रिंगण आणि पालखी सोहळा.. २०११ (क्षणचित्रे)

Submitted by स्मितहास्य on 18 October, 2011 - 00:04

यंदा वारीला जाण्याचा योग आला होता. होता म्हणजे जमवून आणला. बर्‍याच दिवसांपासून वारीला जायची इच्छा होती ती यावर्षी पूर्ण झाली. पुणे ते दिवेघाट हा टप्पाही पूर्ण केला. पण लक्षत राहीली ती आपला माबोकर किश्याने वारकर्यांसोबत घातलेली फुगडी....
इथे घरी जवळच्या अंतरास लागणारी बाईकची आठवणसुद्ध्हा झाली नाही. पहाटे ६ ते दुपारी अंदाजे ३.३० पर्यंत वारकर्‍यांबरोबर कसा काय चालत गेलो कोणास ठाऊक. पाठीवर कॅमेर्‍याची बॅग आणि मुखी विठ्ठलाचं नाव...
सासवड आल्यावर मग एकदा वाकून माऊलींना नमस्कार केला आणि माघारी फिरलो. या वारीत अनेक अनुभव आले. लहान - थोरांपासून चालणारी माणसे, अनुशासन, आणि विठ्ठलाची अनामिक ओढ. सगळंच कसं भारावून टाकणारं.
नक्कीच या वारीला परमेश्व्राचा आशिर्वाद असणार म्हणूनच आजपर्यंत वारीत काही गडबड झाल्याचे ऐकवित नाही, आणि कधी होणारही नाही...

असो, तर या वारीची ही काही क्षणचित्रे..

!! बोला.. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम..
पंढरीनाथ महाराज की जय !!

=============================================================================

माऊलींचा रथ

पादुका

माऊलींचा अश्व

स्वाराचा अश्व

टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग
विठ्ठलाच्या दारी आज रंगला अभंग

माऊलींच्या रथाचा स्पर्श करण्याची धडपड

फुगडी

आणि किश्याने फुगडी घातली

बाल वारकरी

दिवेघाट

गुलमोहर: 

अ हा हा .......काय सुंदर पकडलेत हे सगळे क्षण कॅमेर्‍यात...लाजवाब
तो "बालवारकरी" मनात ठसून राहिला अगदी....

सुर्रेख फोटो आहेत. वारकर्‍यांच्या आयुष्यातले हलके फुलके क्षण ही छान टिपलेत स्मिहा!

Pages