वेडा पाऊस..

Submitted by पुरंदरे शशांक on 14 August, 2011 - 11:24

वेडा पाऊस..

वेडा वेडा पाऊस
वेड्या वेड्या मनात
सुकलेलं रान
आशेची रुजवात

आसावले मन
कुणाच्या शोधात
थेंबभर ओल
दिसे आभाळात

जोर वादळाचा
मेघ गर्जतात
येणार साजण
धक्धक उरात

थेंबांची ओंजळ
पृथ्वी पदरात
दोन काळे मेघ
भरु वहातात

हिरवी नव्हाळी
धरा दिमाखात
वेडे वेडे मन
चिंब गाणे गात

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

थेंबांची ओंजळ
पृथ्वी पदरात
दोन काळे मेघ
भरुन वहातात .....
.... छान
पावसावरची सहज ओघवती कविता