अ‍ॅन्ड्रॉईड आणि त्यांचे काही उपयोगी अ‍ॅप्लिकेशन्स..!!

Submitted by उदयन.. on 8 October, 2011 - 06:54

अ‍ॅन्ड्रॉईड बद्दल बरेच काही छान चांगल्यागोष्टी आहेत
मी सुध्दा अ‍ॅन्ड्रॉईड फोन घेतला.. सुरुवातीला अतिशय कंटाळा आलेला काय ही ब्याद गळ्यात आहे म्हणुन पण जेव्हा त्यात इंटरनेट चालु करुन घेतले आणि मार्केट मधुन एक एक अप्लिकेशन्स डाउनलोड केले मग काही चांगला वाटला... फार उपयोगी काही app. आहेत
त्यातले काही खालील प्रमाने.. :

super security beta 1.23 ;- हा अँटीवायरस प्रोग्राम आहे... स्कॅन करतो..मेलवेअर, हायरिस्क app. कोणती आहेत हे सुध्दा सांगतो..तसेच त्यात एक स्ट्राँगबॉक्स म्हणुन आहे त्यात आपन पासवर्ड वापरुन आपले फोटो विडिओ एसएमएस साठवु शकतो..मुख्य म्हणजे जे काही आपण यात टाकले ते बाहेर गॅलरीत दिसत नाही.. Happy
आणि जो पासवर्ड असतो तो आपल्या इमेल वर मेल म्हणुन येतो..म्हणजे विसरलात तरी प्रोब्लेम नाही.. Happy

Android assistant :- app. अनइन्स्टोल करणे.. फोन मेमरी मोकळी करणे. cache cleaner Volume control इत्यादी यात सहज पणे करता येते file manager सुध्दा यात आहे जो आपल्याला फोन मधे उपलब्ध नसतो..

sms blocker :- हा अत्यंत उपयोगी app. आहे... आपल्याला नको असलेले नंबरांवरुन जे मेसेज येतात त्यांचा नंबर यात टाकला की आपल्याला त्यावरुन मेसेज येतच नाहीत हा app. ते ब्लॉक करुन टाकतो

m-indicator :- आपल्याला लोकल्स ट्रेन किती वाजता ची आहे हे कळण्यासाठी उपयोगी आहे..त्याच बरोबर यात बस चे नंबर सुध्दा आहे त्याचे रस्ते सुध्दा कळतात.. मेगा ब्लॉक्स ची माहीती मेसेज वरुन आपल्याला कळते..

camscanner :- कागद पत्रांचे पीडीफ मधे रुपांतर यात करु शकतात... जर आपल्या कडे स्कॅनर नाही तर आपण कागद समोर ठेउन त्याच्या या app. ने फोटो काढायचा आणि तो मस्त पैकी साफसुफ करुन हा पीडीफ स्वरुपात आपल्या समोर ठेवतो.. अतिशय स्पष्ट लिहिलेले दिसते यातुन..

flashlight :- आपल्या मोबाइल चा टोर्च म्हणुन उपयोग करण्यासाठी हा app. वापरात येतो.. लाइट कमी जास्त करन्याची सुध्दा सोय आहे यात.

Net Counter - नेट वापरताना किती डेटा वापर होतो याची नोंद मिळते.

Battery Doctor - कोणत्या अ‍ॅप साठी बॅटरी जास्त वापरली जाते हे कळते. त्यानुसार ते अ‍ॅप बंद करता येतात. पर्यायाने बॅटरी लाईफ वाढवता येते.

ES File Explorer - file/folder management साठी उत्तम.

Go Launcher - सुंदर UI Themes. ह्याच्या स्वतःच्या Themes छान आहेत. एक iPhone सारखी Theme पण आहे.

GPS Essentials - GPS Tracking साठी

Indian Rail - Online inquiry / train timings / seat availability साठी

Offline Dictionary - ह्यात Dictionary बरोबर language translation पण आहे - ते सुद्धा offline. पण मोठ्या-मोठ्या database files एकदा(च) download कराव्या लागतात.

LBE Privacy Guard - हा firewall चे काम करतो. [पण ह्यासाठी root access हवा.]

Photo Tools by hcpl: विविध छायाचित्रणासंबंधी गणकयंत्रे

PhotoFunia: छायाचित्रणासाठी व नंतर प्रोसेसिंग साठी लागणार्‍या करामती...

App 2 SD (move app to SD);- आपले फोन मधले अ‍ॅप्लिकेशन्स मेमरी कार्ड मधे जमा करते त्या मुळे फोन मेमरी फ्री राहते आणि जास्त जागा मोकळी राहाते

Photo Art - Color Effects = मस्त आहे हे.....अ‍ॅप्लिकेशन...एक विशिष्ट रंग कायम ठेवुन बाकीचे रंग रंगविरहित करता येतात फोटो मधले

पॉवरलाईन : २ (चकटफू व्हर्जन) किंवा अधिक (१.५ $ला) गोष्टी आडवी रेघ वापरून दाखवते. जसे की बॅटरी, सीपीयू वर्कलोड वगैरे. साधे, अवाजवी जागा न व्यापणारे असे अ‍ॅप आहे.

fm radio india :- नावाचे एक छान अ‍ॅप आहे ऑनलाइन रेडिओ ऐकण्यासाठी. भरपूर चॅनेल्स आहेत रेडिओची त्यावर. एक मराठी गाण्यांचेही चॅनेल आहे. मला आवडलं अ‍ॅप. ट्राय करून पहा

Stuck on Earth :- भटक्यांसाठी बेस्ट अ‍ॅप....यात तूम्हि तूमची ट्रीप प्लॅन करु शकतात....तिठल्या ठिकाणांचे लोकांनी काढलेले फोटो पाहू शकतात आणि बरच काही....

TripAdvisor :-हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फ्लईट्स, Things to do in city...

AppLock :- हे लॉक अ‍ॅप्लिकेशन आहे......यात तुम्ही हवे ते अ‍ॅप्लिकेशन, मेस्सेज, जीमेल व्हॉट्सप्प आणि इतर अ‍ॅप्लिकेशन लॉक करु शकतात... यात पासवर्ड ची सुविधा आहे..... अ‍ॅप्लिकेशन ओपन करताना पासवर्ड ची गरज लागते .

Distance calculator:- आपण किती चाललो याचा हिशोब ठेवणारे अ‍ॅप्लिकेशन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके. धन्यवाद Happy पण असं होतच राहणार का? सर्विस प्रोव्हायडरकडे कंप्लेंट द्यावी लागते का ह्यासाठी?

एक तर तुमच्या इथे टॉवर चा प्रोब्लेम आहे नाहीतर मोबाईल मधे.........एकदा डॉक्टर ला दाखवुन घे या मोबाईल चे सिमकार्ड बदला दुसर्या नेटवर्क चे टाकुन बघा........

सेम प्रोब्लेम आला तर मोबाईल मधे दोष... जर नाही आला तर तुमच्या सीम मधे दोष

ह्म्म्म. साधारण २-३ दिवसांतून एकदा असं होतंय आणि घरी/ऑफिसमध्ये कुठेही होतंय म्हणजे टॉवरचा प्रॉब्लेम नसावा. सोनीच्या डॉक्टरांना दाखवून घेते. थँक्स Happy

सोनी चा आहे............ मग थांबा आधी सिमकार्ड बदला.......... तुम्ही कट करुन घेतले आहे का सिम... असल्यास ऑरिजनल मायक्रो सिम मिळते त्यात नंबर ट्रांस्फर करुन घ्या........ ते वापरा....... कटींग करत असताना बहुतेक सिम ला दुखापत झाली असेल म्हणुन प्रोब्लेम देतोय

अरे मी नविन मायक्रो सिम घेतलं आहे नविन फोन घेतला तेव्हा. कट केलेलं नाहिये. आणि आता १ वर्ष व्हायला आल्यावर मधूनच कधीही ते नोटिफिकेशन येतंय. MTNL ला फोन करुन पण बघते. मी साधारण असं पण लक्ष ठेवलं की मोबाईल डेटा ऑफ किंवा ऑन करताना हे होतंय का. पण तसंही नाही. कधीही ते दोन पिवळे त्रिकोण यून उभे राहतात.

१५०३ ला फोन लावून विचारलं. तिथल्या बाई म्हणाल्या एक्स्चेंजमधल्या ग्राहक सेवा केंद्रात सिम नेऊन दाखवा. खराब झालं असेल तर बदलून मिळेल.

फोनमधून एकदाही बाहेर न काढता सिम खराब होतं Uhoh सिल्कच्या साड्यांसारखी अधून मधून ऊन्हं दाखवायला हवी होती का सिमला? Proud

केश्वे ! Biggrin

एकदा फोन पॉवर ड्रेन करून पहा. फोनचे सगळे अ‍ॅप्स बंद कर. नंतर फोन स्विच ऑफ कर. सिम काढ, मेमरी कार्ड असेल तर तेही काढ. बॅटरी निघत असेल तर तीही काढ. आता पॉवर ऑन/ऑफ स्विच १५/२० सेकंद प्रेस करून ठेव. नंतर, सगळं रि-असेंबल कर अन चालू कर.

बॅटरी निघत नसेल तर कसं करायचं एक्स्पिरिआला ते पहावं लागेल. बहुधा पॉवर स्विच + व्हॉल्यूम डाऊन स्विच एकदम प्रेस करायचे असं काही असतं...

योग्या, अजून मी माझ्या फोनला उघडलाच नाहिये एकदाही. त्यामुळे मी अंदाजाने कार्ड्स काढणं वगैरे काही केलं तर मोडतोड व्हायची शक्यता. ती उचकाउचकी आणि पुन्हा बसवाबसवी कशी करायची ते बघून ठेवायला लागेल.

उगाच फोन चे आेपरेशन करू नये
रूग्ण दगावण्याची शक्यता आहे
डाक्टरलाच आेपरेशन करू द्यावे Happy

मी इतके किमी चालले हे (नव-यापुढे प्रुव्ह करायला) डिस्टन्स कॅलक्युलेटरचे अॅप आहे का? नवरा सोबतीला येत नाही तोंडाचे अॅप चालू रहाते एकत्र गेलो की!!!

माझ्या फोनवर व्हॉट्सॅप कॉल्स नीट ऐकू येत नाहित किंवा अजिबातच काही ऐकू येत नाही. पण माझं बोलणं पलिकडे चांगलं मोठ्याने ऐकू येतं. अजून माझ्या एक दोन मैत्रिणींनाही त्यांच्या फोनवर हा प्रॉब्लेम येतो त्यामुळे व्हॉट्सॅप कॉलींग वापरताच येत नाही. कुणी कॉल केलाच तर अ‍ॅ अ‍ॅ करत बसावं लागतं. परवा दसर्‍यानिमित्ताने माझ्या एक्स बॉसच्या बायकोने (जी आमची खूप चांगली आणि बडबडी मैत्रिण आहे) त्यांच्या सद्ध्याच्या लोकेशनहून (मॉरिशस्)हून फोन केला माझ्या फोनवर. मी अगदी कानात प्राण आणून ऐकायचा प्रयत्न करत होते पण खूप दुरून असा अस्पष्ट आवाज ऐकू येत होता. तिला तिकडे सद्ध्या मैत्रिणी नाहित म्हणून ती आमच्याशी गप्पा मारायला बघते पण आम्ही बोलूच शकत नाहियोत. एम्बॅरेसिंग वाटून मी दुसर्‍या मैत्रिणीच्या हातात फोन दिला तर तिलाही काही ऐकू येईना. आदल्याच दिवशी तिलाही तिने फोन केला होता पण तिच्या फोनवरही ऐकू येत नव्हते. अशी विचित्र अवस्था टाळण्यासाठी गूगलमहाराजांना विचारलं तर त्यांनी काही सांगितलं नाही. मग म्हटलं आपल्या हुशार माबोकरांना विचारुन पहावं.

हे व्हॉट्सॅप कॉलवर ऐकू न येणं कसं फिक्स करायचं? कुणीतरी सांगा प्लिज.

मला बहिरेपणाचा प्रॉब्लेम नाही :-P. वायफायही चांगलं आहे.

स्काईप वर एकदा ट्राय करून बघा.

जर तिथे पण प्रोब्लेम येत असेल तर तुमच्या वायफायचा स्पीड कॉलिंग साठी फार कमी आहे. आणि स्काईपवर इतरांचा आवाज व्यवस्थित येत असेल तर व्हॉट्सअप परत रिइंस्टॉल करून बघा.

मी स्काईपवर नाहिये. बाकी सगळं दणदणीत ऐकू येतं. व्हॉट्सॅपवर आलेल्या ऑडिओ क्लिप्स पण मस्त ऐकू येतात. अजून कसं चेक करता येईल?

व्हॉट्सॅप रिइंस्टॉल केलं तर आधीचं सगळं जाईल का?

नाही जात डाटा . रिइन्स्टॉल करताना अ‍ॅप्लिकेशन तुम्हाला जुना डाटा हवा का विचारतो. तेव्हा ते यस करा.
स्काईपवर या इतर अ‍ॅप्लिकेशन वर कॉलिंग करून बघा.

मानव, माझ्या फोनचा व्हॉल्यूम नेहमी फुल असतो. व्हॉट्सॅप कॉल सुरु झाल्यावर तो आपोआप कमी होण्याची शक्यता असते का? असल्यास कॉल सुरु झाल्यावर तेही ट्राय करुन पाहिन. पण लोकांना तसं काही न करताच माझं बोलणं स्पष्ट ऐकू येतं. आत्ताच भावालाही फोन करुन त्याला ऐकू येतं का विचारलं ताजं ताजं Biggrin

ओके सक्रिय. VIBER पण डालो करावं लागेल. आधी व्हॉल्यूम आपोआप लो होतो का बघते. ते होत नसेल तर व्हॉट्सॅप रिइन्स्टॉल करुन बघते. तरीही नाही झालं तर दुसर्‍या अ‍ॅपवर चेक करुन बघते. धन्यवाद.

आधी दुसर्‍या अ‍ॅप वर चेक करून बघा. मग व्हॉट्सप काढा. दुसर्‍या अ‍ॅप वर पण प्रॉब्लेम असेल तरच व्हॉट्सप रिइन्स्टॉल करा.

अ‍ॅप्लिकेशन प्रमाणे व्हॉल्युम कमी जास्त करता येतो.
व्हॉट्स अ‍ॅप व्हिडिओ / ऑडिओ व्हॉल्युम फुल असेल तरी, व्हॉट्स अ‍ॅप कॉलचा व्हॉल्युम कमी जास्त करता येतो.
त्याने इतर अ‍ॅप अथवा नॉर्मल फोन कॉल च्या व्हॉल्युमला फरक पडत नाही.

व्हॉट्स अ‍ॅप कॉल ला व्हॉल्युम कमी असेलच असे नाही, इतर प्रॉब्लेमही असू शकेल,
व्हॉट्स अ‍ॅप कॉल सुरु असताना एकदा व्हॉल्युम वाढवून बघायला हरकत नाही.

Pages