पहिलं प्रेम कसं विसरायचं ..............

Submitted by अमोल रमेश पाटिल on 10 October, 2011 - 03:39

पहिलं प्रेम कसं विसरायचं ........................ पहिलं प्रेम कसं विसरायचं ? प्रेमपत्र पत्राची सुरुवात प्रियने केली नाही, कारण ते लिहिण्याइतकी आज तू माझी राहिलेली नाहीस. असो. आपल्याशेवटच्या भेटीला आता चार वर्षे होतील. पण या चार वर्षांंत मी माझ्याशीही जे कधी बोललो नाही, ते आजया पत्रात लिहितोय. ते तुझ्यासाठी नाही तर फक्त माझ्या समाधानासाठी. चार वर्षांपूर्वी तुझा शेवटचा पेपर संपल्यानंतर कॉलेजच्या बाहेर आपण भेटलो होतो. खरं तर तुझ्या घरी आपल्याबद्दल कळल्यापासून आपल्याला प्रत ्यक्ष भेटणं फारसं कधी जमलंच नाही. पण तरीही आपण त्या दिवशी भेटलो. शेवटचं. तुझे आई-बाबा तुझ्यासाठी स्थळ शोधत असल्याचं त्या दिवशी तू मला सांगितलंस आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण मी तेव्हा तुला वचन दिलं, एका वर्षांत स्वत:च्या पायावर उभं राहूनतुझ्याशी लग्न करण्याचं. त्या दिवशीतुझा निरोप घेतला अन् मुंबई गाठली. या स्वप्ननगरीत अनेकांची स्वप्नं साकार होतात असं मी ऐकलं होतं. म्हणून मीही माझं इवलंसं स्वप्न घेऊन या स्वप्नवेडय़ांच्या गर्दीत सामील झालो. कधी रडत-पडत, कधी स्वत:च स्वत:ला सावरत मी प्रवास करू लागलो. आजूबाजूला असलेल्या लाखोंच्या गर्दीतही मी फक्त तुझाच विचार करत राहिलो. वाटायचं तुझ्याशी एकदातरी बोलावं. मात्र ते शक्य नव्हतं. पण अचानक एक दिवस तुझा फोन आला. नऊ-दहा मिनिटांचा कॉल तो. पण आपण दहा शब्दहीबोललो नाहीत, नुसतंच रडत राहिलो. मी मजेत आहे, तू फक्त तुझी काळजी घे म्हणत तू फोन ठेवलास तो कायमचा. मी झपाटल्यागत अभ्यासाला लागलो. अन् एकदिवस मुंबईतल्या एका मोठय़ा कॉलेजातून गोल्डमेडल मिळवून बाहेर पडलो. काही दिवसांतच मला नोकरीही मिळाली. अन् माझं स्वप्न साकार झालं. तुला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी त्याच दिवशी मुंबईहून तुझ्याकडे आलो. पण स्टेशनवरच मित्राकडून कळलं की दोन दिवसांपूर्वीच तू लव्ह मॅरेजकेलंस म्हणून. मी क्षणात उद्ध्वस्त झालो. माझ्या सगळ्या स्वप्नांचा अक्षरश: चक्काचूर झाला. काय करावं काहीच सुचत नव्हतं. क्षणभर वाटलं, उधळून टाकावं या आयुष्याला आणि व्हावं एकदाच मुक्त या भावनांच्या जीवघेण्या खेळातून. पण.. त्यातूनही काहीच साध्य होणार नव्हतं. मी तसाच मुंबईत परतलो. पण यावेळी माझ्या आयुष्याला काही अर्थच उरला नव्हता. फक्त जगायचं म्हणून जगत होतो. दिवस लोकांच्या गर्दीत, कामाच्या व्यापात कसाबसा सरायचा पण रात्र मात्र खूप छळायची. रात्र-रात्र जागून काढायचो. खूप खूप विचार केला, पण माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं शेवटी ते तुझ्या व्यावहारिक निर्णयातूनच मिळालं. म्हणून मी ठरवलं. बस्स! आजपासून फक्त आपल्यावर प्रेम करणाऱ्यासाठीच जगायचं. त्या रात्री मी डायरीची सगळी पानं फाडून फेकून दिली. कवितांच्या वहीची होळी केली. मला छळणाऱ्या तुझ्या सगळ्या आठवणी फेकून दिल्या आणि आयुष्याची नव्याने सुरूवात केली. पण काळजावरच्या जखमा मला अजूनही पूर्णपणे मिटवता आल्या नाहीत हेही तितकंच खरं. तू सोडून गेल्यापासून मी तुला भेटण्याचा, तुझ्याबद्दल जाणून घेण्याचा किंवा तुझ्यापर्यंत काही पोहचवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. तुला नाइलाजाने लग्न करावं लागलं असतं तर तसा प्रयत्न केलाही असता, पण मी तसा प्रयत्न करावा असं आता काहीही उरलं नव्हतं. तू तुझ्या आयुष्याचा निर्णय घेतलायस. तो चांगलाच असेल. आता तुझ्या नव्या आयुष्यात येणंच सोड साधा विचार करणंही हास्यास्पद ठरलं असतं. म्हणून मी ते सगळं स्वप्न समजून विसरतोय. पण तरीही अनेक प्रश्न बोचत राहतात. तू तुझ्या आयुष्याचा निर्णयघेऊन मोकळी झालीस पण तो निर्णय घेताना क्षणभर तरी माझा विचार केलासका? तू सोडून गेल्यावर माझं काय झालं असेल, मी जिवंत आहे की नाही हे तरी कुणाहाती विचारलंस का? मला सांग, तुला हा डाव उधळूनच द्यायचा होता तर मग तो मांडायला सांगितलसच कशाला? रात्र-रात्र जागून आपण पाहिलेली ती सगळी स्वप्नं फक्त माझीएकट्याचीच होती का? जाऊ दे, या सगळ्या प्रश्नांना आता काहीच अर्थ उरला नाही. गेल्या चार वर्षांत मला तीन मुलींनी प्रपोज केलं. दोन मुलींबद्दल मीही थोडा विचार केला, पण मला पुढे जाता आलं नाही. त्यांच्यात गुंतायला लागल्याचं कळताच सगळी नाती तोडून टाकली. त्यांच्यापासून कायमचा दूर झालो. कारण आता कुणावर जीव लावायचा,कुणात गुंतावयाचा धीर होत नाही. कुणात गुंतायचं म्हटलं तरी काळजात धस्स होतं. याचा अर्थ मी अजूनही तुझ्यातच गुंतलोय असं नाही. फक्त मला पुन्हा उद्ध्वस्त व्हायचं नाही एवढंच! माझाच मी पहिलं प्रेम कसं विसरायचं ..............

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गेल्या चार वर्षांत मला तीन मुलींनी प्रपोज केलं. दोन मुलींबद्दल मीही थोडा विचार केला, पण मला पुढे जाता आलं नाही

कॉपी पेस्ट करताना आकडे तरी बदलायचे की ! तेही नाही !! Proud

हे वृत्त कुठलं आहे ?

अमोल रमेश पाटील
तुम्ही माझे प्रतिसाद कॉम्प्लिमेंट म्हणून घेताय ना ?
कि थोडीफार लाज आहे अजून ?

दुष्ट मायबोलीकर इथे लेखकावर उगाच टीका करत आहेत.
हर्षद सावंत आणि अमोल पाटील यांचे पहिले प्रेम एकच नसेल कशावरून? Wink