छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय २ : "मुझे जिने दो"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:13

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियम (बदलून) :

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

टीपः

आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.

************************************************************************


"छाया-गीत" : विषय २: "मुझे 'जिने' दो...."

jina_0.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत पायर्‍या, जिने इ इ

गाणे /शीर्षक - कळीचे शब्द: उपर, नीचे, मंजिल, पुढे, वर, खाली, चढ, उतार, चलते चलते, चालताना .. इ इ उदा. "...वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे..."

******************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नलिनी, ह्या फोटोत पायर्‍या, जिने कुठे आहेत? >>> मला वाटले की पानांच्या पायर्‍या चालतील.
काढते मी फोटो.

@ दीपांजली ~

होय, फोटोंनी चौकटीची 'मर्यादा' सोडली आहे हे मान्यच. पण त्याला कारण म्हणजे खुद्द मलाच हे फोटो पेस्टींगचे तंत्र अवगत नाही, इतका मी नवखा आहे या टेक्निकॅलिटीमध्ये. आताही मला इथल्या या संदर्भातील अन्य दोन-तीन विषयावर फोटो देण्याची इच्छा आहे, पण ते योग्य त्या साईझमध्ये 'अपलोड' प्रकरण मला झेपत नाही असे दिसते. मुलगा इथे होता तो पर्यंत गायडन्स करीत असे.

असो. पण एकूणच मी फोटोंच्याबाबतीतील इथली तुमच्या सर्वांच्या भन्नाट कल्पनांची मजा घेत आहेच.

Picture 176.jpg

कुछ पलकों में बंद चांदनी, कुछ होठों में कैद तराने,
मंजिल के गुमनाम भरोसे , सपनो के लाचार बहाने...

युही कट जायेगा सफर साथ चलनेसे
मंजिल आयेगी नजर साथ चलनेसे

कुडाळसंगम [कर्नाटक]kuDaaLasaMgama.JPG

मी कालच 'मायबोली' कर झाल्ये आणि वाचन-आनंद घेत असताता 'दे ट्टाळी' मालिका गवसली. 'मुझे जिने दो' खूप खूप आवडले. एकसोएक बढीये फोटो आणि त्यावर कडी करणार्‍या त्या गाण्यांच्या ओळी वाचताना मज्जा आली.

स्नेहा

Pages