महाराष्ट्र दर्शन. - पैठण

Submitted by मुरारी on 28 September, 2011 - 00:11

महाराष्ट्र दर्शन - अंबाजोगाई

महाराष्ट्र दर्शन - देवगिरी

आजचा दिवस "पैठण" साठी राखून ठेवला होता...... सकाळी मस्त आराम केला... दुपारी २ वाजता MTDC चीच "तवेरा" न्यायला आली......

मागे एकदा मी पैठण ला जाऊन आलो होतो.... पण खूप लहान होतो त्यावेळी....
बाकी पैठण्या स्वस्तात मिळणार म्हणून " महिला मंडळ " आनंदात होतं. साधारण ४ च्या सुमारास पैठण ला पोहोचलो. एकनाथ महाराजांची जन्म आणि कर्म भूमी म्हणून हे गाव खूप प्रसिद्ध आहे.

एकनाथ महाराजांचा वाडा अजूनही तितक्याच सुस्थितीत आहे...

समोरच गोदावरी नदी वाहत होती(बहुदा.. पक्का माहित नाही.. जाणकारांनी प्रकाश टाकावा )..... तिच्याच काठावर थोडे विसावलो...आज नेमका मी कॅमेरा हॉटेल वर विसरलो होतो.... नशीब मोबिल होता....

तिथून मग "पैठण्यांच्या दुकानात" मजबूत shopping सुरु झाली...

जाता जाता जायकवाडी धरण बघायचं ठरलं... मला वाटलं असेल साधं एखादं धरण असतं तसं..
आत्तापर्यंत मी "बारवी आणि चिखलोली" हि दोनच धरण बघितलेली होती....
म्हणून इतका काही उत्साही नव्हतो...

हळू हळू सूर्यास्त होत होता...

जायकवाडी धरणावर चढलो.... आणि समोरचं दृश्य बघून तोंडाचा "ऑ" तसाच्या तसाच राहिला....... बास...... स्वर्ग स्वर्ग काय म्हणतात तो हाच.....
समोर पाण्याचा अफाट जलाशय......... समुद्राचा भास व्हावा एवढा...... त्यात "आकाश आणि पाणी" हि दोन तत्व अशी काही बेमालूम पणे मिसळून गेली होती कि बास.....
केवळ " अस्ताला जाणाऱ्या नारायणामुळे दोघांमधला फरक कळत होता....

सगळेच शांत झाले होते.. एवढी गर्दी असून सुद्धा...... त्या निसर्गाने सगळ्यांची जणू वाचाच हिरावून घेतली होती...

अवर्णनीय सोहळा होता .. साला नेमका आजच कॅमेरा कसा काय विसरलो ? जाम शिव्या घातल्या स्वताला....
तरी जमतील तेवढे फोटू काढले......
हळू हळू "नारायणराव' पाण्यात विलीन झाले आणि आम्ही सुद्धा जड पावलांनी माघारी फिरलो.....

कधी पैठण ला जाल.. तर सूर्यास्त जायकवाडी धरणावरच बघा.....

क्रमश:

गुलमोहर: 

मस्त फोटो, जायकवाडी धरण इतके विस्तीर्ण असेल असे वाटले नव्हते.
प्रसन्न, पैठण्यांचे फोटो टाकायला नको म्हणुन मुद्दामच कॅमेरा नेलेला नव्हतास ना?? Wink

बापरे .. आमच्या मातोश्री , आणि इतर लेडीज मंडल्लीना Wink
इतक आक्रमक झालेलं पहिल्यांदा बघितल..
काय ती घासाघीस ....
बापरे
सगळ्या बायका पार येड्या झालेल्या पैठण्या बघून
आम्हाला तर एक दीड तास तिथे उभ राहिल्यावर सर्वत्र मोरच दिसायला लागले Lol

सगळे फोटो मस्त आहेत्,पण जरा पैठ्ण्यां चे फोटो पण टाका नं आणि जमलं तर किमति पण सांगा,म्हणजे आम्हि पण एकनाथ महाराजांच्या दर्शना चा प्लान बनवु.बाकि धरण आणि सूर्यास्ताचे फोटो तर निव्वळ अप्रतिम!!

पैठण कधीच बघितले नव्हते. सुंदर दर्शन. तिथे आता एक मोठी बाग पण आहे ना ?
(एखादा पैठणीचा फोटो पण चालला असता कि.)

नेमका आजच कॅमेरा कसा काय विसरलो >> म्हणजे हे फोटो मोबाइलने काढले आहेत? तसे असेल तर __/\__
आणि तसे नसले तरीही फोटो छानच आहेत. Happy

प्रसन्न तु काय एकेका स्थळाची आठवण करुन देतो आहे ...........
फोटो मस्तच........ आम्ही हे सगळे बघितले आहे......... फोटो बघुन आठवणी ताज्या झाल्या Happy

फोटो छान आहेत.
अ‍ॅक्चुली धरणावर फोटो काढ्ण्यास सक्त मनाई आहे Happy
@ दिनेशदा तिथे ज्ञानेश्वर उद्यान आहे, वृंदावन गार्डन सारखच तिथल म्युसिकल फाऊंटन मस्त आहे. परंतू एवढ्यामोठ्या गार्डन मधे लाईटस ची सोय अजिबात नाही. ६.३० वाजता देखील गार्डन मधे चाचपडत फिराव लागत

>>>>>>एवढ्यामोठ्या गार्डन मधे लाईटस ची सोय अजिबात नाही. ६.३० वाजता देखील गार्डन मधे चाचपडत फिराव लागत

हो हो
अतिशय सामान्य दर्जाच गार्डन आहे .
आणि musical fountain हा प्रकार शेगाव ला आनंद सागरात बघितलेला असल्याने उगाच गेलो अस झाल

छान

सुंदर.

शेवटच्या फोटोत मस्त प्रतिबींब आणि रंग मिळालेत. पाणी आणि आकाश सुंदर मिसळलेलं आहे.
धरणाचे बाकी फोटोही छान आलेत. अँबियंस लाईट आणि रंगछटा सुरेख वाटत आहेत. सिल्हाऊटसशी प्रयोग करण्याची अगदी योग्य वेळ होती!