लावणी - सवाल जबाब

Submitted by TatuNana on 7 August, 2008 - 11:49

गंगू -

गोमुत्राने अंगण शिंपडले
पदर सावरीत, नारी पवित्र मी
अन शेणात तुझे हे पाय घसरले
आता हास बघु जरा फिदीफिदी
हो हो हो हो हो हो हो .... माझ्या राजा तू रं ...... माझ्या सर्‍जा तू रं

दाजिबा -

शेंबुडात ही सत्वे अस्ती
विचार जा हावरट शेजार्‍याला
अन फुकट्चे खात बसु नको तू
कार्टे गुमान जा तू सासरला
ग ग ग ग ग .... माझ्या राणी तू ग .... शेजारिणी तू ग

गंगू -

पायताणितील नक्शी आवडली
भरतकामात मी विणू कशी
पावशेर पियुनी डरकाळी फोडिते
हाडूक चाटित, ऊंदराची मी मावशी
हो हो हो हो हो हो हो .... माझ्या राजा तू रं ...... माझ्या सर्‍जा तू रं

दाजिबा -

चार आण्याचे सरबत पियूनी
बेवड्यावानी नाचू कसा
अन रक्त पियुनी ढेकुण म्हणतो
"अजुनी कोरडा माझा घसा"
ग ग ग ग ग .... माझ्या राणी तू ग .... शेजारिणी तू ग

गंगू -

निळी चड्डी, कमरेला पट्टा
फोउजदारी रुबाब तुझा जरी असा
टिचकी बसता, हळूच उडतो
चल हो बाजू माझ्या मोरपिसा
हो हो हो हो हो हो हो .... माझ्या राजा तू रं ...... माझ्या सर्‍जा तू रं

दाजिबा -

कालची रिटा रटाळ झाली
तरी तंग तिचे तोकडे हे कपडे
थै थै कसे नाचणार आता
मनातले हे किडे मकोडे
ग ग ग ग ग .... माझ्या राणी तू ग .... शेजारिणी तू ग

गंगू -

चांडाळा, तुला खवीस म्हणू की
लबाड म्हणूनी घेऊ मुका
कमरेखाली झटका बसला
आता ये मांडीवर बस लेका
हो हो हो हो हो हो हो .... माझ्या राजा तू रं ...... माझ्या सर्‍जा तू रं

दाजिबा -

नास्की वांगी, उष्टी रताळी
उगाच मिरवीत फिरू नको
अन हिरवा तुझा हा पालापाचोळा
आषाढितल्या गटारिला नको
ग ग ग ग ग .... माझ्या राणी तू ग .... शेजारिणी तू ग

अहो माणूस असे काय करता राव .....
मनातले हे किडे मकोडे !

?

हे एक तर माझ्या डोक्याच्या खूप वरचं आहे किंवा खूप वरवरचं आहे. तातुनाना, राग न मानता जरा समजाऊन सांगाल का?

तातुनाना, हे तुमचे सवाल जवाब आहेत का खरेच फडावरचे सवाल-जवाब आहेत? तसेही दोन्हीपैकी कुठलेही मला कधी कळणार नाहीत Happy

हे तर नुसते सवालच वाटतात.. काय कळेना...

==============

सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |

नमस्कार मंडळी ! मायबोलीवर माझे हे पहिले पाऊल. त्यामुळे एका तान्ह्या बाळाप्रमाणे स्वछंदाने बागड्ण्याचा प्रयत्न केला. बाळाला काय ठाऊक, पाऊल कुठे अन कसे पड्ते ते ? ते बिचारे फुलाफुलात फुलपाखरामागे धावताना आपल्या पाऊलखुणा जमिनीवरिल मातीत भराभरा ठेवीत जाते. तर मायबोली ही इथली बाग, तुम्ही सर्व फुलपाखरू अन तुमच्या कथा कविता ही फुलं. माझ्या संबोधनाचे नाव, व्याकरणा आणि शैली वरून तुम्हा जाणकार मंडळिना लक्षात आले असेलच ह्या बागेत हे अर्ध्या चड्डितले बाळ पहिल्यांदाच शिरलय. अहो म्हणून तर माझ्या रचनेला तुम्च्या फुला सारख्या रचनेच्या पायदळी असलेल्या पाऊलखुणा म्हट्ले आहे. बाळाला फुलाची आवड, म्हणऊन त्याला प्रत्येक फुलाचे कौतुक वाट्ते. एखादे पिवळे का अन दुसरी निळे, एक मोठे दुसरे लहान का हा फरक का हे त्याच्या बालबुद्धिला परवड्णारे नसते. त्यामुळे मी लिहिले ते माझे आनंद व्यक्त करण्याचे साधन होते. तुम्च्या पैकी काहींच्या कथा कविता वाचल्या आणि आपण बाळ आहोत ह्याची आपोआप प्रचिती झाली. आता लहान बाळाला कुणी "साल्या, बघ किती घाण केलिस. हे सगळ आता तू साफ केले पाहिजेस" असे म्हणून त्याची मानगुट कुणी पकडतं का ? प्रश्नांचा भडिमार करुन तुम्ही ह्या बाळाच्या तोन्डात बूच बसविलेत कि साहेब. तेव्हा काय चुकलं बिकलं तर माफ करा. तुमचं म्हणणं पटलं कारण बायकोने पण नेमके असलेच प्रश्न विचारले. रचनेत भाव, व्याकरण आणि सूर ह्यांची मांडणी मैफलितल्या जाजमावरती मला कदाचित व्यवस्थित जमलेली नाही. तरी एकलव्याची निश्ठा बाळ्गुन आणि जाळाला साक्ष मानून मी माझा अभ्यास चालू ठेविन म्हणतो. कधितरी हे बाळ धड्पड्त, चाचपडत, अगदीच नाहीतर शेवटी तडफडत एखाद्या फुलाचे बीज पेरेल म्हणतो. आता फक्त तुम्च्या कृपादृश्टिची आणि आशिर्वादासाठी नम्र विनंती आहे.

मला आधीचं तर काही कळलं नाहीच पण नंतरचं ललित पण कळलं नाही. किर्मिजी पेयाचा दणका बसल्याशिवाय न कळणारं असावं
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home