मी शब्दांतून...

Submitted by पुरंदरे शशांक on 12 August, 2011 - 06:11

मी शब्दांतून...

लिहिण्याला कारण काही
न उमजे मला कधीही
जडला हा वेडा छंद
मी मलाच शोधत राही

त्या रानफुलाची साद
शब्दामधुनी का येई
बरसात कृष्णमेघांची
धारांत अक्षरे वाही

चिंबसा होऊनी जात
ग्रीष्मी का उन्हे वहात
न्हातात शब्द सुरात
संगीत नसानसात

मी माझा नुरतो काही
व्यापुनी दहा दिशात
मी चराचरी या मुक्त
शब्द ते मात्र निमित्त

मी भेदून जातो आता
हे दहा दिशांचे नाते
तरी साद घालते हिरवे
शब्दांचे ईवले पाते

"शाम"ने मूळ रचनेवर सुंदर संस्कार केले व
शेवटचे कडवे - साक्षात श्री. उमेश कोठीकरांनी प्रेमपूर्वक धाडलेले....
दोन्ही मान्यवरांनी या रचनेवर जे प्रेम दाखवले त्याबद्दल हार्दिक कृतज्ञता...

गुलमोहर: 

छान.:)

साद त्या रानफुलाची
का शब्दामधुनी येई
बरसात कृष्ण्मेघाची
अक्षरे धारा वाही .......छान.

नुमजे,नुरतो पहिल काही कळलच नाही परत वाचल्यावर लक्षात आलं.

सुंदर कविता.
........................................