|| बाप्पा मोरया २०११ (मुंबई) || — "दर्शन" (लालबाग आणि परीसर)

Submitted by जिप्सी on 4 September, 2011 - 11:25

सर्वांच्या लाडक्या बाप्पांच्या येण्याची "चाहूल" लागली, काही दिवसांपूर्वी बाप्पाचे "आगमन"हि झाले. चला आता मुंबईच्या बाप्पांचे "दर्शन" घेऊया.

|| मुंबईचा राजा २०१० (गणेशगल्ली - लालबाग) ||
१९७७ सालच्या मूर्तीची प्रतिकृती (यंदाचा देखावा — श्री क्षेत्र मल्लिकार्जुन मंदिर प्रतिकृती)
|| तेजूकाया गणेशोत्सव मंडळ (लालबाग) ||
|| चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ||
|| रंगारी बदक चाळ (चिंचपोकळी) ||
|| चिंचपोकळीचा चिंतामणी ||
|| काळाचौकी ||
|| पद्मनाभ मंदिर प्रतिकृती (काळाचौकी) ||
|| अभुदय नगर (काळाचौकी) ||
|| आंबेवाडी (काळाचौकी) ||
|| हिरामणी सुपर मार्केट (लालबाग) ||
|| बालयुवक मित्र मंडळ (लालबाग) ||

गुलमोहर: 

अरे वा.. घरबसल्या दर्शन घडवलेस.. सगळे फोटो एकदम मस्त आहेत.

तुला एका दिवसात एवढे गणपती पाहायला मिळाले की काही स्पेशल सवलत होती रांगेविना दर्शन घ्यायची? Happy

तुला एका दिवसात एवढे गणपती पाहायला मिळाले की काही स्पेशल सवलत होती रांगेविना दर्शन घ्यायची?>>>>>सवलत वगैरे काही नव्हती Happy सकाळीच गेल्याने जास्त गर्दी नव्हती. Happy (रच्याकने, सगळी गर्दी लालबागच्या राजाकडे वळली होती. Happy )

वाह वाह... धन्स रे !!

लालबागचा दौरा उद्या करणार आहे, पण तू आत्ताच सुंदर फोटोरूपी दर्शन घडवलंस सगळ्या बाप्पांचे Happy Happy

वा योगेश खुप छान दर्शन घडविलेस. आता मुंबईला खास गणपती पाहण्यासाठी यायला नको.

जिप्स्या, एकदम मस्त दर्शन घडवलंस. धन्यवाद.>>> अगदी मी पण हेच लिहणार होते. आम्हाला घर बसल्या (मुंबई बाहेर) दर्शन घडवलंस Happy

हे २०११ हवंय की २०१०चाच आहे?>>>>>भरत, २०१०चा मान मिळाला होता. यावर्षीचा "राजा" अजुन घोषित व्हायचा आहे. Happy

जिप्सीबुवा,
मनःपूर्वक धन्यवाद. कालच दुपारी नवरा मुंबईहून परत आला. ह्या सगळ्या गणपतींच रसभरीत वर्णन त्याच्याकडून ऐकल आणि आत्ता तुमच्या फोटोंमुळे तर बहार आली. नवरा सांगत होता पहाटे ३:३० ला लालबागच्या राजाच दर्शन मस्त झाल. Walk in-no line आणि डोळे भरून दर्शन घेता आल. मग गणेश गल्ली.

मस्त!