सावरकरांची क्षमापत्रे: आक्षेप आणि वास्तव

Submitted by अक्षय जोग on 21 September, 2011 - 04:52

सावरकरांची क्षमापत्रे: आक्षेप आणि वास्तव

सावरकर इंग्रजांची क्षमा मागून अंदमानातून सुटले! नुसती क्षमा मागून नाही तर "मी राजकारणात भाग घेणार नाही व माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे" अशी सपशेल शरणागती पत्करून सुटले व ह्याचे पुरावे नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' उपलब्ध आहेत. अशाप्रकारे सावरकरांवर सदैव आरोप केला जातो. (पहा: Far from heroism - The tale of 'Veer Savarkar by Krishnan Dubey and Venkitesh Ramakrishnan, 7 Apr 1996, Frontline)

ज्याव्यक्तीने सावरकर चरित्र अभ्यासले आहे किंवा निदान 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र वाचले आहे त्यांना ह्या आरोपातील फोलपणा त्वरीत लक्षात येईल. प्रथम सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांच्या तुरूंगात खितपत पडणे ही काही सावरकरांची देशभक्तीची कल्पना नव्हती, ते त्यांचे ध्येयही नव्हते. “काराग्रुहात राहून जी करता येत आहे त्याहून काही तरी अधिक प्रत्यक्ष सेवा या आमच्या मात्रुभूमीची करता येईल अशा प्रकारच्या कोणत्याही अटी मान्य करून मुक्तता करून घेणे हे प्रतियोगी धोरणानेच नव्हे तर समाजहिताचे द्रुष्टीनेही आमचे परम कर्तव्य आहे.” (माझी जन्मठेप: भाग २, लेखक: वि.दा. सावरकर, पृष्ठ क्रमांक: १६१, ह्यापुढे ‘कित्ता-२’ असा संक्षिप्त उल्लेख केला जाईल.) व तसेच “अंदमानात जे काय राष्ट्रहित साधता येईल ते इतके महत्त्वाचे कधीही नसणार की जितके मुक्तता झाल्यास हिंदुस्थानात येऊन साधता येईल; परंतु म्हणून मुक्ततेसाठी वाटेल ते विश्वासघातक, निंद्य, नीच आणि देशाच्या किंवा जातीच्या स्वाभिमानास कलंक लागेल, असे लाळघोटी वर्तन त्यामुळे समर्थनीय ठरणार नाही. कारण त्यायोगे होणारी मुक्तता ही राष्ट्रास अधिक हितकारक होण्यापेक्षा स्वतःचे उदाहरणाने अधिक अनीतिमान आणि राष्ट्र्घातकी मात्र होणारी होती.” (कित्ता-२, पृष्ठ: १०९) अशी त्यांची मनोभूमिका होती. म्हणजे सुटकेसाठी वाट्टेल त्या देशविघातक-देशद्रोही अटी त्यांनी मान्य केल्या नाहीत.

तसेच हे केवळ सावरकरांचे मत नव्हते तर त्यांचा आंग्ल-मित्र डेव्हिड गार्नेटचेही हेच मत होते. “सावरकरांसारखी उत्कट चैतन्यमय व्यक्ती कारागारात जीवन कंठीत असलेली मी सहनच करू शकत नाही." (In the first volume of his autobiography, The Golden Echo, Harcourt, Brace and Company, New York, 1954)

सावरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते. अफजलखानवधा आधी, सिद्दी जोहारच्या वेढ्याच्यावेळी त्यांनी अशीच शत्रूला बेसावध करणारी पत्रे पाठवली होती, तसेच पुरंदरच्या तहावेळी महाराजांनीही अशीच वेळप्रसंगी औरंगजेबापुढे शरणागती पत्करली, त्याच्या मानहानीकारक अटी मान्य केल्या व पुढे सामर्थ्य प्राप्त होताच मोगली सत्तेविरूद्ध संघर्ष चालू ठेवला. हा कूटनीतिचा एक भाग असतो.

पहिले महायुद्ध १९१४ ला सुरू झाल्यावर सावरकरांनी हिंदुस्थान सरकारकडे आवेदनपत्र धाडले, ते पत्र मुळातूनच वाचावे, मी त्याचा मुख्य आशय उधृत करतो:“हिंदुस्थानाला औपनिवेशक स्वायत्तता (Colonial-Self Government) द्यावी, वरिष्ठ विधिमंडळात हिंदी प्रतिनिधीचे निरपवाद बहुमत व त्याबदल्यात क्रांतिकारक इंग्लंडला महायुद्धात सहाय्य देतील अशा मागण्या केल्या होत्या व ‘युरोपात बहुतेक राष्ट्रे आपआपले अंतर्गत राजबंदी सोडून देत होती, आयरिश 'राजद्रोही' बंदीही सुटले होते’ अशी उदाहरणेही दिली होती. तसेच मला सोडता येत नसेल तर सरकारने मला न सोडता अंदमानतल्या, हिंदुस्थानातल्या आणि बाहेर देशोदेशी निर्वासित होऊन अटकून पडलेल्या राजबंदीवानांस तात्काळ मुक्त करावे. त्यांच्या मुक्ततेत मला जवळजवळ माझ्या मुक्ततेइतकाच आनंद वाटेल." अशी निस्वार्थी मागणीही केली होती. म्हणजे सावरकरांची आवेदनपत्रे-मागण्या क्रांतिकारकांच्यावतीने होत्या केवळ स्वतः करिता नव्हत्या. (कित्ता-२, पृष्ठ:४५-४६)
सावरकरांना ह्याची जाणीव होती की काही झाल तरी ब्रिटीश आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत व राजकारणात भाग घेऊ देणार नाहीत, म्हणून मग ‘कारागारीय अन्वेक्षेक मंडळा’पुढे त्यांनी अशी भूमिका मांडली-- "राजकारण करू देत नसाल तर इतर दिशेने देशाची आणि मानवजातीची सेवा करीन, हित करण्यास झटेन. बरे मी ते वचन मोडले तर आपणास मला पुन्हा जन्मठेपीवर धाडता येईल.(कित्ता-२, पृष्ठ:१११). तसेच राज्यपालांशी झालेल्या सुटकेसंदर्भातील चर्चेतही त्यांनी ह्याचे सुतोवाच केले होते, त्याचा सारांश असा: "काही अवधीपर्यंत राजकारणात - प्रत्यक्ष चालू राजकारणात आपण भाग घेणार नाही. कारागारातही राजकारणात प्रत्यक्ष भाग घेता येतच नाही. परंतु बाहेर राजकारणव्यतिरिक्त शैक्षणिक, धार्मिक, वाड्मयात्मक अशा अनेक प्रकारांनी तरी राष्ट्राची सेवा करता येईल. लढाईत पकडलेले सेनापती, युद्ध चालू आहेतो प्रत्यक्ष रणात उतरू नये, 'धरीना मी शस्त्रा कदनसमयीं या निजकरी' अशी यदुकुलवीराप्रमाणेच प्रतिज्ञा करवून घेतल्यावर त्या अभिवचनावर (on Parole), सोडण्यात येतच असतात. आणि त्या यदुकुलवीराप्रमाणेच ते राजनीतिज्ञ सेनानी प्रत्यक्ष शस्त्रसंन्यास तेवढा करावा लागला तरी राष्ट्रकार्यात त्याचे सारथ्य तरी करता यावे म्हणून अशी अट मान्य करण्यात काही एक कमीपणा मानीत नाहीत तर उलट तसे करणे हेच तत्कालीन कर्तव्य समजतात." (कित्ता-२, पृष्ठ:१६२) ह्यानुसार सावरकरांनी कारावासातील मुक्ततेनंतर अटीनुसार राजकारणाव्यतिरिक्त शुद्धी, समाजसुधारणा, विज्ञाननिष्ठता, भाषाशुद्धी, लिपीसुधारणा अशा प्रकारे प्रचंड समाजकारण केले.

जे जे राजबंदीवान अंदमानातून सुटले त्यातील बहुतंशी जणांनी अशाच प्रकारच्या करारपत्रावर स्वाक्षऱ्या करून सुटका करून घेतली होती. उदा. "मी यावर पुन्हा कधीही - किंवा अमुक वर्षे - राजकारणात आणि राज्यक्रांतीत भाग घेणार नाही. पुन्हा मजवर राजद्रोहाचा आरोप सिद्ध झाला तर मी ही माझी मागची उरलेली जन्मठेपही भरीन! (कित्ता-२,पृष्ठ:१२०)

सावरकरांचे जे पत्र 'क्षमापत्र' म्हणून दाखवतात ते पाहण्यासाठी नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' जायची आवश्यकता नाही. ते पत्र 'अंदमानच्या अंधेरीतून' ह्या पुस्तकात ‘पत्र ८ वे- दिनांक ६-७-१९२०’ शीर्षकाखाली छापलेले आहे.(इंग्रजांना पाठविलेल्या आवेदनाचा मूळ दिनांक २-४-१९२०).हा पहा त्यातील मुख्य गाभा:

हिंदुस्थानातील वरिष्ठ कार्यकारी मंत्रिमंडळाच्या सभासदासारख्या प्रतिष्ठित अधिकाऱ्यांनी मला आणि इतरांना पुढील प्रश्न पुष्कळदा टाकला होता - "तुम्ही पूर्वीच्या हिंदी राज्याच्या विरूद्ध उठावणी केली असती तर तुमची स्थिती काय असती? ते विद्रोह्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवीत!" त्याला माझ्याकडून उत्तरही मिळाले होते. हिंदुस्थानातच काय, जगाच्या कोणत्याही देशात - प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये सुद्धा - विद्रोह्यांना कधी कधी असली भयंकर शिक्षा भोगण्याचे दैवी येई. पण मग इंग्रज लोकांनी युद्धाच्या वेळी जर्मन लोक आमच्या बंद्यांना वाईट रीतीने वागवतात आणि त्यांना रोटी आणि लोणी देत नाहीत अशा कोल्हेकुईने जगाच्या कानठळया का बसवाव्या? एक काळ असा होता की ज्या वेळी काराग्रुहातील बंद्यांची जिवंतपणी कातडी सोलीत आणि त्यांना मोलॉक, ठॉर किंवा असल्याच युरोपातील युद्ध देवतांना बळी देत असत" अशी आठवण दिली. खरी गोष्ट अशी आहे की, ही जी जगाच्या संस्कृतीत मनुष्यप्राण्याने सुधारणा घडवली आहे ती सर्व राष्ट्रांतील मनुष्याचे प्रयत्नांचे संकलित फळ आहे आणि म्हणून तिच्यावर सर्व मनुष्यजातीचा वारसा आहे व तिचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे. त्या रानटी युगाच्या तुलनेनेच म्हणावयाचे तर माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे; आणि मनुष्यभक्षक जाती आपल्या बंद्यांना जी शिक्षा देत किंवा चौकशीचे जे नाटक करीत त्यापेक्षा अधिक चांगली पद्धती या सरकारची आहे या प्रशस्तीपत्राने सरकारचे समाधान होत असेल तर त्याला माझी ना नाही. पण त्यावेळीच हेही विसरता कामा नये की, पूर्वीच्या काळात राजे विद्रोह्यांना जसे जिवंत सोलीत त्याचप्रमाणे विद्रोहीही त्यांची भाग्यतारा जोरात आल्यावर या राज्यकर्त्यांना जिवंत जाळीत! आणि इंग्रजी जनतेने मला किंवा इतर विद्रोह्यांना अधिक न्यायाने म्हणजे थोड्या रानटीपणाने वागवले असेल तर त्यांनाही आश्वस्त असावे की परिस्थितीची उलटापालट होऊन हिंदी क्रांतिकारकांची तशी पाळी आली तर त्यांच्याकडून त्यांनाही असेच अत्यंत दयेच्या रीतीने वागविण्यात येईल!

सावरकर शत्रूला फसवायचा प्रयत्न करत होते पण ब्रिटीश न फसता स्वकीयच फसले. कधीही कुठलाही ठराव, आवेदन अशा प्रकारची राजकीय पत्रे वाचताना 'दोन ओळींमधील' (between the lines) वाचता आले पाहिजे, जे सावरकरांच्या पत्रावर आक्षेप घेतात ते एकतर 'दोन ओळींमधील' वाचण्यास सक्षम नसतात किंवा 'दोन ओळींमधील' वाचण्याची त्यांची तयारीच नसते.

अंदमानच्या कारावासात त्यांचे मनोधैर्य तर खचले नाहीच पण त्यांनी तशा अमानुष बंदिवासातही हाती साधी कागदपेन्सिल नसतानाही कारागृहातील भिंतींवर ५ हजार ओळींचे उत्कट काव्य लिहिले आणि ते सर्व मुखोद्गत केले! संपूर्ण जगाच्या इतिहासात अशा प्रकारचे हे एकमेव उदाहरण आहे. मनोधैर्य खचल्याचे हे लक्षण म्हणता येइल का?

तसेच असाही आरोप केला जातो की, सर्वांनी अमान्य केलेला माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा निर्बंध सावरकरांनी स्वीकारला. सावरकरांनी काही सुचना केल्या होत्या व त्या मान्य झाल्या तरच तो मान्य असेल असे सांगितले होते. पुरावा म्हणून सावरकरांनी माँटेग्यू आणि गव्हर्नर जनरलला लिहिलेले आवेदनपत्र वाचा: “सरकार खरोखरीच दायित्वपूर्ण शासनाधिकार म्हणजे कमीत कमी वरिष्ठ विधिमंडळात परिणामकारक बहुमत ज्यावर अर्थातच तो एखादा राज्य-समिती (Council od State) चा दगडोबा प्रत्येक वरात शाप मिसळविण्यासाठी स्थापिलेला नाही, असे लोकपक्षीय प्रतिनिधींचे बहुमत देणार असेल आणि या अधिकारदानासहच अशेष राजबंदीवानांस, युरोप आणि अमेरिका इत्यादी ठिकाणी अडकून पडलेल्या आमच्या निर्वासितांसह सर्व राजदंडितांस मुक्त करण्याचे औदार्य दाखवीत असेल तर निदान मी तरी - आणि मजप्रमाणेच इतर कित्येक - अशी राज्यघटना प्रामाणिकपणे स्वीकारीन आणि जर आमच्या लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून आम्हास निवडणे योग्य वाटले तर त्याच विधिमंडळाच्या सभांगणात आमच्या आयुष्याच्या परमध्येयासाठी आम्ही झटू की ज्या विधिमंडळांनी आजपर्यंत आमच्याविषयी केवळ द्वेषच काय तो धारण केला आणि त्यांच्या कार्याविषयी आणि धोरणाविषयी आमच्या मनात तिरस्कार उत्पन्न करून ठेवला.”(कित्ता-२, पृष्ठ:८२) ब्रिटिशांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला हे सांगावयाला नकोच!

सावरकरांच्या ह्या अटी, ही आवेदनपत्रे, ह्यामागील राजकीय खेळी, मनोभूमिका स्वत: सावरकरांनी कधीही लपवून ठेवली नाहीत. सावरकरांचे आत्मचरित्र 'माझी जन्मठेप' मध्ये ह्या सर्वाचा सांगोपांग उहापोह केलेला आहे. त्यामुळे आम्ही नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' जाऊन संशोधन करून पत्र शोधून काढली किंवा र.चं. मुजुमदार (R.C. Mujumdar) ह्यांनी शोध लावला अशा फुशारक्या कोणी मारू नयेत.

व्हिएतनामच्या कम्युनिस्ट 'हो-चि-मिन्ह'नेसुद्धा चीनच्या कोमिंग्टांग कारागृहातून अशाच प्रकारचे पत्र व सहकार्याची अट मान्य करून सुटका करून घेतली होती. मार्शल चांगला त्याने कोमिंग्टांग शासनाच्या आधाराने इंडोचायनात स्थापन झालेल्या 'डाँग-मिन्ह-होई' (जी 'हो-चि-मिन्ह'च्या 'व्हिएत-मिन्ह'ला शह देण्यासाठी स्थापिली होती) या संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली व सुटका करून घेतली. (व्हिएतनाम: अर्थ आणि अनर्थ, लेखक: वि. ग.कानिटकर, मनोरमा प्रकाशन १९९८, पृष्ठ क्रमांक ५३) तसेच रशियाने जर्मनीशी केलेला अनाक्रमणाचा करार संपुष्टात आल्यावर मित्र राष्ट्रांशी हातमिळवणी केली, तेव्हा एका रात्रीत कम्युनिस्टांनी आपली निष्ठा बदलली. म्हणजे कम्युनिस्ट करतील ती राजकीय खेळी व सावरकर करतील तो द्रोह? तात्पर्य हेच की ‘झोपलेल्याला उठवता येते पण झोपेचे सोंग करणाऱ्याला उठवता येत नाही.’

लेखक: अक्षय जोग

(सर्वांना लेखातील संदर्भशोध सहज घेता यावा यासाठी 'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक' प्रकाशित 'माझी जन्मठेप भाग १ व २' पुस्तकाचा आधार घेतला आहे; हे पुस्तक खालील संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध आहे. http://www.savarkarsmarak.com/downloadbooks.php)

गुलमोहर: 

>>>>( आणि समजा ५५ कोटी दिलेले असतीलच, तर ते त्यांचेच होते.. वाइट वाटायचे काही कारण नाही.)

वाहवा वाहवा! काय पण विद्वान आहात!!! पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला तरी द्यायचे? वाहवा वाहवा!!
तुम्ही पाकिस्तानवादी आहात असे सिद्ध करताय यातून. देशद्रोही आहात तुम्ही!!!!!

हल्ला केला म्हणून बोंब मारण्यापेक्षा तुम्ही सैन्यात जाऊन पाकिस्तान जिंका ना... तुमचं देशप्रेम तरी सिद्ध होऊ द्या ! Proud

झाली "भुतावळ" आपल्या इच्छित हेतूने ह्याही धाग्यावर आली आणि नेहमी प्रमाणे थयथाटही करायला लागली. आता करा चर्चा.!

भुतावळ तर कधीच आली आहे... जे ५५ कोटी पाकिस्तानला कुणी दिलेलेलेच नाहीत, ते गांधीजीनी दिले असा शोध लावणारे तुमच्यासारखे आले, तेंव्हाच इथे भुतावळ आली. Proud

तुमचे ज्ञान वाढवा म्हणे! काय वाचायचे? जोशी बुवांचे लेख आणि तुमच्या बिनबुडाच्या प्रतिक्रिया का? Proud

>>> तुम्ही गांधीवादी लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी "गांधी" नावाचा वापर करुन, त्यांच्यावर इतकी चिखलफेक केलेय, की दुसर्‍याला चिखलफेक करायला जागाच बाकी ठेवली नाही.

+१००

गांधी विचारांची विटंबना स्वतःला गांधीवादी म्हणवणार्‍यां भोंदूंनी जितकी केली आहे, तितकी कोणीच केली नाही. गांधींची हत्या एकदाच झाली, पण हे तथाकथित गांधीवादी आणि काँग्रेसवाले रोजच त्यांची हत्या करत आहेत.

गांधींनी अहिंसेचे आंधळे समर्थन केलेले नाही. वर त्यांची विधाने दिलेली आहेत: भ्याडपणापेक्षा हिंसा पत्करली,इ.
याबाबतीत गांधींचा आदर्श ठेवणारे नेल्सन मंडेला यांचं अनुकरण खरं तर केलं गेलं पाहीजे. मंडेला यांची धोरणे गांधींसारखी आंधळी नव्हती. ते स्वत: जरी अहिंसावादी लढ्यात होते, तरी त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हिंसा या मार्गाचा निषेध कधीच केला नाही : मंडेलांच्या आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसचा सुरुवातीच्या काळातला लढा हिंसक - गोरीला वॉर्सचाच होता. पण तुरुंगात अनेक वर्षे काढल्यावर जेव्हा ते बाहेर आले, तेव्हा त्यांनी पुन्हा हिंसेचा मार्ग धरला नाही. हिंसा त्याज्ज्य नाही हेही म्हटले.

जे प्रश्न सोडवण्याचा मार्ग हिंसेच्या मार्गाने झाला, ते प्रश्न खरेच सुटले का? की त्यातून नवे प्रश्न निर्माण झाले?

<भारताला स्वातंत्र्य मिळालं ते फक्त गांधींमुळेच आणि त्यांचाच मार्ग योग्य होत>
भारताला स्वातंत्र्य फक्त गांधींमुळेच मिळालं असं कोणी म्हणत असेल असे वाटत नाही. मी स्वतः म्हणणार नाही. इतर कोणाचे स्वातंत्र्यासाठीचे प्रयत्न कमी लेखण्याचा विचारही नाही. सगळ्या प्रयत्नांबद्दल सारखीच कृतज्ञता आहे.

मात्र गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढ्याला विशाल जनाअंदोलनाचे स्वरूप मिळाले होते. स्त्रिया आणि समाजाच्या सर्व थरातले लोक आंदोलनात भाग घ्यायला उद्युक्त झाले. ही एका अर्थाने राजकीय घटनेइतकीच सामाजिक घटनाही होती.

गांधीजी या देशाचे तारणहार होते, जगावर राज्य करणार्या इंग्रजांना लटका विरोध करण्याचा मुर्खपणा त्यांनी केला नाही. त्या ऐवजी बापुंनी असहकार, छोडो भारत सारख्या देशव्यापी चळवळी राबवुन या देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले .गांधीजी फाळणीला जबाबदार होते हा आरोप धादांत खोटा आहे, 'पंचावन्न कोटीँचे बळी' या प्रचारकी पुस्तकात असले बिनबुडाचे आरोप आहेत. सावरकरांचा माफिनाम्याचा दूरदृष्टीकोन मान्य केला तरी त्यांनी सुटका झाल्यानंतर विशेष काय केले हा प्रश्न शिल्लक राहतोच.
धर्माच्या आधारे फूट पाडणे गांधीजींना कधीच मान्य नव्हते, ते जातीव्यवस्थेच्या विरोधात होते. त्यांच्या मुशीतच तयार झालेले नेहरुंसारखे एक तेजाळते व्यक्तीमत्व भारताला मिळाले. गांधी, नेहरु नसते तर आपल्याला अजूनही पारतंत्र्यात खितपत पडावे लागले असते.एकंदरच जगाने स्विकारलेला हा महात्मा आपल्याला वंदनीय असायलाच हवा.

>>> आचार्य अत्र्यांच्या भाषेत सांगयच झाल तर "हिंसेला जितकी हींसा करता आली नसती तितकी हिंसा अहींसेने केली" <<<
अचूक नेमके निदान Happy अर्थात आचार्यान्नी केलय ते, अचूकच असणार!

बायदिवे, पन्चावन्न कोटी "न दिल्याचा" पुरावा देईल का कोणी? तसेच, न देण्याचा निर्णय केव्हा झाला? कुणी घेतला? अन त्याचे सुमारास गान्धिन्चे ५५ कोटी देऊन टाकण्याबद्दलचे उपोषण केव्हापासून कोणत्या दिवसापर्यन्त चालले होते? नै म्हणल जरा उकराउकरी करुनच बघुयात! तेवढीच आम्हा अडाण्यान्च्या ज्ञानात भर पडेल नं!

पाकिस्तानला ५५ कोटी दिले असं खुद्द गांधी मणीभवन यांचे संकेतस्थळच म्हणते.

The matter regarding release of Rs. 55 crores to Pakistan towards the second installment of arrears to be paid to it under the terms of division of assets and liabilities requires to be understood in the context of the events that took piece in the aftermath of partition. Of the 75 crore to be paid the first installment of Rs. 20 crore was already released.

Invasion of Kashmir by self-styled liberators with the covert support of the Pakistani Army took place before the second installment was paid. Government of India decided to withhold it. Lord Mountbatten was of the opinion that it amounted to a violation of the mutually agreed conditions and he brought it to the notice of Gandhiji. To Gandhiji's ethical sense the policy of tit for tat was repugnant and he readily agreed with the Viceroy's point of view.

हल्ला केला म्हणून बोंब मारण्यापेक्षा तुम्ही सैन्यात जाऊन पाकिस्तान जिंका ना...
असे चुक्कून, स्वप्नात देखील बोलू नका!!!

अहो पाकीस्तान जिंकून काही फायदा नाही. उलट प्रचंड, महाप्रचंड तोटा आहे. तो समाज मुख्यतः घाणेरडा, आळशी, मूर्ख, भडक डोक्याचा नि धर्माच्या नावाखाली देशाचे वाट्टोळे करणारा समाज आहे. गेल्या ६४ वर्षात हे दिसतेच आहे! तसले आणखी लोक कशाला पाहिजेत भारतात? आहेत तेव्हढे पुरे आहेत.

अर्थात तुमचा वैयक्तिक फायदा काही असेल तर मला माहित नाही. बहुधा सत्ता मुसलमानांच्या ताब्यात जाइल नि आत्तापर्यंत झालेल्या नेत्रदीपक प्रगतीचे बारा वाजवून टाकतील. फक्त सावरकरांना, ब्राह्मणांना हिंदूंना शिव्या देणार्‍यांना सरकार भरपूर पैसे देईल. तसे हवे आहे का तुम्हाला, मग तसे म्हणा! त्यासाठी राहुल गांधींचे पाय चाटा, पैसेच पैसे!! उगाच लढाइ वगैरे नको!! अहिंसा परमो धर्मः!!

Happy Proud

संग्राम कदम,

>> सावरकरांचा माफिनाम्याचा दूरदृष्टीकोन मान्य केला तरी त्यांनी सुटका झाल्यानंतर विशेष काय केले हा प्रश्न
>> शिल्लक राहतोच.

त्यांनी रत्नागिरीत राहून अस्पृश्यतानिवारणाचं भलं मोठं कार्य केलं. या बाबतीत आंबेडकर आणि सावरकरांचे विचार जुळतात, असं भाव्यांच्या पुस्तकात म्हंटलं आहे.

अधिक माहितीसाठी: http://www.savarkar.org/mr/social-reforms/q#q1

आ.न.,
-गा.पै.

इथल्या बर्‍याचश्या लोकांना स्वतःहून माहिती मिळवणे, विचार करणे वगैरे काही माहिती नाही.

जोशी बुवांचे लेख आणि तुमच्या बिनबुडाच्या प्रतिक्रिया का?
इथल्या प्रतिक्रिया नि लेख वाचणे एव्हढीच ज्यांची ज्ञान मिळवण्याची कल्पना, नि त्यावर उगाचच टीका करणे एव्हढेच ज्यांना माहित, तसले बरेचसे लोक इथे येत असतात, लुब्र्या कुत्र्याला अनेकदा हाकलूनहि जसे ते परत परत येतच रहाते, तसे हे लोक. काय लिहीले, खरी माहिती काय, वगैरेचा विचार करण्या ऐवजी भुंकत सुटायचे!!

धन्य त्या चर्चा!! कुणाला 'मायबोली वाचा' असे सांगण्याची लाज वाटते आजकाल!! मी मायबोली वाचतो, तिथे लिहितो असे म्हणण्याची पण!

>>जोशी बुवांचे लेख आणि तुमच्या बिनबुडाच्या प्रतिक्रिया का?
इथल्या प्रतिक्रिया नि लेख वाचणे एव्हढीच ज्यांची ज्ञान मिळवण्याची कल्पना, नि त्यावर उगाचच टीका करणे एव्हढेच ज्यांना माहित, तसले बरेचसे लोक इथे येत असतात, लुब्र्या कुत्र्याला अनेकदा हाकलूनहि जसे ते परत परत येतच रहाते, तसे हे लोक. काय लिहीले, खरी माहिती काय, वगैरेचा विचार करण्या ऐवजी भुंकत सुटायचे!! <<
Rofl

Rofl
झक्की साहेब कमाल आहे तुमची, हसुन-हसुन lol-049.gif पडलो . चांगली पोष्ट.
अगदी वास्तवाला धरुन असतात तुमच्या प्रतिक्रीया झक्की साहेब. १००% खर आहे

धन्यवाद.
चांगली आहे का वाईट आहे, यापेक्षा खरी आहे का खोटी आहे हे महत्वाचे. कुणाला चांगली वाटेल कुणाला वाईट.

वाईट का, तर मी अमेरिकेत बसून लिहीले, खरे लिहीले ते झोंबले, वगैरे कारणे.
फक्त खरे असेल तर तसे म्हणा, नाहीतर खोटे म्हणा.
खरे काय खोटे काय हे शोधण्यापेक्षा जे आवडले नाही त्याला, ते वाईटच असते, असे गुळाची चव न समजणारे लोकच इथे खूप येतात!!

आणि समजा ५५ कोटी दिलेले असतीलच, तर ते त्यांचेच होते.. वाइट वाटायचे काही कारण नाही.

Rofl Rofl Rofl

Biggrin Biggrin Biggrin Biggrin Biggrin Biggrin

अहो ५५ कोटी म्हणजे किस झाडकी पत्ती. भारताचे नैतिक बळ इतके प्रचंड वाढले, की काही विचारू नका!!

आता त्यापेक्षा दसपट रकमेची अफरातफर, भ्रष्टाचार होत असला तरी त्या नैतिक बळाच्या जोरावर आम्ही त्या गैरकायदेशीर व्यवहारांकडे दुर्लक्ष करू शकतो. कारण जरी दोष सिद्ध झाला तरी याच मार्गाने (म्हणजे पैसे देऊन) आम्ही परत निवडून येतो, नि आणखी गोंधळ घालतो.

आता जगात आमच्या म्हणण्याला कुणि भीक घालत नाहीत तरी ठणकावून सांगायचे की अमेरिकेचे चुकले, इतरांचे चुकले, आम्ही आमचे अहिंसेचे धोरण सोडणार नाही वगैरे वगैरे. असे करायला नैतिक बळ येते कुठून?
(उत्तरः पैसे देऊन)

>>बायदिवे, पन्चावन्न कोटी "न दिल्याचा" पुरावा देईल का कोणी? तसेच, न देण्याचा निर्णय केव्हा झाला? कुणी घेतला? अन त्याचे सुमारास गान्धिन्चे ५५ कोटी देऊन टाकण्याबद्दलचे उपोषण केव्हापासून कोणत्या दिवसापर्यन्त चालले होते? नै म्हणल जरा उकराउकरी करुनच बघुयात! तेवढीच आम्हा अडाण्यान्च्या ज्ञानात भर पडेल नं!<<

लिंबूभौ, त्याच्या पुरावा तुम्हाला "जागो मोहन प्यारे" देतील, त्यांच्याशी संपर्क करा. त्यांचे वाचन आणि ज्ञान अगाध आहे. बाकीचे काय बिनबुडाचे लेख आणि प्रतिक्रीया लिहतात. तेंव्हा तुम्ही त्यांना विचारा कसे! Proud

नेहेमीप्रमाणे; झक्कींचे काही मुद्दे पटतात काही पटत नाहीत आणि जे पटत नाहीत तेसुद्धा डोके खाजवायला भाग पडतात.......
अवांतर...... झक्कींना माबोचे बाळासाहेब म्हणावे का????? Lol Light 1

धन्यवाद अक्षय जोग..............उत्तम लेख
सावरकरांनी रत्नागिरीत जे अस्पृश्यता निवारण आणि हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन यासाठी जेवढे प्रयत्न केले तितके अन्य कुणाही कथित “महात्म्या”नी केलेले नाहीत ,हे वास्तव आहे

बिग्रेडी बोके काहीही बरळोत ,ते,त्यांची पुस्तके, विधाने ,भाषणे ही बहुधा संध्याकाळच्या “तीर्थ” ग्रहणानंतर केलेल्या महान विचार-साधनेचा परिपाक आहेत .
Lol

http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm

ते ५५ कोटी देऊन टाकावेत असे गांधीजींना वाटत असले तरी गांधीजींच्या उपोषणाचा आणी ५५ कोटींचा संबंध नव्हता.

>>> त्या ऐवजी बापुंनी असहकार, छोडो भारत सारख्या देशव्यापी चळवळी राबवुन या देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले.

परत तेच आणि तेच तेच

>>> सावरकरांचा माफिनाम्याचा दूरदृष्टीकोन मान्य केला तरी त्यांनी सुटका झाल्यानंतर विशेष काय केले हा प्रश्न शिल्लक राहतोच.

या शंकेवर गा.पैं. नी उत्तर दिले आहे.

>>> धर्माच्या आधारे फूट पाडणे गांधीजींना कधीच मान्य नव्हते,

असे होते तर भारताचा काडीमात्र संबंध नसलेल्या दूरवरच्या तुर्कस्तानमधील खिलाफत चळवळीला त्यांनी का पाठिंबा दिला?

>>> त्यांच्या मुशीतच तयार झालेले नेहरुंसारखे एक तेजाळते व्यक्तीमत्व भारताला मिळाले.

नेहरू तेजाळते होते का ते अवतारी महापुरूष होते का ते प्रेषित होते का ते द्रष्टे होते यावर काहीच अवलंबून नव्हते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी भारताच्या हिताच्या व भवितव्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतले होते का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर दुर्दैवाने "नाही" असे आहे. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा त्यांनी केलेल्या गंभीर घोडचुकांचे परिणाम भारत आजही भोगत आहे. ते कितीही तेजःपुंज असले तरी त्यांनी निर्माण केलेल्या या समस्यांवर आजही समाधानकारक तोडगा नाही.

>>> गांधी, नेहरु नसते तर आपल्याला अजूनही पारतंत्र्यात खितपत पडावे लागले असते.

हा एक मोठा गोड गैरसमज आहे. ते नसते तरी भारत स्वतंत्र झालाच असता, कदाचित १९४७ पूर्वीच.

>>> एकंदरच जगाने स्विकारलेला हा महात्मा आपल्याला वंदनीय असायलाच हवा.

जगाने त्यांना स्वीकारले आहे म्हणजे नक्की काय केले आहे? त्यांची अहिंसा कोणत्या देशाने मान्य केली आहे? देशाला संरक्षणासाठी सैन्याची गरज नाही असा त्यांचा विचार कोणता देश मानतो? मद्यपान व मांसाहार करू नका हे कितीजण पाळतात? संपूर्ण स्वदेशी वस्तू कोणता देश वापरतो? खेड्याकडे चला हा संदेश कोणता देश आचरणात आणतो?

त्यांचे कुठलेच विचार भारताने किंवा भारतीयांनी सुद्धा स्वीकारले नाहीत तर इतर देश काय ते स्वीकारणार? त्यांचे पुतळे उभारणे किंवा भारताला भेट देणार्‍यांनी विदेशी पाहुण्यांनी राजघाटावर त्यांच्या समाधीला पुष्पचक्र वाहणे किंवा "गांधीजींच्या विचारांची आजही जगाला गरज आहे" अशी पुस्तकी वाक्ये बोलून दाखविणे किंवा गांधी टोपी घालून फोटो काढून घेणे इ. गोष्टींना तुम्ही "गांधीजींना जगाने स्वीकारले आहे" असे मानत असाल, तर त्यांना जगाने स्वीकारले आहे हे मी मान्य करतो.

रच्याकने, गेल्या वर्षी भारताच्या भेटीवर आलेल्या सौदी अरेबियाच्या राजाने राजघाटावर जाऊन त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यास नकार दिला होता (कारण उघड आहे). त्यामुळे सौदी अरेबियाने त्यांना स्वीकारले आहे असे म्हणता येणार नाही. इंग्लंडच्या युवराज चार्ल्सने देखील मुंबईत गांधी टोपी घालण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याने देखील गांधीजींना स्वीकारले आहे असे म्हणता येणार नाही. गांधीजींनी आपल्या मृत्युनंतर आपली रक्षा सर्व देशांच्या भूमीत टाकली जावी अशी इच्छा व्यक्त केली होती. 'ते हिंदूंचे पक्षपाती होते' असे सांगून त्यांची रक्षा स्वीकारण्यास पाकड्यांनी नकार दिला होता. ज्या देशाला ५५ कोटी मिळावेत म्हणून गांधीजींनी आमरण उपोषण केले होते, त्या पाकड्यांनी देखील त्यांना स्वीकारले होते असे म्हणता येणार नाही.

एक शंका - सभासदत्व घेतल्या पासून केवळ २-३ तासात यांनी शुद्ध मराठीत प्रतिसाद कसा लिहिला?

गांधीजी फाळणीला जबाबदार होते हा आरोप धादांत खोटा आहे,
------- फाळणीला कोण जबाबदार होते?

देशाला स्वातंत्र्य मिळतानाच १०-१२ लाख लोकांची हत्या होते... याला जबाबदार कोण होते? सर्व खापर जिना आणि मुस्लिम लिग वर ढकलुन काँग्रेसचे अपयश टाळता येणे शक्य नाही.

>>सावरकरांनी रत्नागिरीत जे अस्पृश्यता निवारण आणि हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन यासाठी जेवढे प्रयत्न केले
या बरोबरच भाषा शुद्धी आणि संवर्धनाचे पण कार्य मोठे आहे की जे दुर्दैवाने अनेकांना माहित नाही.
मध्यप्रदेशमधे विद्याचरण शुक्ला सरकार होते त्यावेळेस त्यांनी भाषेसंदर्भात सावरकरांनी सुचविलेल्या तब्बल ७५% गोष्टी उल्लेखपुर्वक स्विकारलेल्या आहेत. केवळ मराठीच नव्हे तर हिंदीमधे देखील अनेक शब्द जे आज रूळले आहेत ती सावरकरांची देणगी आहे.
केवळ स्वातंत्र्यवीर नव्हे तर उत्तम साहित्यिक देखील होते. त्यांची गीते, नाटके तर प्रसिद्ध आहेतच, तसेच ते साहित्य संमेलन, नाट्य संमेलन, इ. चे अध्यक्ष पण होते. त्यांच्या बुद्धीची प्रगल्भता आणि झेप फार म्हणजे फारच कमी लोकांमधे आढळून येते.
फार वाईट वाटते की एवढ्या थोर नेत्याचे जीवन कॉन्ग्रेसी नेत्यांच्या कोत्या विचारसरणीमुळे पार वादग्रस्त झाले, झाकोळून गेले. जे त्यांच्या विरूद्ध निरर्गल बडबड करतात त्यांना खरेच लाज वाटली पाहिजे.
प्रा. राम शेवाळकर यांनी सावरकरांच्या जीवनावर विस्तृत व्याख्यान दिले आहे. सुदैवाने ते यूट्यूबवर ९ भागांमधे उपलब्ध आहे. ते ऐकताना डोळ्यात पाणी येते. ज्यांना खरेच माहिती हवी आहे त्यांनी अवश्य ऐकावे.
खालीलप्रमाणे शोध घेतल्यास सापडेल.

Veer Savarkar - Prof. Ram Shewalkar - Vyakhyanmala - Part

अशी व्यक्ती जर परदेशात (विशेषतः युरोप, अमेरिकेत) असती तर त्या लोकांनी त्याचे कोण कौतुक केले असते. कधी कधी वाटते सावरकर भारतात जन्माला आले हे त्यांचे दुर्दैव की काय.
आता याउपर या विषयावर काय लिहावे ? इति लेखनसीमा !

वाचकहो,

आपण भारताने पाकला द्यायच्या ५५ कोटींबद्दल बोलत आहोत. तसेच पाककडून भारताला ३०० कोटी रुपये येणे आहे. त्यासंबंधी कोणीच बोलत नाही. Angry

काँग्रेस सरकार गेले ६०+ वर्षे झोपा काढीत होते हे नव्याने सांगणे नलगे! मायबोलीवरील कोणी लेखपाल आजच्या दरात चक्रवाढ व्याजासह किती पैसे होतील याचा हिशोब मांडेल का?

आ.न.,
-गा.पै.

अक्षय,बर्वे व महेश जी यांनी योग्य त्या पद्धतीने विवेचन केलेले आहे .........
नेहरू हा एक संधीसाधू आणि स्वार्थी ,विलासी मनुष्य होता ,त्याला फाळणी आणि त्यानंतरचे भीषण परिणाम,तसेच सिंध /काश्मीर /बंगाल मधील आणि इतरत्र हिंदू वरील अन्यायाशी काहीही सोयर-सुतक नव्हते .
त्याला फक्त खुर्ची हवी होती ,आणि त्यासाठी कोणत्याही थराला जायची तयारी होती
गांधी आपल्या निरर्थक आदर्श आणि दुबळ्या अहिंसेची टिमकी वाजवत राहिले .
या दोघांच्या निष्क्रीयतेचे भयानक परिणाम आज आपण भोगत आहोत .
एकाच महत्त्वाचा प्रश्न-
जर फाळणी नंतर पाकिस्तान आणि पूर्व बंगाल मधील हिंदूंना जबरदस्तीने हाकलण्यात / ठार मारण्यात आले ,
तर उर्वरित भारतातील सर्व मुस्लिमांना त्याच वेळी पाकिस्तानात का पाठवण्यात आले नाही?
या एका प्रश्नात आधुनिक भारताच्या अनेक अजस्र आणि महा-भयंकर समस्यांची बीजे दडली आहेत ............
सूज्ञास अधिक सांगणे नलगे !

Pages