सावरकरांची क्षमापत्रे: आक्षेप आणि वास्तव

Submitted by अक्षय जोग on 21 September, 2011 - 04:52

सावरकरांची क्षमापत्रे: आक्षेप आणि वास्तव

सावरकर इंग्रजांची क्षमा मागून अंदमानातून सुटले! नुसती क्षमा मागून नाही तर "मी राजकारणात भाग घेणार नाही व माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे" अशी सपशेल शरणागती पत्करून सुटले व ह्याचे पुरावे नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' उपलब्ध आहेत. अशाप्रकारे सावरकरांवर सदैव आरोप केला जातो. (पहा: Far from heroism - The tale of 'Veer Savarkar by Krishnan Dubey and Venkitesh Ramakrishnan, 7 Apr 1996, Frontline)

ज्याव्यक्तीने सावरकर चरित्र अभ्यासले आहे किंवा निदान 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र वाचले आहे त्यांना ह्या आरोपातील फोलपणा त्वरीत लक्षात येईल. प्रथम सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांच्या तुरूंगात खितपत पडणे ही काही सावरकरांची देशभक्तीची कल्पना नव्हती, ते त्यांचे ध्येयही नव्हते. “काराग्रुहात राहून जी करता येत आहे त्याहून काही तरी अधिक प्रत्यक्ष सेवा या आमच्या मात्रुभूमीची करता येईल अशा प्रकारच्या कोणत्याही अटी मान्य करून मुक्तता करून घेणे हे प्रतियोगी धोरणानेच नव्हे तर समाजहिताचे द्रुष्टीनेही आमचे परम कर्तव्य आहे.” (माझी जन्मठेप: भाग २, लेखक: वि.दा. सावरकर, पृष्ठ क्रमांक: १६१, ह्यापुढे ‘कित्ता-२’ असा संक्षिप्त उल्लेख केला जाईल.) व तसेच “अंदमानात जे काय राष्ट्रहित साधता येईल ते इतके महत्त्वाचे कधीही नसणार की जितके मुक्तता झाल्यास हिंदुस्थानात येऊन साधता येईल; परंतु म्हणून मुक्ततेसाठी वाटेल ते विश्वासघातक, निंद्य, नीच आणि देशाच्या किंवा जातीच्या स्वाभिमानास कलंक लागेल, असे लाळघोटी वर्तन त्यामुळे समर्थनीय ठरणार नाही. कारण त्यायोगे होणारी मुक्तता ही राष्ट्रास अधिक हितकारक होण्यापेक्षा स्वतःचे उदाहरणाने अधिक अनीतिमान आणि राष्ट्र्घातकी मात्र होणारी होती.” (कित्ता-२, पृष्ठ: १०९) अशी त्यांची मनोभूमिका होती. म्हणजे सुटकेसाठी वाट्टेल त्या देशविघातक-देशद्रोही अटी त्यांनी मान्य केल्या नाहीत.

तसेच हे केवळ सावरकरांचे मत नव्हते तर त्यांचा आंग्ल-मित्र डेव्हिड गार्नेटचेही हेच मत होते. “सावरकरांसारखी उत्कट चैतन्यमय व्यक्ती कारागारात जीवन कंठीत असलेली मी सहनच करू शकत नाही." (In the first volume of his autobiography, The Golden Echo, Harcourt, Brace and Company, New York, 1954)

सावरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते. अफजलखानवधा आधी, सिद्दी जोहारच्या वेढ्याच्यावेळी त्यांनी अशीच शत्रूला बेसावध करणारी पत्रे पाठवली होती, तसेच पुरंदरच्या तहावेळी महाराजांनीही अशीच वेळप्रसंगी औरंगजेबापुढे शरणागती पत्करली, त्याच्या मानहानीकारक अटी मान्य केल्या व पुढे सामर्थ्य प्राप्त होताच मोगली सत्तेविरूद्ध संघर्ष चालू ठेवला. हा कूटनीतिचा एक भाग असतो.

पहिले महायुद्ध १९१४ ला सुरू झाल्यावर सावरकरांनी हिंदुस्थान सरकारकडे आवेदनपत्र धाडले, ते पत्र मुळातूनच वाचावे, मी त्याचा मुख्य आशय उधृत करतो:“हिंदुस्थानाला औपनिवेशक स्वायत्तता (Colonial-Self Government) द्यावी, वरिष्ठ विधिमंडळात हिंदी प्रतिनिधीचे निरपवाद बहुमत व त्याबदल्यात क्रांतिकारक इंग्लंडला महायुद्धात सहाय्य देतील अशा मागण्या केल्या होत्या व ‘युरोपात बहुतेक राष्ट्रे आपआपले अंतर्गत राजबंदी सोडून देत होती, आयरिश 'राजद्रोही' बंदीही सुटले होते’ अशी उदाहरणेही दिली होती. तसेच मला सोडता येत नसेल तर सरकारने मला न सोडता अंदमानतल्या, हिंदुस्थानातल्या आणि बाहेर देशोदेशी निर्वासित होऊन अटकून पडलेल्या राजबंदीवानांस तात्काळ मुक्त करावे. त्यांच्या मुक्ततेत मला जवळजवळ माझ्या मुक्ततेइतकाच आनंद वाटेल." अशी निस्वार्थी मागणीही केली होती. म्हणजे सावरकरांची आवेदनपत्रे-मागण्या क्रांतिकारकांच्यावतीने होत्या केवळ स्वतः करिता नव्हत्या. (कित्ता-२, पृष्ठ:४५-४६)
सावरकरांना ह्याची जाणीव होती की काही झाल तरी ब्रिटीश आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत व राजकारणात भाग घेऊ देणार नाहीत, म्हणून मग ‘कारागारीय अन्वेक्षेक मंडळा’पुढे त्यांनी अशी भूमिका मांडली-- "राजकारण करू देत नसाल तर इतर दिशेने देशाची आणि मानवजातीची सेवा करीन, हित करण्यास झटेन. बरे मी ते वचन मोडले तर आपणास मला पुन्हा जन्मठेपीवर धाडता येईल.(कित्ता-२, पृष्ठ:१११). तसेच राज्यपालांशी झालेल्या सुटकेसंदर्भातील चर्चेतही त्यांनी ह्याचे सुतोवाच केले होते, त्याचा सारांश असा: "काही अवधीपर्यंत राजकारणात - प्रत्यक्ष चालू राजकारणात आपण भाग घेणार नाही. कारागारातही राजकारणात प्रत्यक्ष भाग घेता येतच नाही. परंतु बाहेर राजकारणव्यतिरिक्त शैक्षणिक, धार्मिक, वाड्मयात्मक अशा अनेक प्रकारांनी तरी राष्ट्राची सेवा करता येईल. लढाईत पकडलेले सेनापती, युद्ध चालू आहेतो प्रत्यक्ष रणात उतरू नये, 'धरीना मी शस्त्रा कदनसमयीं या निजकरी' अशी यदुकुलवीराप्रमाणेच प्रतिज्ञा करवून घेतल्यावर त्या अभिवचनावर (on Parole), सोडण्यात येतच असतात. आणि त्या यदुकुलवीराप्रमाणेच ते राजनीतिज्ञ सेनानी प्रत्यक्ष शस्त्रसंन्यास तेवढा करावा लागला तरी राष्ट्रकार्यात त्याचे सारथ्य तरी करता यावे म्हणून अशी अट मान्य करण्यात काही एक कमीपणा मानीत नाहीत तर उलट तसे करणे हेच तत्कालीन कर्तव्य समजतात." (कित्ता-२, पृष्ठ:१६२) ह्यानुसार सावरकरांनी कारावासातील मुक्ततेनंतर अटीनुसार राजकारणाव्यतिरिक्त शुद्धी, समाजसुधारणा, विज्ञाननिष्ठता, भाषाशुद्धी, लिपीसुधारणा अशा प्रकारे प्रचंड समाजकारण केले.

जे जे राजबंदीवान अंदमानातून सुटले त्यातील बहुतंशी जणांनी अशाच प्रकारच्या करारपत्रावर स्वाक्षऱ्या करून सुटका करून घेतली होती. उदा. "मी यावर पुन्हा कधीही - किंवा अमुक वर्षे - राजकारणात आणि राज्यक्रांतीत भाग घेणार नाही. पुन्हा मजवर राजद्रोहाचा आरोप सिद्ध झाला तर मी ही माझी मागची उरलेली जन्मठेपही भरीन! (कित्ता-२,पृष्ठ:१२०)

सावरकरांचे जे पत्र 'क्षमापत्र' म्हणून दाखवतात ते पाहण्यासाठी नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' जायची आवश्यकता नाही. ते पत्र 'अंदमानच्या अंधेरीतून' ह्या पुस्तकात ‘पत्र ८ वे- दिनांक ६-७-१९२०’ शीर्षकाखाली छापलेले आहे.(इंग्रजांना पाठविलेल्या आवेदनाचा मूळ दिनांक २-४-१९२०).हा पहा त्यातील मुख्य गाभा:

हिंदुस्थानातील वरिष्ठ कार्यकारी मंत्रिमंडळाच्या सभासदासारख्या प्रतिष्ठित अधिकाऱ्यांनी मला आणि इतरांना पुढील प्रश्न पुष्कळदा टाकला होता - "तुम्ही पूर्वीच्या हिंदी राज्याच्या विरूद्ध उठावणी केली असती तर तुमची स्थिती काय असती? ते विद्रोह्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवीत!" त्याला माझ्याकडून उत्तरही मिळाले होते. हिंदुस्थानातच काय, जगाच्या कोणत्याही देशात - प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये सुद्धा - विद्रोह्यांना कधी कधी असली भयंकर शिक्षा भोगण्याचे दैवी येई. पण मग इंग्रज लोकांनी युद्धाच्या वेळी जर्मन लोक आमच्या बंद्यांना वाईट रीतीने वागवतात आणि त्यांना रोटी आणि लोणी देत नाहीत अशा कोल्हेकुईने जगाच्या कानठळया का बसवाव्या? एक काळ असा होता की ज्या वेळी काराग्रुहातील बंद्यांची जिवंतपणी कातडी सोलीत आणि त्यांना मोलॉक, ठॉर किंवा असल्याच युरोपातील युद्ध देवतांना बळी देत असत" अशी आठवण दिली. खरी गोष्ट अशी आहे की, ही जी जगाच्या संस्कृतीत मनुष्यप्राण्याने सुधारणा घडवली आहे ती सर्व राष्ट्रांतील मनुष्याचे प्रयत्नांचे संकलित फळ आहे आणि म्हणून तिच्यावर सर्व मनुष्यजातीचा वारसा आहे व तिचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे. त्या रानटी युगाच्या तुलनेनेच म्हणावयाचे तर माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे; आणि मनुष्यभक्षक जाती आपल्या बंद्यांना जी शिक्षा देत किंवा चौकशीचे जे नाटक करीत त्यापेक्षा अधिक चांगली पद्धती या सरकारची आहे या प्रशस्तीपत्राने सरकारचे समाधान होत असेल तर त्याला माझी ना नाही. पण त्यावेळीच हेही विसरता कामा नये की, पूर्वीच्या काळात राजे विद्रोह्यांना जसे जिवंत सोलीत त्याचप्रमाणे विद्रोहीही त्यांची भाग्यतारा जोरात आल्यावर या राज्यकर्त्यांना जिवंत जाळीत! आणि इंग्रजी जनतेने मला किंवा इतर विद्रोह्यांना अधिक न्यायाने म्हणजे थोड्या रानटीपणाने वागवले असेल तर त्यांनाही आश्वस्त असावे की परिस्थितीची उलटापालट होऊन हिंदी क्रांतिकारकांची तशी पाळी आली तर त्यांच्याकडून त्यांनाही असेच अत्यंत दयेच्या रीतीने वागविण्यात येईल!

सावरकर शत्रूला फसवायचा प्रयत्न करत होते पण ब्रिटीश न फसता स्वकीयच फसले. कधीही कुठलाही ठराव, आवेदन अशा प्रकारची राजकीय पत्रे वाचताना 'दोन ओळींमधील' (between the lines) वाचता आले पाहिजे, जे सावरकरांच्या पत्रावर आक्षेप घेतात ते एकतर 'दोन ओळींमधील' वाचण्यास सक्षम नसतात किंवा 'दोन ओळींमधील' वाचण्याची त्यांची तयारीच नसते.

अंदमानच्या कारावासात त्यांचे मनोधैर्य तर खचले नाहीच पण त्यांनी तशा अमानुष बंदिवासातही हाती साधी कागदपेन्सिल नसतानाही कारागृहातील भिंतींवर ५ हजार ओळींचे उत्कट काव्य लिहिले आणि ते सर्व मुखोद्गत केले! संपूर्ण जगाच्या इतिहासात अशा प्रकारचे हे एकमेव उदाहरण आहे. मनोधैर्य खचल्याचे हे लक्षण म्हणता येइल का?

तसेच असाही आरोप केला जातो की, सर्वांनी अमान्य केलेला माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा निर्बंध सावरकरांनी स्वीकारला. सावरकरांनी काही सुचना केल्या होत्या व त्या मान्य झाल्या तरच तो मान्य असेल असे सांगितले होते. पुरावा म्हणून सावरकरांनी माँटेग्यू आणि गव्हर्नर जनरलला लिहिलेले आवेदनपत्र वाचा: “सरकार खरोखरीच दायित्वपूर्ण शासनाधिकार म्हणजे कमीत कमी वरिष्ठ विधिमंडळात परिणामकारक बहुमत ज्यावर अर्थातच तो एखादा राज्य-समिती (Council od State) चा दगडोबा प्रत्येक वरात शाप मिसळविण्यासाठी स्थापिलेला नाही, असे लोकपक्षीय प्रतिनिधींचे बहुमत देणार असेल आणि या अधिकारदानासहच अशेष राजबंदीवानांस, युरोप आणि अमेरिका इत्यादी ठिकाणी अडकून पडलेल्या आमच्या निर्वासितांसह सर्व राजदंडितांस मुक्त करण्याचे औदार्य दाखवीत असेल तर निदान मी तरी - आणि मजप्रमाणेच इतर कित्येक - अशी राज्यघटना प्रामाणिकपणे स्वीकारीन आणि जर आमच्या लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून आम्हास निवडणे योग्य वाटले तर त्याच विधिमंडळाच्या सभांगणात आमच्या आयुष्याच्या परमध्येयासाठी आम्ही झटू की ज्या विधिमंडळांनी आजपर्यंत आमच्याविषयी केवळ द्वेषच काय तो धारण केला आणि त्यांच्या कार्याविषयी आणि धोरणाविषयी आमच्या मनात तिरस्कार उत्पन्न करून ठेवला.”(कित्ता-२, पृष्ठ:८२) ब्रिटिशांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला हे सांगावयाला नकोच!

सावरकरांच्या ह्या अटी, ही आवेदनपत्रे, ह्यामागील राजकीय खेळी, मनोभूमिका स्वत: सावरकरांनी कधीही लपवून ठेवली नाहीत. सावरकरांचे आत्मचरित्र 'माझी जन्मठेप' मध्ये ह्या सर्वाचा सांगोपांग उहापोह केलेला आहे. त्यामुळे आम्ही नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' जाऊन संशोधन करून पत्र शोधून काढली किंवा र.चं. मुजुमदार (R.C. Mujumdar) ह्यांनी शोध लावला अशा फुशारक्या कोणी मारू नयेत.

व्हिएतनामच्या कम्युनिस्ट 'हो-चि-मिन्ह'नेसुद्धा चीनच्या कोमिंग्टांग कारागृहातून अशाच प्रकारचे पत्र व सहकार्याची अट मान्य करून सुटका करून घेतली होती. मार्शल चांगला त्याने कोमिंग्टांग शासनाच्या आधाराने इंडोचायनात स्थापन झालेल्या 'डाँग-मिन्ह-होई' (जी 'हो-चि-मिन्ह'च्या 'व्हिएत-मिन्ह'ला शह देण्यासाठी स्थापिली होती) या संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली व सुटका करून घेतली. (व्हिएतनाम: अर्थ आणि अनर्थ, लेखक: वि. ग.कानिटकर, मनोरमा प्रकाशन १९९८, पृष्ठ क्रमांक ५३) तसेच रशियाने जर्मनीशी केलेला अनाक्रमणाचा करार संपुष्टात आल्यावर मित्र राष्ट्रांशी हातमिळवणी केली, तेव्हा एका रात्रीत कम्युनिस्टांनी आपली निष्ठा बदलली. म्हणजे कम्युनिस्ट करतील ती राजकीय खेळी व सावरकर करतील तो द्रोह? तात्पर्य हेच की ‘झोपलेल्याला उठवता येते पण झोपेचे सोंग करणाऱ्याला उठवता येत नाही.’

लेखक: अक्षय जोग

(सर्वांना लेखातील संदर्भशोध सहज घेता यावा यासाठी 'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक' प्रकाशित 'माझी जन्मठेप भाग १ व २' पुस्तकाचा आधार घेतला आहे; हे पुस्तक खालील संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध आहे. http://www.savarkarsmarak.com/downloadbooks.php)

गुलमोहर: 

गांधींचा उदोउदो करणारे आणि अहिंसेचे गोडवे गाणार्‍या लोकांना गांधींचे खरे विचार किती माहिती आहेत आणि किती समजले आहेत राम जाने.
----------------------------------
हिंसक शौर्य म्हणजे सभ्य हिंसा. हिंसेलाहि शिष्टपणाची, सभ्यपणाची मर्यादा असली, तरच तिची गणना शौर्यात होते. असभ्य हिंसा म्हणजेच क्रौर्य, कसाबकरणी, अमानुषता ! गांधी म्हणतात, आपण कसाबाबरोबर कसाब झालो तर दोन कसाब होतील. मारेकऱ्यांचा संप्रदाय वाढेल. सैतानाबरोबर सैतान झालो, हैवानाबरोबर हैवान झालो, तर हैवानांची संख्या वाढेल. आपल्याला गुंडांचे पारिपत्य करावयाचे आहे. स्वत: गुंड बनावयाचे नाही.

धर्माचे रक्षण गुंडगिरीने होणे शक्य नाही. फार तर क्षत्रियाची मर्यादित व सभ्यपणाने युक्त हिंसा धर्मसंमत ठरू शकेल. क्षत्रियांचे शौर्य धर्माचे रक्षण करील. पण क्षत्रियांच्या क्षात्रतेजाने रक्षित धर्म आणि गावगुंडांच्या भरमसाट अत्याचारांनी रहित धर्म यांच्यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. एकाला जर धर्म म्हणावयाचे तर दुसऱ्याला पाप म्हणावे लागेल.

आपल्याला मानवी सभ्यतेचे व स्वधर्माचे रक्षण करावयाचे आहे; ते अहिंसक शौर्यानेच होईल; फार तर, ते हिंसक प्रतिकाराने होईल; पण क्रौर्याने कालत्रयीहि होणार नाही असा गांधींच्या म्हणण्याचा आशय आहे. म्हणून ते म्हणतात गुंडगिरीशी प्रतिगुंडगिरीने लढू नका. गुंडगिरीचा प्रतिकार पराक्रमाने करा. (संदर्भ : "मानवनिष्ठ भारतीयता", लेखक : आचार्य दादा धर्माधिकारी)

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्फूर्तिस्थान शिवराय, श्रीकृष्ण, रामदास होते.; महात्मा गांधी नव्हेत!
महात्माजींची स्फुर्तिस्थाने वेगळी होती. तेव्हा सावरकरांनी चोखाळलेल्या मार्गांचे विश्लेषण संत महात्म्यांच्या विचारांची फूट्पट्टी लाऊन करणे सावरकरांना आणि संतानाही अन्याय करणारे आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यावर सत्ता महात्माजींच्या अनुयायांच्या हाती गेल्याने त्यांनी (नेहरूंनी) तेथे चिकटून बसण्यासाठी 'फक्त गांधी हिरो बाकी सब झिरो' हा कार्यक्रम राबवला. गांधीजींच्या फूटपट्टीने सगळे मोजणे चालवून सशस्त्र क्रांतीचा मार्ग चोखाळणार्‍या सर्वांचा त्याग मातीमोल ठरवला. तरीही त्यांचे नामोनिशाण मिटवणे शक्य होईना म्हणून बदनामी करणे सुरू आहे. आपला लेख उत्तम आहे.

छान लेख.. छान माहिती... वरील सर्व नव्याने वाचताना पुनः हे अधोरेखीत होते की वीर सावरकर हे धूर्त धोरणी व वाटाघाटी करणारे होते, a shrewed negotiator.. आता एखाद्याला त्यातून "ते पळपुटे होते, स्वार्थी होते, कमजोर होते..." असले अर्थच काढायचे असतील तर काढू देत ना, त्याने फार काही बदलेल असे वाटत नाही.

खरे तर इतीहासातील सर्वच घटना या स्थळ/काळ/वेळ/परिस्थिती/ऊद्दिष्टे या सर्वाच्या संदर्भाने पाहिल्या, तपासल्या तर गोंधळ होत नाही. सावरकर वि. गांधी अशी नेहेमीची फेमस गरळओक करणार्‍या दोन्ही बाजूंनी हे लक्षात घेतले तर मला वाटते या घटनांतून (इतीहासातून) बरेच काही शिकता येईल.
गांधी, सावरकर दोन्ही आपलेच नाही का? (हा आता ते मुळात भारतीयच नाहीत असे म्हणणे असेल तर बोलणे संपले!) मग एकापेक्षा दुसर्‍याला कमी अधिक लेखून नेमके काय साध्य होते हे कळत नाही. गांधीगीरी करणे सोपे आहे, सावरकरगीरी (नविन शब्द!) करणे तेव्हडे सोपे नाही असे काही आहे का? Happy
आपल्याच आदर्शांना आपणच झोडपायची आपली जुनीच खोड आहे. अर्धवट संदर्भ वापरून त्यामुळे असे लिहीलेले वादग्रस्त लेख (बातम्या, मिडीया, तत्सम प्रकाशने) ही आजची फॅशन आहे. कारण काही काळ ते "लक्षवेधी" ठरते, खपते, धंदा होतो. काही गटाच्या भावना दुखावतात (शिल्लक असल्या तर!) आणि मग पुनः सर्व विसरून काहीतरी नविन लक्षवेधी बाजारात येते. असो.

एक छान वाक्य वाचले: Hindsight can be developed into insight for greater control.

मंदार,
इतीहास ईथे ट्विस्टेड स्वरूपात कुणी मांडत असेल तर तो खोडणे ईष्टच. पण मुद्दामून अशा सावरकर (वा ईतर व्यक्ती) विरोधी लिहीलेल्या विधानांचा अनुल्लेख करावा असे मला वाटते. सावरकर काय किंवा गांधीजी, दोघांपैकी कुणालाही सद्य आधुनिक विचारवंत्/इतीहासकार्/आपण लोक यांच्या कुठल्याही सर्टीफिकेट ची गरज नाहीच.

रच्याकने: आजकाल ममोगीरी अधिक फेमस आहे.. (मला माहित नाही, मी केले नाही, मी प्रामाणिक आहे, मी दीन आहे, लाचार आहे, म्हणून मी निर्दोष आहे, बाकीच्यांचे माहित माही.. ) Happy

>>गांधीगीरी करणे सोपे आहे, सावरकरगीरी (नविन शब्द!) करणे तेव्हडे सोपे नाही असे काही आहे का?
माझ्यामते असे आहे. काहीही न करणे (असहकार) हे काहीतरी करण्यापेक्षा कितीतरी सोपेच ना? Happy
असो.

Proud

पुर्वी जे लोक होऊन गेले, त्यांनी जे काही बरे वाईट केले, त्या सगळ्यातुन देशहितासाठी / समाजहितासाठी जेवढे योग्य तेवढे घ्यावे बाकीचे सोडून द्यावे. असे केल्यानेच भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहील आणि सुराज्य येईल.
आपणच आपापसात झगडत राहिलो तर बाहेरच्यांना आयतेच फायदेशीर ठरेल. लोक हो जागे व्हा !

हा देश गांधीजींमुळे आहे...नथुराम वा सावरकरामुळे नाही.

व्वा! काय पण देश आहे!! आधी बराचसा भाग तोडून पाकीस्तानला दिला, आणखी थोडा त्यांनी बेकायदेशीरपणे बळकावला, तो अजून सोडवून घेता येत नाही, कुणिहि फद्या माणूस बंदुका घेऊन येतो नि देशाच्या प्रत्यक्ष लोकसभेवर हल्ला करतो, त्याला दोषी ठरवूनहि फाशी देणे जमत नाही. नि मुंबईसारख्या ठिकाणी गाड्यांमधे बाँब फोडून निरपराध लोकांना मारले तरी काही वर्षांनी परत तसाच हल्ला होतो!!
जागात यांच्या मताला कुत्रा देखील किंमत देत नाही एव्हढी प्रतिष्ठा!
अहिंसा, आपल्याला शस्त्रे काय करायची, आपण कॉफीपॉट बनवू, नि चिनी लोकांशी पन्नास वर्षांपूर्वीच्या ३०३ रायफली घेऊन लढू!! (माझे मित्र बिचारे मेले त्या लढाईत, म्हणून एव्हढा राग!)

-बाकी भ्रष्टाचार तर काही विचारूच नका!! आणि राजकारणी? धन्य, धन्य!!

वा, वा! म. गांधींमुळेच बरे.
इकडे न्यू यॉर्कवर एक हल्ला झाला नंतर कुणाची हिंमत नाही वाकडा डोळा करून बघण्याची!
Sad Sad Sad

अक्षयजी, मनःपूर्वक आभार या माहितीपुर्ण लेखासाठी !

झक्कीकाकांनी दिलेले उदाहरण खरेच विचार करण्यासारखे आहे. जर गांधीजींनी दिलेल्या मार्गाने स्वातंत्र्य मिळालेले असेल (नाही गांधीजींचा वाटा कुणीच नाकारत नाहीये इथे, सर्व सामान्य माणसाला रस्त्यावर उतरण्याची ताकद त्यांच्यामुळेच मिळालीय, अशा पद्धतीने सर्व सामान्य माणुस फक्त भगतसिंग प्रभुतींच्या हौतात्म्याच्या वेळीच रस्त्यावर उतरला होता) पण म्हणुन त्याचे श्रेय केवळ गांधीजींना देवून इतरांच्या बलिदानाचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही.

@मंदार : अतिशय छान आणि मुद्देसुद प्रतिसाद.

स्वातंत्रवीर सावरकरांच्या निष्ठेवर, देशभक्तीवर त्यांच्या मुत्सद्दीपाणावर शंका घेणे म्हणजे आपल्या अकलेचे दिवाळे निघाले आहे हे स्वतःच सिद्ध करणे होय आणि इथे बरेचसे मायबोलीकर ते आवडीने करताना दिसतात.

शेवटी महेशजींचा हा प्रतिसाद...

पुर्वी जे लोक होऊन गेले, त्यांनी जे काही बरे वाईट केले, त्या सगळ्यातुन देशहितासाठी / समाजहितासाठी जेवढे योग्य तेवढे घ्यावे बाकीचे सोडून द्यावे. असे केल्यानेच भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहील आणि सुराज्य येईल.
आपणच आपापसात झगडत राहिलो तर बाहेरच्यांना आयतेच फायदेशीर ठरेल. लोक हो जागे व्हा !

याच्याशी सहस्त्रवार सहमत !

>>जागात यांच्या मताला कुत्रा देखील किंमत देत नाही एव्हढी प्रतिष्ठा
>>-बाकी भ्रष्टाचार तर काही विचारूच नका!! आणि राजकारणी? धन्य, धन्य!!

शेवटी गाडी नेहेमीच्या रूळावर येवून अडकलीच... Happy
हलके घ्या हो.. (या वयात) एव्हडा त्रागा तब्येतीला बरा नव्हे!

>>> आधी बराचसा भाग तोडून पाकीस्तानला दिला, आणखी थोडा त्यांनी बेकायदेशीरपणे बळकावला, तो अजून सोडवून घेता येत नाही,

नेहरूंचं चुकलंच. १९४८ मध्ये पाकड्यांनी हल्ला केला तेव्हा काश्मिरमध्ये सैन्य पाठविण्याऐवजी अहिंसेच्या मार्गाने पाकड्यांचा निषेध केला असता व तत्कालीन काँग्रेस पुढार्‍यांनी लाक्षणिक चक्री उपोषण करून मौन पाळलं असतं, तर पाकड्यांनी बळकावलेला भाग लगेच सोडून दिला असता आणि 'पाहिजे तर अजून काही प्रदेश देतो, पण असा अहिंसक लढा नका देऊ' अशी विनवणीही केली असती.

>>> जागात यांच्या मताला कुत्रा देखील किंमत देत नाही एव्हढी प्रतिष्ठा!

+१

>>> इकडे न्यू यॉर्कवर एक हल्ला झाला नंतर कुणाची हिंमत नाही वाकडा डोळा करून बघण्याची!

+१००

सावरकर पळपूटे वगैरे होते असा युक्तीवाद मी तरी कधी ऐकला नाही पण ते कदाचित माझं ह्याबाबतीत फार वाचन नसल्यामुळे असेल. लेखात दिलय आणि वर काही लोकांनी लिहीलय त्याप्रमाणे जेल मध्ये खितपत पडण्यापेक्षा सगळ्या अटी मान्य करुन तिथून सुटणे हे कधीही श्रेष्टच आणि कॉमन सेन्स ला धरुन आहे. आता असल्या साध्या गोष्टीला घेऊन कोणाला बळच काही अर्थ काढायचे असतील तर तो त्यांना काढू द्यावा. दिलेली माहिती निश्चितच उपयोगाची आहे पण त्यामुळे बाकी मुद्दाम भलते अर्थ काढणारे गप्प बसतील अशी अपेक्षा करणे म्हणजे आपलाच वेडेपणा होइल.

>>>> सावरकर पळपूटे वगैरे होते असा युक्तीवाद मी तरी कधी ऐकला नाही <<<<
अहो हल्लीहल्लीच गेल्या पन्धरावीस वर्षातच हा ब्रिगेडी प्रचार सुरू झाला आहे (ज्याला सत्तासम्पादनासाठी मतान्चे राजकारण करीत कॉन्ग्रेस व राष्ट्रवादी यान्चा छुपा वा उघड पाठीम्बा आहे. डावे तर धर्मच मानित नस्लयाने हिन्दुत्ववाद्यान्विरोधातच अस्तात, समाजवाद्यान्च्या बिनकण्याचे धोरणाला काहीच अर्थ नसतो). इकडे देशात कधी सन्धी मिळाली तर घ्या ऐकुन तो प्रचार.

<काहीही न करणे (असहकार) हे काहीतरी करण्यापेक्षा कितीतरी सोपेच ना? >

तुम्हाला माझ्याकडून जे (अन्याय्य) वर्तन अपेक्षित आहे, ते मी करणार नाही; वर तुमच्या लाठ्या आणि बंदुकांच्या समोर उभा ठाकून मी हे तुम्हाला सांगतो आहे.

असे करणे फार सोपे आहे.

मयेकर, हे तत्व कितीही चांगले असले तरी ते सदा सर्वकाळ सर्वत्र सर्व प्रकारच्या लोकांसमोर चालू शकते का ? मी हे विरोध करायचा म्हणुन लिहित नाही. अहिंसेच्या मार्गाने गेल्यामुळे स्वातंत्र्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होऊ शकली हे मलाही मान्य आहे. पण इंग्रज जरा तरी सेन्सिबल असावेत. किंवा त्यांना अहिंसा वगैरे माहिती नसल्याने ते गांगरून गेले असावेत. बाकी आपले शेजारी देश आहेत का तसे सेन्सिबल किंवा देशांतर्गत जे बंडखोर आहेत (उदा. नक्षलवादी, अन्य अतिरेकी, इ.) त्यांच्या समोर उभे ठाकून सांगू शकणार आहोत का आपण ?

>>तुम्हाला माझ्याकडून जे (अन्याय्य) वर्तन अपेक्षित आहे, ते मी करणार नाही; वर तुमच्या लाठ्या आणि बंदुकांच्या समोर उभा ठाकून मी हे तुम्हाला सांगतो आहे.

असे करणे फार सोपे आहे.

सोपे? अनेक बाबतीत तर हास्यास्पद देखील आहे Biggrin

महेश , कोठे कोणाता मार्ग वापरायचा याचे तारतम्य मार्ग दाखवणार्‍याला असते. तुम्ही म्हणता त्या प्रसंगांत शस्त्र हाती घेऊ नका असे गांधींनी सांगितलेले नाही.

"I WOULD risk violence a thousand times rather than risk the emasculation of a whole race.

I do believe that, where there is only a choice between cowardice and violence, I would advise violence....I would rather have India resort to arms in order to defend her honour than that she should, in a cowardly manner, become or remain a helpless witness to her own dishonour.

But I believe that nonviolence is infinitely superior to violence, forgiveness is more manly than punishment. Forgiveness adorns a soldier...But abstinence is forgiveness only when there is the power to punish; it is meaningless when it pretends to proceed from a helpless creature....

But I do not believe India to be helpless....I do not believe myself to be a helpless creature....Strength does not come from physical capacity. It comes from an indomitable will.

The world is not entirely governed by logic. Life itself involves some kind of violence and we have to choose the path of least violence. "

देशोदेशींच्या स्वातंत्र्यासाठीच्या/ अन्यायाविरुद्धच्या लढ्यांवर नजर टाकलीत सशस्त्र संग्रामापेक्षा अहिंसक आंदोलने जास्त दिसतील.

-----
काहीही न करणे यातले मी करणार नाही हे म्हणायला धैर्य लागते ते आंतरिक शक्तीतूनच येऊ शकते.

>>> काहीही न करणे यातले मी करणार नाही हे म्हणायला धैर्य लागते ते आंतरिक शक्तीतूनच येऊ शकते.

हे मान्य आहे मला. असे करायला नक्कीच प्रचंड धाडस लागते.

पण शस्त्रसज्ज आणि क्रूर परकीय शत्रूंविरूद्ध हे धोरण कितपत व्यावहारिक आणि यशदायी आहे? असे धाडस व एवढी प्रचंड आंतरिक शक्ती किती जणांत असू शकते? हे धोरण पोर्तुगीजांविरूद्ध गोवा व दादरा, नगर, हवेली स्वतंत्र करण्यासाठी उपयोगी पडलेले नाही. हे धोरण हैद्राबाद, जुनागढ इ. संस्थाने मुक्त करण्यासाठीही उपयोगी पडलेले नाही. उर्वरीत भारताला फक्त अहिंसक लढ्यामुळेच स्वातंत्र्य मिळाले हा दावा खूपच धाडसी होईल.

भारताबाहेरसुद्धा अहिंसक लढा फारसा उपयोगी पडलेला नाही. १९७९ मध्ये रशियाने अफगाणीस्तान पादाक्रांत केल्यावर जर तिथल्या मुजाहिदांनी सशस्र लढा दिला नसता, तर आज २०१२ मध्ये सुद्धा तिथे रशियाचेच राज्य राहिले असते.

पण सशस्त्र मार्ग सुद्धा तितका सोपा नाही. त्यात जनतेचा संघटित व सक्रीय सहभाग लागतो. या मार्गाने लढा देणार्‍यांचे प्रयत्न बहुतांशी असंघटित होते (उदा. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध, वासुदेव बळवंत फडके, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद इ. चे प्रयत्न). पण गांधीजी व सुभाषचंद्र बोस यांनीच मुख्यत्वेकरून आपापल्या मार्गाने संघटित प्रयत्न केले हे मान्य आहे.

मास्तुरे.....तुमचे म्हणणे बरोबर आहे परंतु ज्या अफगाणी लढ्याचा संदर्भ दिला आहे त्या अफगाण ची परिस्थिती काय आहे हे ही बघावे ......... हिंसक लढा दिल्यावर काय होते ते आता लिबिया मधे ही दिसुन येतच आहे..
या उलट थोडेफार हिंसक आणि बहुतांशी अहिंसक लढा देउन भारतात शांततेत स्थिरता आली आहे....
.
.
त्या मुळे फक्त हिंसाच बरोबर आहे हे म्हणने चुकीचे ठरते

>>देशोदेशींच्या स्वातंत्र्यासाठीच्या/ अन्यायाविरुद्धच्या लढ्यांवर नजर टाकलीत सशस्त्र संग्रामापेक्षा अहिंसक आंदोलने जास्त दिसतील.<<

ब्रिटिश भारतातील सर्व संपत्ती दोन्ही देशात समानतेने वाटली गेली, पण या प्रक्रीयेला फारच उशीर लागत होता. गाधींजीनी पाकीस्तानाच्या वाट्याला आलेले धन त्यांना लवकारात लवकर देण्यात यावे यासाठी भारत सरकारवर दबाव वाढवायला सुरुवात केली. पण तो पर्यंत भारत आणि पाकीस्तान या दोन्ही देशांच्या मध्ये युध्दाची ठीणगी पडली होती, भारत सरकारवर युध्दाची कारवायी थांबवून पाकिस्तानाला त्यांच्या हिस्स्याची रक्कम देवून टाका. यासाठी गांधीनी त्यांच्या तीन अस्त्रांपैकी उपोषणचा हत्यार बाहेर काढले. आणि दबाव वाढविण्यासाठी आमरण उपोषण सूरु केले. आणि भारत सरकारला सैनिकी कारवाई थांबवुन गांधीच्या या दबावा पूढे झुकावे लागले. आणि पाकिस्तानाला पंच्चावन कोटी द्यावे लागले.

दंग्यात मारल्या गेलेल्या जवळ-जवळ पाच लाख(सरकारी आकडा) आणि निर्वासित झालेल्या आठ ते दहा लाख लोंकाच्या प्रेतांवर उभे राहून १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री नेहरुनी लाल किल्ल्यांवरुन भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा केली.

आचार्य अत्र्यांच्या भाषेत सांगयच झाल तर "हिंसेला जितकी हींसा करता आली नसती तितकी हिंसा अहींसेने केली"

योग, संपुर्ण पोस्ट्ला , विशेषतः-
खरे तर इतीहासातील सर्वच घटना या स्थळ/काळ/वेळ/परिस्थिती/ऊद्दिष्टे या सर्वाच्या संदर्भाने पाहिल्या, तपासल्या तर गोंधळ होत नाही. सावरकर वि. गांधी अशी नेहेमीची फेमस गरळओक करणार्‍या दोन्ही बाजूंनी हे लक्षात घेतले तर मला वाटते या घटनांतून (इतीहासातून) बरेच काही शिकता येईल.
प्रचंड अनुमोदन.
बाकी चर्चा ज्या मार्गाने जिथे जाणार तिथेच चालली आहे.

55.JPGआणि पाकिस्तानाला पंच्चावन कोटी द्यावे लागले.

किती खोटं बोलताय आंग्रे.. ते ५५ कोटी पाकिस्तानला कधीही दिले गेलेले नाहीत.. ती रक्कम ७५ कोटी होती. त्यातले २० कोटी पाकिस्तानला दिले गेलेले आहेत.. काही तरी खोटी उंडगी कारणं देऊन गांधीजींवर कशला चिखलफेक करताय?

http://koenraadelst.bharatvani.org/articles/fascism/gandhimistake.html

(6) Refusing to acknowledge that Pakistan had become an enemy state after its invasion of Kashmir, by undertaking a fast unto death in order to force the Indian government to pay Pakistan 55 crore rupees from the British-Indian treasury. Pakistan was entitled to this money, but given its aggression, it would have been normal to set the termination of its aggression, including the withdrawal of its invading troops, as a condition for the payment. Indeed, that would have been a sterling contribution to the cause of enduring peace, saving the lives of the many thousands who fell in subsequent decades because of the festering wound which Kashmir has remained under partial Pakistani occupation. Coming on top of Gandhi's abandonment of the Hindus trapped in Pakistan in August 1947, it was this pro-Pakistani demand, as well as his use of his choice moral weapon (left unused to save India's unity or the persecuted Hindus in Pakistan) in the service of an enemy state's treasury, that angered a few Hindu activists to the point of plotting his murder.

अहिंसक मार्गाचा एक फायदा भारताला नक्कीच झाला तो म्हणजे संपुर्ण देशाची मानसिकता इतर देशांप्रमाणे हिंसक बनली नाही. ती तशी बनती तर अंतर्गत यादवी देखील आजपेक्षा कितीतरी पटीने जास्त डोईजड झाली असती. तसेच सत्ता बहुतांशी लष्कराच्या नियंत्रणात राहिली असती.
स्वातंत्र्य जर पुर्णपणे हिंसक मार्गाने मिळाले असते तर हिंसेला नको इतकी प्रतिष्ठा लाभली असती तसेच अशा भडकलेल्या हिंसेचा उद्रेक कमी करणे हे एक वेगळेच मुख्य काम होऊन बसले असते. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील लोकांनी सतत हिंसेचा आश्रय घेतला असता.
हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर नरसिंहाचा क्रोधाचा भडका शांत झाला नव्हता, पुढे जाण्यास कोणी धजावत नव्हते, तेव्हा प्रल्हादाने पुढे होऊन आपल्या भक्तीयुक्त प्रार्थनेने त्याला शांत केले होते.
मी जे लिहिले आहे तसेच घडले असते असे नाही तर असे घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
या कारणाने गांधींनी पुरस्कार केलेल्या अहिंसक मार्गाचे महत्व देखील आहेच ते अमान्य करता येणार नाही.
फक्त त्याचा त्या काळामधे सर्वंकष विचार होऊन योग्य वेळी योग्य मार्गाचा अवलंब व्हायला हवा होता.
आता त्या वेळी त्या काळच्या महानतम लोकांनी कोणते विचार व मार्ग योग्य समजले आणि का हे त्यांनाच ठाऊक.

महेश, पटणारी टिप्पणी. आवडली Happy
सावरकरांचे समर्थक असं बोलायला प्रवृत्त का होतात? कारण तथाकथित गांधी समर्थक "भारताला स्वातंत्र्य मिळालं ते फक्त गांधींमुळेच आणि त्यांचाच मार्ग योग्य होता" असा सूर लावतात म्हणून.
गांधींचा मार्ग टीकापात्र ठरतो कारण त्यांनी "मी म्हणतो तेच बरोबर. अहिंसा परमो धर्मः" वगैरे अतिरेकी बाष्कळपणा केला म्हणून.

याबाबतीत गांधींचा आदर्श ठेवणारे नेल्सन मंडेला यांचं अनुकरण खरं तर केलं गेलं पाहीजे. मंडेला यांची धोरणे गांधींसारखी आंधळी नव्हती. ते स्वत: जरी अहिंसावादी लढ्यात होते, तरी त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हिंसा या मार्गाचा निषेध कधीच केला नाही. एकदा तर "स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हिंसेचा मार्ग निषिद्ध आहे" असं निवेदन द्या तुम्हाला लगेच सोडतो असं १९८५ मधे सांगितलं गेलं तेव्हा त्यांनी असं करण्यास स्पष्ट नकार दिला.
आपलं इप्सित साध्य झाल्यावर मात्र हिंसेचा त्याग करुन त्यांनी काय केलं ते सर्वश्रूतच आहे.

>>किती खोटं बोलताय आंग्रे.. ते ५५ कोटी पाकिस्तानला कधीही दिले गेलेले नाहीत.. ती रक्कम ७५ कोटी होती. त्यातले २० कोटी पाकिस्तानला दिले गेलेले आहेत..<<

जामोप्या, तुम्ही "शेंडा ना बुडखा" नसलेली बाष्कळ बडबड थांबवून तुमचे थोडे वाचन वाढवा. मग खर काय? आणि खोट काय? यातला फरक तुम्हाला कळेल.

>>काही तरी खोटी उंडगी कारणं देऊन गांधीजींवर कशला चिखलफेक करताय?<<

तुम्ही गांधीवादी लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी "गांधी" नावाचा वापर करुन, त्यांच्यावर इतकी चिखलफेक केलेय, की दुसर्‍याला चिखलफेक करायला जागाच बाकी ठेवली नाही.

>>तुम्ही गांधीवादी लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी "गांधी" नावाचा वापर करुन, त्यांच्यावर इतकी चिखलफेक केलेय, की दुसर्‍याला चिखलफेक करायला जागाच बाकी ठेवली नाही.

अगदी, अगदी!! गांधीवधानंतर, त्यांना ठार मारणारा ब्राह्मण आहे हे समजल्यावर, देशभरात ब्राह्मणांची घरंदारं जाळणं आणि हत्या करणं अशी कामं करुन गांधींच्या अहिंसावादी धोरणाला याचसारख्या लोकांनी काळं फासलं.

या ५५ कोटींवर कुणीतरी जाणकार इतिहासतज्ञ ( उदा. अशोक पाटीलसाहेब) लिहिल तर सर्वानाच समजेल नेमके काय आहे ते.. तोवर कुणीही बोलुन काही उपयोग नाही..

( आणि समजा ५५ कोटी दिलेले असतीलच, तर ते त्यांचेच होते.. वाइट वाटायचे काही कारण नाही.)

Pages