होळी.....

Submitted by सुप्रिया जाधव. on 19 August, 2011 - 12:43

गुलाल.....!!!

खुप खुप वाटतं...
अगदी मनापासून...वाटतं
गुलाल व्हाव...
आपल्या लोभसवाण्या रंगात...
सगळ्यांना रंगवाव...
स्वत:ही दंगून जाव...

तशी काहीच हरकत नाही गं...
गुलाल व्हायला...
पण..पण...सामोरे येणारे...
आधीच चिखलाने बरबटले असतील तर???
तर....
रंगू शकतील गुलालात तुझ्या...?
किती वेळा नि कुणाकुणाला
स्वच्छ करशील तू...
नाही ग...
थकशील...दमशील...
हतबल होशील...

म्हणून....

आता मीच राख होतेय...
उभी जळतेय....
होरपळून निघतेय...
आदर्शाच्या होळीत...
हो..भिडल्या बघ ज्वाळा...
थेट आभाळापर्यंत...
आता भाजून घेवूदे त्यांना...
त्यांची पोळी...खुश्शाल...!!!

अंग अंग...अणू रेणू जळतोय माझा...
एक एक ईच्छा...
एक एक स्वप्न...
माझे दोष ...माझे गुण...
धुमसतायत सगळे...
एकजात...
हातात हात घेवून....

हा आवाज ऐकतेयस...???
तड..तड...

फ़ुटली ग...फ़ुटली कवटी एकदाची...
हिच..हिच...यातला मेंदूच...
उगमस्थान होत बघ
सा-या विचारांच...
आहाहा....
आता सगळ...कस शांत शांत ...
हलक ..हलक...
.
.
.
म्हणून....

आता मीच राख होतेय...
उभी जळतेय....
होरपळून निघतेय...
आदर्शाच्या होळीत...

-सुप्रिया.

गुलमोहर: 

सुप्रिया,
वेगळ्य धाटणीची कविता. परंपरेला छेद देणारी, आदर्शांना होळी समजणारी. आवडली. "कवटी" खासच!

आता मीच राख होतेय...
उभी जळतेय....
होरपळून निघतेय...
आदर्शाच्या होळीत...

हम्म्म्म्म्म्म्म्म..

आवडली कविता. Happy

मस्त.:)