खास मध्यप्रदेशातील नवरात्र उत्सव

Submitted by वर्षू. on 14 October, 2011 - 03:26

नवर्‍याने या वर्षी दसर्‍याला खास मध्यप्रदेशात जायचे निश्चित केले. (हे त्याचे गेल्या ३० वर्षांपासून चं स्वप्न होतं)त्याच्या या 'जिंदगी ना मिले दोबारा' स्टाईल च्या मुद्दाम घेतलेल्या सुट्टीमुळे ,तिथल्या विविध शहरातून पसरलेल्या त्याच्या बालपणीच्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला.
तिथे अजून ही चौका चौकांतून दुर्गेच्या भव्य मूर्ती बसवल्या जातात. त्यांच्या आसपास आरास म्हणून विभिन्न पौराणिक प्रसंगांचे देखावे उभारले जातात. नऊ दिवस उत्सव चालतो. इथे गरबा हा प्रकार होत नसला तरी लाऊड स्पीकरवरून भजनं ,फिल्मी गाणी वाजत राहतात. संध्याकाळी ठिकठिकाणच्या मूर्ती,आरास पाहायला तुफान गर्दी लोटते.
उत्सवाची सांगता दसर्‍याच्या दिवशी एखाद्या मोठ्या मैदानावर रावण दहनाने होते. १०,१५ फूट उंचीचे रावण उभे केले जातात. त्यांच्या पाठीत पोकळ जागेत निरनिराळे फटाके ठेवण्यात येतात. रावण दहन होत असता ,संपूर्ण आसमंत फटाक्यांच्या दणक्यांनी भरून जातो.

जबलपूर

बिलासपूर

रायपूर- रावण दहन

गुलमोहर: 

मस्तच Happy

जन्माष्ट्मी -राखीला भरणारा बाजार डोळ्यासमोर आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लहान्-लहान दुकानांतून लाकडी खेळणी, रंगीत चपेटे,योयो, भोवरा,पतंगाच्या मांज्याची चक्री, पांगुळगाडे आणि चिटाचे लहन मुलांचे कपडे अशा विविध मालानी सज्ज असायचा. ओळींच्या सुरवातीला आणि शेवटाला चाट्,भेळपुरीची रेलचेल !
दसर्^याला सिमोल्लंघनाला गुप्तेश्वरला रेल्वेलाईन पलिकडे मदन महाल जवळ्च्या मंदिरा पर्यंत जाऊन येताना आपट्याची पानं आणायची. घरी दीवाला -मग आई-वडील ,इतर थोरांना देऊन मित्रांच्या घ्होळक्यात मिसाळायच आणि गावभर ओळखीच्य घरी जाऊन सोन लुटायच रात्र होईस्तोवर्;प्रत्येक घरी खाण झाल्यामुळे भूक नसायची तरी आईच्या आग्रहास्तव पुरणपोळी किंवा केलेला गोड पदार्थ खाऊन उद्याच्या शिळ्या दसरर्^या ची स्वप्न पहात झोपी जायच !
बालपणीचा पंचरंगी चपेटा -- हा आसा !

छानच फोटो! बिलासपूरच्या फोटोत कार्तिकेय आणि गणपतीबाप्पा दुर्गेच्या जवळ पाहून बरं वाटलं. मुंबईच्या शिवाजी पार्कवर जी देवी बसवली जाते त्यात लक्ष्मी, सरस्वती दुर्गेच्या जवळ आणि कार्तिकेय आणि गणपतीबाप्पा बिचारे इमिटेशन ज्वेलरीच्या किंवा साड्यांच्या दुकानात पुरुष कसे अवघडून दूर उभे असतात तसे उभे असलेले पाहून त्यांची दया येते. Happy त्या 'राधाकृष्ण नृत्य' फोटोचा फ्रन्ट व्ह्यू नाहिये का? राधाकृष्णाच्या मूर्ती गोजिर्‍या असाव्यात असं वाटतंय पण ज्या अ‍ॅन्गलने फोटो घेतलाय त्यातून नीट दिसत नाहियेत.

मस्तच .... दुसरा फोटो खूपच छान आलाय. रावण दहन च्या वेळी तिथे अफाट गर्दी होते. रावणाच्या पोटात फटाके ठेवून मग कोणी तरी 'नेता' बाण सोडतो आणि मग नुस्ता आवाज.... गरबा पण खूप ठिकाणी बघायला मिळतो.

मस्त

स्वप्ना.. Happy अगं त्या देखाव्याजवळ कुणाला जाऊ देत नव्हते.. दोन्ही कडे ओळीने देखावे आणी मधे देवीची मूर्ती. सर्व देखाव्यांभोवती अर्धगोल आकारात बार्स लावून जवळ,आतपर्यन्त जायचा रस्ता बन्द केला होता..म्हणून या अँगल्ने फोटो काढावे लागले.

मस्तच आलेत प्र चि.

शेवटुन तिसर्‍या प्र चि मधला रावण गांधीवादी आहे का Wink (गांधी टोपी घातले आहे ना)
शेवटुन दुसर्‍या प्र चि मधे रावणाच्या हाती तलवार ऐवजी छत्री चा भास होत आहे Wink
शेवट च्या प्र चि मधला रावण च्या मुख्य तोंडावरचे दाडी चे फ्रेच कट बाकिच्या तोंडावर दिसत नाहीये, अणि फ्रेंच कट फारच लहान ठेवलंय Proud

Pages