इतिहास बदलण्याची संधी

Submitted by नथिंगनेस on 7 October, 2011 - 15:23

समजा,इतिहासात घडलेल्या काही घटना बदलण्याची किंवा थांबवण्याची जर आपणास संधी मिळाली तर आपण कोणती घटना बदलाल,थांबवाल आणि का?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोल निलिमा खरं आहे. पण त्यामुळे अजून एक आठवले.

पृथ्वीराज चौहानने शहाबुद्दीन महंमद घौरीला पहिल्यांदा हारवून पण सोडले. त्याला सोडूच दिले नसते. दिल्लीवर राज्य राजपुतांचे राहिले असते. Happy ही असली उदार मानसिकता आपल्याला नेहमीच महाग पडली आहे. त्या नजिबाला पण मल्हाररावाने असेच सोडले अन पानिपत घडले.

नथिंगनेस टाईम मशिन इन्वेंट करणार आहेत काय? Happy

ईतिहास बदलता आला तर ?

बदलण्या जोग्या ईतक्या गोष्टी, ईतक्या जागा आहेत की गणती करता येणार नाही,

बदलायचच असेल तर भारताचा समूळ ईतिहास बदलावा, जेणे करून दगाबाजी करून /घरचे भेदी वापरून/
छोट्या फायद्याला भूलुन केलेली सगळी राजकारण समीकरण बदलतील.

वासूदेव बळवंत फडके सारखा आद्य क्रांतीकारक ज्याने संपुर्ण ईंग्रज सरकारला जेरीस आणले त्याला
एका वैद्याने दगाबाजी करून पकडून दिले. त्या नंतर ह्या क्रांतीकारीला एडन येथे (यमन देशात) जेल बंद
ठेवले होते,

इव्होलुशनच्या मार्गातले मिसिंग लिंक्स एक्स्टिंक्ट होण्यापासून रोखले असते...

छपाईचा, फिल्म , ऑडिओ रेकॉर्डिंगचा शोध निदान काही हजार वर्षे मागे केला असता.

एच आय व्ही व्हायरसला रोखले असते

व्हॅक्सिन, अँटीबायोटिक्स, डायग्नोस्टिक इमेजींग, अनेस्थेशिया हे सर्व शोध हजारो वर्षे मागे केले असते

हा बाफ वाहुन जाण्यापासुन थांबवला असता.

अर्थात ज्याप्रमाणे गांधी कधी ना कधी मेलेच असते त्याचप्रमाणे इतर गोष्टींचे:
मायबोली पण कधी तरी नष्ट होणार, तुम्ही आम्ही पण. त्यामुळे ईतिहास बदलायचा तो कुणाकरता, किती कालावधी करता असेपण उपप्रश्न यायला हवेत.

ही पोस्ट यायला नको होती.

हा बाफ वाहुन जाऊ नये यासाठी एडमीनला तो लेखनाच्या धाग्यात रुपांतरीत करायण्याचा संदेश दिला आहे. असे रुपांतरण होऊ शकते का?

काहीही बदलले नसते, कारण जे बदलेन त्याने चांगलेच झाले असते हे लॉजिकच चुकीचे आहे.
तरीही बिग बँग हाच सर्वोत्तम पर्याय आहे!!!

जे घडते ते घडणारच असते. इतिहास बदलणे शक्य नसते. कारण science प्रमाणे conflict आहे.

उदा. - आत्ता नथिंगनेस ने हा धागा परवा चालु केला. समजा मी इतिहासात जाउन हा धागा चालु करु दिला नाहि. पण वर्तमानात तर धागा चालु आहे. म्हंणजेच भविष्य बदलले. पण जे बदलले ते भविष्यच नाहि. कारण भुतकाळाच्या द्रुष्टीने असलेले भविष्य म्हणजे आत्ताचा वर्तमानकाळ आहे. आणी आत्त्ताचा वर्तमानकाळ खरा आहे.

असो. सांगायचा मुद्दा हा होता की जे झाले आहे इतिहासात तेच होणार होते आणी जे झाले आहे तेच बरोबर आहे. त्यामुळे मला तरी इतिहासात जाउन काहि बदलायची इच्छा नाहि. कारण जर काहि बदलले (मुघलांचे भारतावरील आक्रमण ही घटना जर घडली नसती, पृथ्वीराज चौहानने शहाबुद्दीन महंमद घौरीला सोडुन दिले नसते, शिवाजी महाराज अजुन २५ वर्षे जगले असते, महात्मा गांधी अजुन २५ वर्षे जगले असते वगैरे वगैरे), तर मी जन्माला आलो असतो की नाहि हे देखील सांगता येत नाहि.