माकडाहाती कॉम्प्युटर...

Submitted by विजय आंग्रे on 20 October, 2011 - 00:44

माकडाच्या ‘बुद्धी’बाबत अनेक प्रयोगही होत असतात. ‘माकडाचा खेळ’ आता ‘टर्रर्डक्डक्’ करणार्‍या मदार्‍याच्या इशार्‍यांपासून ते थेट कॉम्प्युटर संशोधकांपर्यंत पोहोचला आहे. काही अमेरिकन संशोधकांनी ‘व्हर्च्युअल ‘मॅकी’ तयार करून त्यांच्या हाती कॉम्प्युटरचा ‘की’बोर्ड दिला. मग काय! व्हर्च्युअल (प्रत्यक्षाभासी) असली तरी माकडंच ती! त्यांनी कीबोर्ड ‘बडवायला’ सुरुवात केली.

इंग्लिश भाषा ओ की ठो कळत नसताना या कॉम्प्युटर सॅव्ही ‘मॅकी’ मंडळींनी इतक्या वेळा ‘की’ प्रेस केल्या की त्यातून पडद्यावर ‘अनुमान धपक्याने’ जे काही उमटत गेलं त्यात शेक्सपीअरच्या साहित्याचा समावेश होता. २१ ऑगस्टला कॉम्प्युटरचा ‘की-बोर्ड’ बडवायला आरंभ केलेल्या या माकडांनी सप्टेंबरअखेरपर्यंत ५.५ ट्रिलियन (एक ट्रिलियन म्हणजे १००० कोटी) एवढ्या संख्येने नवाक्षरी जोडशब्द (अंदाजाने) तयार केले. कोणत्याही भाषेतील मुळाक्षरांची वारंवार अंदाजित जुळणी केली तरी त्यातून केव्हातरी त्या भाषेतले सगळे शब्द आपोआप तयार होणार आणि त्यांची ऑर्डरही (रचना) एखाद्या लेखकाच्या कलाकृतीसारखी होऊ शकेल. मात्र त्यासाठी ‘परम्युटेशन कॉम्बिनेशन’ पद्धतीने असंख्य वेळा अक्षरजुळणी करायला हवी. ‘व्हर्च्युअल मॅकी’नी तेच केलं. खरीखुरी माकडंही आता कॉम्प्युटर शिकण्यात मागे नाहीत असंही सिद्ध होतंय.

अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठातील एका संशोधन पथकाने माकडांना कॉम्प्युटर शिकवण्यात यश मिळवलं आहे. दोन माकडांनी त्यांचा ‘मेंदू’ वापरून कॉम्प्युटर ऑपरेट करणं साध्य केलं तेव्हा संशोधकांना कमालीचा आनंद झाला. या संशोधनात छोट्या प्रजातीच्या दोन माकडांना स्वत:ची बुद्धी (मेंदू) वापरून ‘व्हर्च्युअल आर्म’ वापरण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यानंतर माकडांनी त्यांना ‘जाणीव’ झालेल्या वस्तूंमधील फरक ओळखला.

या संशोधनाचा उपयोग पक्षाघात (पॅरॅलिसीस) झालेल्या रुग्णांना कालांतराने होऊ शकेल. ज्यांना हातापायांची हालचाल शक्य नाही त्यांना रोबोटिक एक्झोस्केलिटन वापरून मेंदूतील जाणिवेच्या केंद्राद्वारे आसपासच्या गोष्टी ‘फील’ करता येतील. वस्तूंचा स्पर्शही त्यांना जाणवू शकेल. संशोधनाचा तपशील किचकट वाटला तरी अशा प्रयोगातून माणसांच्या अनेक आजारांवर मात करता येणार आहे ही गोष्ट महत्त्वाची म्हणावी लागेल.

http://www.saamana.com/2011/October/20/stambhalekh.htm

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे, हा विषय तर गम्भीर आहे Happy मेरी पहुन्च के बाहर.
मला आधी वाटल की सरकार २२५० रुपयान्चा ट्याबलेट सतराशे रुपयात एक लाख विद्यार्थ्यान्ना वाटणार आहे त्याबद्दल काही आहे की क्काय....! Proud