अगर अगर / चायना ग्रास वापरुन खरवस

Submitted by दिनेश. on 9 October, 2011 - 14:39
लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार ते सहा जणांना पुरेल.
अधिक टिपा: 

क्ष

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा, हे मला जमेल.
कस्टर्डसारखं लागेल का हे ? Uhoh ( अडाणी प्रश्न !)

मी मागे एकदा केलेला खरवस (ताज्या चिकाचा)बिघडला. अता मात्र जरूर करून पाहीन. सोपा वाटतोय.
रच्याकने दिनेशदा, काल मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आलू-पराठे केले, मस्त झाले. घरात सर्वांना खूप आवडले.

हे खरवसासारखेच लागते. बिघडायची शक्यता नाहीच. फक्त चायना ग्रास पूर्णपणे
विरघळले पाहिजे.

Happy हे आगर आगर या नावाने इंडोनेशिया ला अतिशय पॉप्युलर आहे. त्यांचे बहुतेक डेजर्ट्स हे वापरून केले जातात. करायला खूप सोपा व पचायला ही खूप हलका असतो ..

पण बाकी फरक जाणवत नाही.

कसा नाही जाणवणार? ताज्या चिकाच्या गुळ घालुन केलेल्या, चुलीवर वाफवलेल्या आणि खालुन थोड्याश्या लागलेल्या, केळीच्या पानावर घेऊन खाल्लेल्या खरवसाची सर बाजारच्या खरवसाला थोडीच येणार? मी पणशीकराकडे खरवस घेऊन खाते नी मनातल्या मनात घरच्या म्हशीच्या खरवसाची आठवण करते. Happy

रेसिपी छान आहे. करुन पाहायला हरकत नाही.

मागे इथे कोणीतरी स्पॅनिश फ्लानची कृती दिली होती. त्याची चवही बरीचशी खरवसासारखीच लागते. पदार्थ करताना मला माहित नव्हते चव कशी लागेल ते पण खाताना खरवसासारखी चव तोंडात आल्यावर अचानक जुने कोणीतरी ओळखीचे भेटल्याचा आनंद झाला. Happy

हा खरवस यSSSSssम्मी दिसतोय... Happy

ताज्या चिकाच्या गुळ घालुन केलेल्या, चुलीवर वाफवलेल्या आणि खालुन थोड्याश्या लागलेल्या, केळीच्या पानावर घेऊन खाल्लेल्या खरवसाची सर बाजारच्या खरवसाला थोडीच येणार? >> म्ह्हं....तेच तर..

फारच छान. पण भारतात असे सुट्टे चाइना ग्रास मिलते का ? अगर अगर मिलते का ? मला तरी अत्ता पर्यंत रेडी चाइना ग्रास जे आधीच फ्लेवर घातलेले असते ते माहीत आहे. ते मी नेहेमी करते. पण जर raw मिळाले तर त्याला जायफल वगैरे घालून छान खार्वसाची चव आणता येइल.

तोंडाला पाणी सुटले. धंस दिनेशदा !!!!

छान सोपी रेसिपी आहे. हे अगार अगार म्हणजेच चायना ग्रास का? कॉलेजात मायक्रोबायॉलॉजीच्या प्रॅक्ट्सला हेच वापरुन आम्ही मिडियम बनवायचो पेट्रिडिशमध्ये ओतण्यासाठी.

मीरा, ते नुसतेही मिळते.
अश्विनी, हो तेच ते. मिडियम म्हणुनही वापरता येते.

केनयामधे भरपुर गाईगुरे असली तरी चीक मिळत नाही. स्थानिक लोकांच्या मते त्यावर वासराचा आणि वासराचाच हक्क असतो. (आणि ते खरेही आहे.)

खरवस चांगला दिसतोय. केनियात चीक न मिळण्यामागचं कारण वाचून छान वाटलं.
या पाककृतीत होल मिल्क वापरले आहे का?

सुमेधा, भारतात हे चायना ग्रास नावानेच मिळते. (पुर्वी ब्ल्यू बर्ड चे मिळायचे.)
मैना, हो मी होल दूध वापरलेय पण लो फ़ॅट वापरले तरी चालेल.

सही दिनेशदा..
खरवस लई आवडतो.. नक्की करणार.. (वासरू वाल्या कारणासाठीच खात नव्हते अलीकडे)
(अगोची खरवसाची कृतीही चांगली आहे)

फोटु दिसत नाहित Sad चान्गली माहिती, करुन बघायला हव Happy
पण हे अगर अगर/चायना ग्रास कुठे केवढ्याला मिळेल?

लिंबू. साधारणपणे मोठ्या दुकानात याच नावाने मिळेल. ३०/४० रुपयांपेक्षा जास्त किंमत नसावी.
मुख्य म्हणजे हे वानस्पतिजन्य उत्पादन आहे, त्यात काही खनिजे व किंचीन आयोडीन आहे. पोटासाठी चांगलेच आहे.
इतर गोड पदार्थांपेक्षा (बासुंदी, श्रीखंड ) कॅलरीज खुपच कमी आहेत.

करून बघणार. मला असे मऊ जिभेवर विरघळणारे गार गोड पदार्थ फार आवडतात. टीवी बघत बघत खायाचे व हळूच झोपी जायाचे. ठाण्याच्या ग्राहक पेठेतून मी केशर इलायची सिरप आणले आहे ते घालून बघीन.

१) दूध तापवत ठेवा व ते कोमट झाले की त्यात अगर अगर सोडून बाकिचे जिन्नस मिसळा.
२) नीट ढवळून साखर विरघळू द्या, मग त्यावर अगर अगर शिंपडा.

शिंपडा म्हणजे लिक्विड आहे का?

आमच्याइथे त्या काड्या मिळतात.

खाण्यासारखे कप्...त्यात ज्यूस ठेवा अगर आईस्क्रीम.. ते खाऊन झाल्यावर कपच खाऊन टाका
http://www.care2.com/greenliving/edible-cups-make-delicious-addition-to-...
http://www.toxel.com/tech/2010/07/25/edible-cups-made-from-jello/
हे अगर ने बनवलेले असते.
http://www.nerdist.com/2010/08/food-science-agar-agar-solo-cups/
कोणीतरी पेटंट घेतले आहे ह्याचे...

अगर मिळते का किराणा मालाच्या दुकानात.. कप तयार करून बघता येतील घरी..

जागू, काड्या असतील तर त्या बारिक कापून घ्याव्या लागतात. मग ती पावडर शिंपडायची, एकाचवेळी टाकलं तर त्याचा गोळा होतो.
लिंबू, गूळ, नारळाचे दूधही चालते.

मी खुप आधी केला होता चायनाग्रास अगदी शाळेत असताना. आता आठवत नव्हत. धन्स.

मी काल प्रयोग करुन पाहिला. पण फोटो सारखी वडी पडली नाही. थोडे custard सारखे वाटले.
मी साधारण २०० ml दुधात एक पाकीट (८ ग्राम) अगर अगर वापरले.
अगर अगर दुध गार झाल्यावर वापरायचे असते का? पाकीटावर warm milk/liquid ला add करा असे लिहले होते. मी उकळलेल्या दुधात पावडर घातली होती.
काजु पावडर वापरली नाही.
काय बरे चुकले? Sad

Pages