दहा वर्षात एकदाच . . . .

Submitted by रुनाली on 22 September, 2011 - 01:25

जेव्हा जेव्हा आपण नविन ठिकाणी जातो तिथे आपल्याला नविन माणस भेटतात,

सुरुवातीला अनोळखी असणारी ही माणस नंतर ओळखीची वाटू लागतात आणि जसजसा वेळ जातो ती माणस आपली आहेत अस आपल मन आपल्याला सांगत..

इयत्ता पहिली मधे आपल्याला ज्या बाई भेटतात

त्या इयत्ता दहावी पर्यंत आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग झालेल्या असतात

कारण आपल्या आयुष्यतला दहा वर्षाचा वेळ आपण त्या शाळेत त्या शिक्षकां समवेत घालवलेला असतो...

या दहा वर्षात..

आपण खुप गोष्टी शिकतो

अगदी बाराखडी पासून न्यूटन च्या नियमां पर्यंत सगळ काही

या दहा वर्षात..

आपण जोडलेली नाती झालेच तर ..

ती दूर होतात पण ती कधीही तुटत नाहीत

या दहा वर्षात..

आपल्याला खुप मित्र-मैत्रिणी भेटतात

दहा वर्षा नंतरचा प्रवास प्रत्येकाने ठरवलेला असतो.

पण या दहा वर्षाच्या आठवणी कधीही पुसता येणार नाहीत

अशा मनाच्या कोपरयात दडवून ठेवलेल्या असतात..

या दहा वर्षात जसे आपल्याला मित्र भेटतात तसेच शत्रुही भेटतात. अशा शत्रूंना आपण कुचके, चुगलिखोर, बावळट असे विशेषण देवून संबोधतो पण नकळत का होइना हेच शत्रु आपल्याला आपल्या सच्च्या ,खरया मित्राच्या आणि जवळ आणतात..

असे हे शत्रु पण दहाव्या वर्षी निरोप समारंभात आपल्या साठी भावुक होतात आणि आपणही त्याना दिलेली विशेषण पुसून टाकतो.

कधी तरी असही होत की आपण एखाद्या मित्र-मैत्रिणी सोबत दहा वर्षात एकदाही बोलत नाही पण जेव्हा निरोपाची वेळ येते तेव्हा मात्र आपण स्वतःहून आपल्यातला दुरावा कमी करण्याचा प्रमाणिक प्रयत्न करतो

या दहा वर्षातच आपण खर्या अर्थाने माणसाला पारखायला शिकतो आणि यासाठी आपले आई -वडिल शिक्षक मित्र शत्रु सगळे आपली मदत करतात.

या सगळ्या गोष्टी अनुभवत आपण दहा वर्षाने मोठे तर होतोच पण स्वभावात मात्र थोड़े फार बदल जाणवायला लागतात आणि नक्कीच हे बदल चांगले असतात...

या दहा वर्षात आपण मस्ती म्हणून केलेली असते

अगदी मित्र मैत्रिणी सोडाच पण शिक्षक,शिपाई याना पण पार हैरान केलेल असत

सरांना शेपटी लावण्या पासून,मित्र मैत्रिनिंच्या जोड्या लावणे इतक पुरे नाही पडत तर शिक्षकांच्या जोड्या लावणे असे उपक्रम ही आपण केलेले असतात.

या दहा वर्षात प्रत्येक सणात मुलानी ही आनंदाने सहभाग घेतलेला असतो.

हळदी -कुंकू समारंभात मुलांच काय काम? पण तरीही सजावटिची हमी घ्यायला ते तयार असतात

या दहा वर्षात इतक्या मुलांना राखी बांधली असेल मोजताही येणे अशक्य.

काही मित्राना तर जबरदस्ती राखी बांधली जायची का तर त्याची पुढे कटकट नको म्हणून..

त्या दहा वर्षात काहीनी तर जगातली सर्वात सुंदर गोष्ट अनुभवली असेल

नाही समजल...??

म्हणजे बघा ह ..

एखाद्या मित्र मैत्रिणी सोबत जास्त वेळ घालवने, त्यांचा सगळा गृह-पाठ स्वताच करून देणे, जरी चुक त्यांची असेल तरी त्यांच्या बाजूने बाकी मित्र-मैत्रिणी सोबत वाद घालणे, गरज नसताना त्यांची काळजी घेणे ....

म्हणजे या सगळ्याला प्रेम म्हणतात हे त्या दहा वर्षात समजत नाही पण जेव्हा समजत तेव्हा मात्र खुप उशीर झालेला असतो..

या दहा वर्षा नंतर शिक्षक ही वयाने मोठे झालेले असतात आणि आपणही दहा वर्षाने मोठे झालेले असतो पण जर कोणी आपल्याला ही वेळ परत मिळवून देण्याच आमिष दाखवल तर आपण यासाठी काहीही करायला तयार असतो

खरच त्या दहा वर्षात आपण आपल्या मधे असलेल्या माणसाला भेटतो

नाही का????

-रुनाली शिरधनकर

गुलमोहर: