ध्वजारोहणाचा मान

Submitted by sunil patkar on 15 August, 2011 - 13:10

आज भारताचा म्हणजे माझ्या देशाचा स्वातंत्र्यदिन..दर वर्षी १५ आँगस्ट्ला मला आणि माझ्या मित्रांना आठवण होते ती आमच्या लहानपणी शाळेत होणा-या झेंडावंदनाची.झेंडावंदन झाले कि खाऊ काय मिळतो याकडे आमचे अधिक.लक्ष ....त्या लिमलेटच्या गोळ्या , रावळगाव चाँकलेट , बिस्किटे..लहानपणी याकडे बारीक लक्ष असायचे...आता म्हणे कँटबरीही वाट्तात...आता वाटतं या आनंदात झेंडावंदनापेक्षा खाऊच आकर्षण वाढत गेलं.. आणि राष्ट्रप्रेमा ऐवजी खाऊची मोठी पिढी यादेशात तयार झाली.तरीहि राष्ट्रगीत आवडीने म्हणणारी काही होतीचकी..
खाऊची व्याख्या वाढत गेली..कुणाला चारा आवडू लागला ,कुणी राष्ट्रकूल स्पर्धेत आपला हात मारला ,, ३ जी स्पेक्ट्रमने तर खाऊच घबाड अनेकांच्या हाती लागलं.. गहू ..साखर ..सिमेंट अगदी आमच्या शहिद जवानांच्या शवपेट्याही खाऊपुढे सुटल्या नाहीत .आईने लपविलेला खाऊचा डबा शोधण्यासाठी वापरली नाहीत अशी एकाहून एक सरस आयुधे आमच्या देशातील राज्यकर्त्यांनी वापरली..आणि केवळ आपला खाऊ सोडाच ईतरांच्या ताटातले ...अगदी खरकटेही यांनी सोडले नाही ...आणि आपण किती महान यातीलच एक येतो आणि झेंड्याची दोरी ओढून जातो ...म्हणे हा मान त्याचा ! आणि आमची मान झेंड्याबरोबर त्यांच्याही पुढे नतमस्तक होतेच ...
कारगिल मध्ये शहिद झालेले जवान ..ताजमध्ये शहिद झालेला उन्नीकृष्णन ..करकरे ,सळासकर .कामटे ..गडचिरोलीत दररोज गोळ्या खाणारे पोलिस ..याच्या् नातेवाईकाचा स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याचा खरा मान आहे..संसदेवरील हल्ल्यामध्ये मारले गेलेले सुरक्षा रक्षकांच्या वारसांना हा सन्मान पाहिजे कि या हल्ल्यातील आरोपीला फाशीपासून वचविणा-यांचा तो मान आहे ? मुंबई हल्ल्यात कामी आलेल्या पोलिस आणि सैनीकांचा हा मान कि बडे शहरों मे छोटे छोटे हादसे होते है असे म्हणणा-यांचा . पंढपूरच्या विठ्ठ्लाच्या पहिल्या दर्शनाचा लाभ एका वारक-याला मिळतोच ना ,,भारताच्या स्वातंत्र्याचा प्रवासात अनेक वारकरी आहेत .ध्वजारोहण करण्याचा मान या सामान्य वारक-याला मिळाला पाहिजे .झेंड्याचा सन्मान राखला जाईल अश्यांनीच ध्वजारोहण करावे नाहितर सरकारी सुट्टिचा आनंद आपल्या कुटुंबासोबत मनसोक्त घ्यावा.
सुनिल पाटकर

गुलमोहर: 
शब्दखुणा: