मक्याच्या कणसांची धिरडी

Submitted by आरती on 26 September, 2011 - 15:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सहा कणसांचा कीस,
अर्धी वाटी तांदुळाच पीठ,
चार चमचे हरबरा डाळीचे पीठ,
अर्धा इंच आल्याचा तुकडा,
चार लसणाच्या पाकळ्या,
सहा पाने पुदिना,
चार हिरव्या मिरच्या,
चवीपुरते मीठ,
चार चमचे तेल.

क्रमवार पाककृती: 

आलं, लसूण, पुदिना, मिरच्या, मीठ हे सगळे जाडसर वाटुन घ्यावे.
मक्याचा किस, दोन्ही पिठे आणि हे वाटण असे सगळे एकत्र करुन अर्धा तास झाकुन ठेवावे. पाणी घालु नये.
कणसांच्या कीसामुळे थोडे पाणी सुटते, अजुन थोडे पाणी घालुन हलवावे. साधारण धिरड्याच्या पिठाइतके पातळ झाले पाहीजे.
तव्याला थोडे तेल लावुन धिरडि घालावीत.
चटणी बरोबर खावीत.

dhirade.jpg

अधिक टिपा: 

घाई असल्यास, भिजवुन लगेच केली तरी चांगली होतात.
पाण्याचे प्रमाण हे मक्याच्या कीसाला सुटलेल्या पाण्यावर अवलंबुन असेल.
मक्याच्या पिठाची पण धिरडी करतात, पण या कणसाच्या कीसाची चव वेगळी आणि मस्त लागते.

माहितीचा स्रोत: 
कुठेतरी पुस्तकात वाचल्याचे आठवते, नंतर काही बदल होत गेले.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वीट कॉर्न वापरून करुन बघितली. फुड प्रोसेसर मध्ये सगळ एकत्र करुन. मस्त झाली एकदम. थँक्स आरती. छानच रेसीपी आहे एकदम.
तेला ऐवजी बटर लावून बघा. जास्त क्रीस्पी होतात आणि चव पण जास्त छान येते. Happy

मीपण आज केली. फ्रोझन कॉर्न वापरलं आणि प्रोटिनसाठी मुठभर मोड आलेले मूगपण टाकले वाटताना. पुदिन्याचा स्वाद छान वाटला धिरड्यांना. आरती, छान आहे रेसिपी.

आज हे सगळं मिश्रण जरा घट्टसर भिजवून अप्पमपात्रात अप्पम केले आहेत मुलाच्या डब्याकरता.कसे झाले आहेत हे आल्यावर कळेलच.:)

सिंडे, थोडं पीठ उरलेलं त्याचे केले. मस्तच लागले. एरवी ही हे मिश्रण मिक्सरला वाटताना एखादं गाजर घालते.

हा घ्या फोटो

appam small 1.jpg

सायो आप्पे म्हणायचंय होय. (बादवे आप्पे चं एकवचन काय ? ;))
मी उद्या करणार आहे. फ्रोजन चं. ते नुसतंच मिस्कर वर वाटायचंय ना.

वर मूळ रेसिपीत जे आहे तेच सगळं, पण तरीही : फ्रोजन कॉर्न धुवून मिक्सरच्या भांड्यात घेतले. त्यात आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, एक गाजर बारीक तुकडे करुन घातलं आणि भरड वाटलं. वाटताना थोडं पाणी घातलं. एक भांड्यात मिश्रण काढून त्यात जास्त तांदुळाचं पीठ आणि कमी बेसन, मीठ घालून घट्ट भिजवलं. अप्पे/ अप्पम पात्रात तेल घालून गॅसवर ठेवलं. कडकडीत गरम झाल्यावर वरचं मिश्रण चमच्याने घातलं. वरुन झाकण घालून दोन्ही बाजूंनी परतून चांगलं शिजवलं.

मी केली धिरडी , मस्त झाली. छान रेसिपी आरती. Happy
मी त्यात मोड आलेले मूग, कोथिंबीर हे पण अ‍ॅड केले. मी जरा भरड वाटले त्यामुळे फार पातळ नाही झाली धिरडी.

गरमागरम धिरडी, त्यावर घरचे ताजे लोणी, शेजारी सिंडिची दाण्याची चटणी. Happy

DSC04222.JPG

मस्त होतात..लेकीने आवडीने खाल्ले Happy हे मिश्रण फ्रिजमधे किती काळ टिकेल? आदल्या संध्याकाळी करुन दुसर्या दिवशी दुपारी चांगले राहील का?

आरती, पाककृतीसाठी धन्यवाद! सगळे घटक एकत्र वाटून धिरडी केली. आत्ता आणि गेल्या आठवड्यांत एकदा झाली. फार आवडली! सखुबत्त्याशी खाऊन 'मायबोली मेनू' केला.

सायोच्या कृतीनं आप्पे केले, पण फोटो काढण्याआधी संपले.

corn-dosa-maayboli-arati-recipe-1.jpgcorn-dosa-maayboli-arati-recipe-2.jpg

मृण्मयी,

फोटो एकदम मस्त, खरपुस झाली आहेत अगदी. Happy

हा सखुबत्ता काय प्रकार आहे ? मा.बो. वर आहे का, शोधायला हवा.

मृ तुझा धिरड्यांचा फोटो बघून मला मी ही कृती अगदी नीट वाचून (पण) थालीपीठं केली होती त्याची आठवण झाली. Proud
आरती
कैरीचा सखुबत्ता अल्पनाने लिहीलाय. पुढच्या विकेन्डला विनयकडे येणार असलीस तर तुला खायलाही मिळेल.

तो तवा जर गोल असेल तर नक्कीच एकावेळी चार झाली असतील Happy [असे चित्रावरुन वाटते]

रुनी, पुढच्या विकेन्डाच काही जमत नाहीये. शोधुन करतेच आता ...

मृ, तुझ्याकडेही गॅसच्या मधल्या बर्नरवर फिट होणारी नॉनस्टिक ग्रिडल आहे का? मला गॅसबरोबर मिळालीये. डोसे एकावेळी दोन, पॅनकेक्स एकावेळी ३ होऊ शकतात.

Pages