खरंच का रे, माझी वेळ चुकली ?

Submitted by विशाल कुलकर्णी on 22 September, 2011 - 01:35

तसा मी नेहमीच भिजवतो रे...
पण काल मात्र चिंब भिजलो
कालचा पाऊस म्हणाला...

ही वसुंधरा, तुम्ही माणसे, ते पशु-पक्षी
आतुरतेने वाट पाहता ना...
माझ्या भिजवण्याची !

पण मलाही जरा कंटाळाच आला होता
नेहमीच इतरांना भिजवण्याचा...
म्हणून या वर्षी लवकर आलोच नाही
शेवटी गंमत म्हणून त्याच्या शेतात बरसलो
म्हणलं पार भिजवून टाकावी जमीन...

पण खरं सांगू.., अवेळी आलेल्या
माझ्या स्वागतासाठी (की निषेधासाठी?)
कदाचित स्वत:च्याच नशिबाचं सांत्वन करण्यासाठी,
त्याचे डोळे पाझरायला लागले ....
आणि माझ्याही नकळत मीच चिंब भिजलो, शहारलो..!!

खरंच का रे, माझी वेळ चुकली ?

विशाल

गुलमोहर: 

आणि माझ्याही नकळत मीच चिंब भिजलो, शहारलो..!!

खरंच का रे, माझी वेळ चुकली ?>>> व्वा!! नावीन्यपूर्ण... उकाकांशी सहमत

आम्ही दोघांनीही खुप वेळ वाट पाहीली. आता येईल तेव्हा येईल मग भिजू, पण छ्या!
खरंच बाबा, यावेळी तुझी वेळ चुकली.

व्वा.....क्या बात है..........खुप वेगळेपण आहे आशयात. अवेळी आलेल्या पावसाने शेताची हानी होऊन दु:खी झालेल्या शेतकर्‍याचं चित्र रेखाटलंत अगदी! मनापासून आवडली.पुलेशु, अजून वेगवेगळे विषय येउदेत.

परवा गावाकडून एका जुन्या शाळुसोबत्याचा फोन आला होता. तो गावीच शेती करतो. तो सांगत होता की पाऊस प्रचंडच झालाय..., जुंधळा काळा पडणार भवतेक यंदा ! भुइमुग तर बुडालाच.................... Sad

Sad