छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - मुक्ता

Submitted by स्मिताके on 8 September, 2011 - 22:07

पाल्याचे नावः मुक्ता
वय: साडेसहा वर्षे

आवडते घर: तिच्या कल्पनेतलं 'रेनबो कलर' घर. आम्ही त्याला 'पिकासोचं घर' म्हणतो. भविष्यकाळात कधीतरी अशी घरं बांधली गेली, तर रस्त्याने जाताना आपण फुलपाखरू असल्यासारखं वाटेल ना? घराच्या प्रत्येक भिंतीवर वेगळे रंग आणि चित्रं आहेत. दारावर वेलकम लिहिलं आहे.
बाल्कनीत कॉफीचा मग घेतलेली बाई आणि घरासमोर झाडं, कुत्रा, सिग्नल, सुटकेसवाला बुवा आणि लाऊड्स्पीकरवाला पोलीस आहे. ती बंदूक नसून ला.स्पी. आहे हे आग्रहाने सांगण्यात आलं आहे. खाली काळी झडप आहे ते गॅरेजचं दार, आत गाड्या आहेत.
बाबांची मदतः बाल्कनी, खिडक्या, दार कापून देणे, छपराचा आकार देणे.

100_2952.jpg100_2955.jpg
.100_2957.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

पिकासोचं घर. Happy
\पनवेल्च्या आसपास एक बिल्डिंग अशीच विविध रंगानी रंगवलेली आहे.

मुक्ता, अशीच घर बांधत रहा. Happy

मुक्ताचम घर आवडलं! सुंदर केलंय! बाल्कनीत चहा पिणारी बाई, माडाची झाडं, विटा, दारं, खिडक्या, धुरांडं सगळी डीटेल्स फारच मस्त!