जगणं यालाच म्हणतात का ?...

Submitted by Rohan_Gawande on 5 September, 2011 - 11:46

जगणं यालाच म्हणतात का ?… तुमच , माझ , उंच उडणार्या त्या विमानातील businessman चं, किंवा रात्री झोपडीबाहेर आडवा होऊन विमान पाहणाऱ्या त्या मजुराचं … सगळ्यांचीच स्वप्न , सगळ्यांचीच दुःख , सगळ्यांच्याच कुठेतरी सारख्या रात्री आणि कुठेतरी वेगळे दिवस … हे उराशी घेऊन सकाळी कामावर जातांना सगळ्याच्या चेहऱ्यावरील भाव तरी नक्कीच सारखे असतात नाही?…

तो मजूर असो वा मालक , जर त्याला किंमत असेल हातात असलेल्या गोष्टींची , आशा असेल आज काहीतरी नवीन बघण्याची तर मग ते AC office असो किंवा गरम गिरणी , तो नक्कीच काहीतरी शोधून काढतो , अजून कुणात नाही तर स्वतःमधलं तरी … खूप फरक कुठे असतो मित्रांनो … फरक फक्त आनंदात असतो … कुणी 12 च्या जागी 10 crore कमवून रात्री परत येतांना दुःखी असतो तर कुणी दिवस भर site वर काम करून रात्री मनसोक्त गाणे म्हणत असतो … तुम्हीच सांगा कोणी जिंकला क्षण ?

प्रेम पण तर सारखचं असत आपलं सगळ्याच … खेळ फक्त हातातल्या एका फुलाचा आणि तिच्या होकाराचा असतो … बास मग तो राजा असो वा रंक , दोघांचाही मन पोचतं तर त्याच सातव्या आसमंतात … दोघंही तिचं मन वळवण्यासाठी जीव ओवाळतात , बस कुणी personal jet देतात तर कोणी फुलांचा गजरा … महत्वाची गोष्ट काय असते, ते म्हणजे तिचं एक हास्य , मग ते एका गज-यानीच मिळाल आणि Jet देऊनही नाही मिळाल तर काय फायदा … तुम्हीच सांगा …

म्हणून मी काय म्हणतो , जे आहे जस आहे तेच सुंदर करायचा प्रयन्त करूयात, आपण एखाद्या उपोषण ग्रस्त देशात जन्माला येऊन , काही तासात मरण नाही पावलो हे काय कमी आहे … महत्वाकांक्षा ठेवा पण त्याचा ओझ म्हणून डोक्यावर नका मिरवू … प्रत्येक छोटी गोष्ट share करा , आणि जमेल तसा जमेल तेव्हा आनंद लुटा … आणि कधी काही केलं नाही तर काय झालं, पहिल्यांदा काही तरी करून पहा … घरातून बाहेर पडा , उघड्या डोळ्यांनी हे जग पहा , खूप काही नवीन दिसेल …

रोहण गावंडे... Happy

गुलमोहर: 

मस्त