे धाडस करते. मला गेल्या वर्षी मॄण्मयीने ही कॄती दिली होती. माझ्याकडे सोर्‍या नव्हता म्हणून मी हाताने कडबोळ्यांसारखा आकार देऊन तळल्या. त्या आतून मऊ झाल्या. गार झाल्यावर चामट झाल्या. आर्चला आणि मॄण्मयीला 'माझं काय चुकलं ?' असं बहुतेक विचारलं होतं. आता वाटतंय की सोर्‍या वापरला नाही हेच चुकलं असावं. कुणी दुसर्‍या पद्धतीने करुन बघितल्या तर इथे सांगा प्लीज.
ज्यांनी केल्या आहेत त्यांनी फोटो टाका की Happy

शक्य आहे.. कारण सोर्‍याचे भोक चांदणीच्या आकाराचे असते.. त्यामुळे चकलीचा जास्त सरफेस एरिया तेलाच्या संपर्कात येतो.. त्यामुळे चकली खुसखुशीत होते... तेच पीठ असले आणि त्याचे कडबोळे, पुरी, धपाटे केले तर ते खुसखुशीत होणार नाही..

मग जामोप्याच्या लॉजिकने शेव पाडली तर चांगली व्हायला हवी. सोर्‍या नसला तरी पोटॅटो राइसरने पाडता येईल.

नको बाई, कोण खेळत बसणार. तळणीचा पसारा. त्यातून बिघडली शेव ( खायची ) तर डोळ्यांना शेव लावायची वेळ येईल ( ओढणीचा ) Proud

त्याची consistency भाजणीचं पीठं जसं भिजवल्यावर असतं तशी झाली पाहिजे.>>> म्हणजे कशी? मी कधी तळायचे प्रकार (चकल्या, पुर्‍या) केले नाहीत, पण पुपो, पोळ्या, पराठे करते सो त्या comparison मधे dough किती मऊ/घट्ट असला पाहीजे, कोणी सान्गेल का प्लीज?

<<< पण चकलीचा सोर्‍या नसेल तर दुसरी कुठली आयडिया आहे का चकली पाडायला? या चकल्या छान आणि सोप्या वाटतायत.करून पाहायच्या आहेत.

Biscuit Cutter.jpg

अशा टाईपच्या बिस्किट कटरमध्ये चकलीच्या सोर्‍यासारखीच एक ताटली असते , त्याने चकली छान पडते . माझ्याकडे सोर्‍या नव्हता तेव्हा मी हेच वापरत होते . Happy मात्र हात भयंकर दुखतात , कारण चकलीची भाजणी मी जरा घट्ट भिजवते .

बिल्वा, धन्यवाद ग. सगळं परत लिहून काढलस.

मी पीठ सैलसर ठेवते. थलिपिठाच्या पिठाएवढं.

ह्या चकलीची खासियत म्हणजे हसत फसत नाहीत तेलात टाकल्यावर आणि एकदम खुसखुशीत होतात.

फडक्याला भोक पाडून त्यात पीठ घेऊन दाबून चकल्या पाडा>>>>> ही आयडिया आली होती डोक्यात.. कोणीतरी लिहायची वाट बघत होते Proud

अगो, हो ना चकली करायला जावी तर झाली कडबोळी असं नको... Happy ते चामट प्रकरण नंतर खाववत नाही.
संपदा, बिस्किट कटर भारी वाटतंय पण कुठे मिळेल?

अंजली, तुम्ही न्यू जर्सीत आहात का? मग तुम्हाला इंग्रो मध्ये सोर्‍या नक्की मिळेल. माझ्या मैत्रिणीने परवाच मला ओक ट्री वरच्या अपना बझार ( बहुतेक) मधून घेऊन पाठवला.

जुन्या मायबोलीत (की इकडे? नक्की आठवत नाही) मुगाच्या डाळीच्या खिचडीच्या चकल्यांची पाककृती सांगितली होती. कोणाला आठवत असेल तर प्लिज लिंक द्या किंवा इकडे नव्या मायबोलीत आणा.

त्या नाही गं बिल्लो Sad
अॅक्चुअली मुगाची डाळ आणि तांदुळाची खिचडी करून त्यात मावेल तेवढा मैदा (की तांदूळ पिठी?) घालून चकल्यांची पाककृती होती. 'उरलेल्या खिचडीच्या चकल्या करणार असाल तर त्यातल्या कढीपत्ता, मिरच्या इत्यादी काढून टाका' हे वाक्य मला आठवतंय, पण कोणाची पाकृ, कुठे लिहिली होती हे काही आठवत नाहीये. Sad

Pages