शीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय २ - "मुक्या आरोळ्या"

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 22:33

"मुक्या आरोळ्या"

'कधी वाटीभर दूध कधी कडक पोळी
कधी चुचकारशी, कधी काठी उगारशी...
बांधलीस जरी तु घंटा माझ्या गळी,
तरी आहे मी वाघाचीच मावशी...' Proud

cat.jpg

मंडळी, इथे तुम्हाला लिहायच्या आहेत पाळीव प्राणी / पाळीव पक्षी / पाळीव जलचर यांनी केलेल्या आरोळ्या...

blue-bird-clip-art.jpg

टीप: नवरा हा पाळीव प्राणी नाही आणि बायको ही गरीब गाय नाही Proud

******************************************

सर्वसाधारण नियम:

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. कुठल्याही एका पाळीव प्राणी, पक्षी किंवा जलचर यांच्यावर तुम्हाला चारोळी करायची आहे.
५. एका वेळेस, एकाच पाळीव प्राणी/पक्षी/जलचरावर, एकच चारोळी टाकावी.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन चारोळ्या देऊ शकत नाही.

******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिप Rofl

सर्कशीतल्या वाघाला बघून,
फुटला तुला केवढा घाम,
पारूश्या पोपट व्हायच्या आधी,
हे घे फक्त चार आण्यात 'हमाम'

पाळीव प्राणी असा विषय आहे. परंतु, हे पाळीव नसलेल्या एका पक्ष्याबद्दल अचानक सुचलं म्हणून लिहिलं.
थोड्याच दिवसात, थोड्याच दिवसांसाठी या पक्ष्याला मोठं महत्व प्राप्त होणार आहे.

सदैव हेटाळणीच करता म्हणुनी काळा काळा
पितृपक्षामध्येच का मग येइ तुम्हां कळवळा ?
काव काव करुनिया कावता, का खरवडता गळा ?
विचार करतो, उगीच भलत्या दिशेकडे का वळा !

फिस्कारली मिशी अवघी किती मी
कोचावरती नख्या परजुनी
ताठर अंग तुच्छता दर्शण्या
तरी लाडे म्हणती, 'येऽगंऽ मनी!!''

पीटर पेटिग्र्युला म्याच आदी वळिकलं
मालकिणीवानी आमी बी हुश्शार हावो, म्हनलं Happy
क्रूकशँक्स असलं भरी नाव हाय आपलं
पर शेवटल्या भागात आमचं नख बी न्हाई दिसलं Sad
मियांव

काचेच्या पेटीतच माझे अवघे जीवनगान
जळात राहुनी नद्या-सागराचे मजला दिव्य सपान
गिरक्या-डुलक्या-सुळक्या-मुरक्या पटाईत मी छान
मनासारख्या संचाराची आहे मजसी तहान!

नका करु असा काना डोळा
गप्पी मासे पाळा हीवताप टाळा
नका कुठेही घालु गळ्यामध्ये गळा
अर्पा पहीले एकमेका माळा

सोन्याचा का असे पिंजरा
माझ्यासाठी ती तर कारा
नकोनको हा आयता चारा
हवा जरासा डोंगरवारा Happy

आणलंस तू मला पँटच्या खिशात टाकून
नंतर ठेवलंस कॉटखालच्या खोक्यात झाकून
उड्या मारत पळून जाईन म्हणून बंद करतोस कवाड!
केविलवाण्या माझ्या डराँवला काँपिटिशन तुझा आय-पॉड!

मला देतात गवत चारा
स्वत: मात्र पितात सोनेरी आसव
तुमच्या आजोबांपासून आहे घरात मी
गरीब बिचारं पाळीव कासव

नका करु असा काना डोळा
गप्पी मासे पाळा हीवताप टाळा
नका कुठेही घालु गळ्यामध्ये गळा
अर्पा पहीले एकमेका माळा
>>>> हे हे हे हे Rofl

पीटर पेटिग्र्युला म्याच आदी वळिकलं
मालकिणीवानी आमी बी हुश्शार हावो, म्हनलं
क्रूकशँक्स असलं भरी नाव हाय आपलं
पर शेवटल्या भागात आमचं नख बी न्हाई दिसलं
मियांव
>>> भरत मयेकर .... लै भारी! खूप आवडली ही आरोळी. Proud

वाघाची मावशी मी वाघाची मावशी
मावशी असले तरी मला आहे मिशी
पोत्यात घालून जंगलात सोडा, गाडीत विसरा (साभार पु.ल.)
परत येते घरमालकीण मी खाशी

कधी मला कुणी पाळीव केला
तर दाद द्यावी त्याच्या हिमतिला,
अहो साप आहे मी उगिच नाहि कुणी पाळणार
विकणार असेल तो मला बड्या किमतिला.

मनीमाऊला मिशा कित्ती
सांगा पाहु पटकन
फिस्कारून येईल पहा
अंगावरती झटकन

Lol मस्तच आहेत वरच्या सगळ्या चारोळ्या.
भरत- याला म्हणतात फॅन. क्रुकश्रँक्स Lol

काय घेऊन बसलात कुत्री-मांजरी,
कासव, पोपट अन माश्यालाही त्या सोडा
काय कराल चारोळी त्याच्यावर
ज्याने पाळलाय पाणघोडा

नाव माझे मनी माऊ
अंग कसे स्वच्छ मऊ
कळकट्ट मेल्या माणसांनो
वाटेतून जरा दूर व्हा पाहु !!!

दोन बोके म्हणे मित्र झाले
पण लोण्यासाठी गळे धरले
माणसाने अशी रचली कथा
दोस्तासंगे दुश्मनी ही ह्यांचीच प्रथा !!!