पेच आहे

Submitted by निशिकांत on 19 September, 2011 - 02:09

सार माझ्या जीवनाचे हेच आहे
कोण माझे? मी कुणाचा? पेच आहे

मीच वेडा चालतो सर्वापुढे अन
ते शहाणे, लागते मज ठेच आहे

काय नवखे जीवनी? कंटाळलो मी
पात्र दुसरे पण कथानक तेच आहे

काय मिळते पारदर्शी वागण्याने?
दांभिकाला या जगी शिरपेच आहे

लावली ही बाग कोणी कष्ट केले?
कोण तो करतो फुलांची वेच आहे?

दु:ख का आईस नाही! जाणतो मी
हास्य ओठी आत ती रडतेच आहे

जीवनाच्या मैफ़िलीला रंग चढता
शायरी इर्शादने खुलतेच आहे

कोण मोठा? कोण छोटा? शर्यतींची
चालली दिनरात रस्सीखेच आहे

वाटले होणार नाही घात, पण का?
आजही पाणी तिथे मुरतेच आहे

थांबतो "निशिकांत" का रे काळ केंव्हा?
जीवनाचे वस्त्र बघ विरतेच आहे

निशिकान्त देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

गुलमोहर: 

सार माझ्या जीवनाचे हेच आहे
कोण माझे? मी कुणाचा? पेच आहे...खल्लास!!

काय नवखे जीवनी? कंटाळलो मी
पात्र दुसरे पण कथानक तेच आहे...व्वा!!

काय मिळते पारदर्शी वागण्याने?
दांभिकाला या जगी शिरपेच आहे...सही!!

दु:ख का आईस नाही! जाणतो मी
हास्य ओठी आत ती रडतेच आहे.... अप्रतिम!!

कोण मोठा? कोण छोटा? शर्यतींची
चालली दिनरात रस्सीखेच आहे....... मस्तच...!!

आवडली गझल.

दु:ख का आईस नाही! जाणतो मी
हास्य ओठी आत ती रडतेच आहे
काय नवखे जीवनी? कंटाळलो
पात्र दुसरे पण कथानक तेच आहे
दोन्ही शेर फारच छान वा