रक्षाबन्धन- एक पर्वणी

Submitted by टोकूरिका on 12 August, 2011 - 03:04

सध्या रस्त्यावरून जाताना सहज लक्ष वेधून घेत असलेली गोष्ट म्हणजे रा़ख्या! सहज पाहताना मनात विचार आला रक्षाबन्धन हा सण साजरा करण्यामागेसुद्धा प्रत्येक सणाप्रमाणे एखादी दन्तकथा वगैरे असेल का? हा सण कसा सुरु झाला असेल? सर्वप्रथम कोणत्या बहिणीने आपल्या भावाच्या हाताला तो पवित्र धागा बान्धला असेल?
किती पवित्र बन्धन आहे नाही हे? म्ह्टल तर बन्धन म्हटल तर जबाबदारी! पण या बन्धनालाही प्रेमाची एक लकेर असते. बहीण ही भावाशी मोकळेपणाने बोलू शकते, तिच त्याच्यावरील प्रेम तसेच प्रसन्गी ऊफाळून आलेल्या भावना त्याच्याजवळ नि:सन्कोच पणे व्यक्त करू शकते. पण भाऊ हा नेहमी त्याच प्रेम कृतीतून व्यक्त करत असतो. रक्षाबन्धन म्हणजे नुसता सण नसतो तर ती एक पर्वणीच असते भावासाठी! बहिणीवरील प्रेम मोकळेपणाने व्यक्त करायची. एरवी उजव्या मनगटावर धागा बान्धला तर काही वाटणार नाही....वाटूही शकत नाही! पण नारळी पौर्णिमेच्या दिवशी ते एक वचन असत जे प्रत्येक बहीण आपल्या भावाकडून घेत असते....आयुष्यभर तिची रक्षा करण्याच! त्यात कुठेही जबरदस्ती नसते. असते ती फक्त माया आणि आपुलकी!
रक्षाबन्धन झाल्यावर त्या धाग्याच निर्माल्यच होते परन्तु त्या दिवशी ह्या राखी मध्ये एवढ सामर्थ्य असते की जगातली कुठलीही शक्ती थिटी पडावी!

यावर्षीही प्रत्येक बहीण भावाला हा सण आनन्दाचा जावो हीच सदिछा!!

गुलमोहर: 

एकदम छान लिहला आहेस
पुलेशु
खुप आवडला पहीला प्रयत्न छान आहे

आमच्या दृष्टीने ही पर्वणीच आहे, सगळ्या कुटंबांनी भेटायची.. सगळ्या भावंडांची आयुष्य भयंकर वेगात नि एकमेकांना न छेदणार्‍या वर्तुळांत.. ही संधी आहे निदान एकमेकांच्या वर्तुळात प्रवेश करण्याची.. आमच्या पार्टनरना नातेबंधात अजून अडकवण्याची.. प्रत्येक घरटी एकुलते असलेल्या आमच्या मुलांमध्ये एकमेकांसाठी आपुलकी निर्माण करण्याची.

मला माझ्या मनु - मंदार, योगेश, सतिश, समीर, सागरची खूप आठवण येत राहील आज नि उद्या. Sad सगळे रविवारी भेटतील.. आणि माझी, लेकीची, नवर्‍याची आठवण काढतील, नितिन-सीमा-केदारची आठवण काढतील.

आमच्या मुलांना सुद्धा असच गुदमरवणारं काही तरी वाटलं तर मला दिलासा राहील की पाणी पुढे वहातयं! Happy

धन्यवाद लोक्स........किश्या धन्स रे! हाय जाजु...........खरच जीवनाच्या रगाड्यात आपण नातेसम्बन्ध टिकवून ठेवतो हेच फार आहे ग! पुढची पिढी काय करेल ते आत्ताच नाही सान्गता येणार पण आपण जमेल तस आपल ''माणूस'' असण त्यान्च्यात भिनवायचा प्रयत्न करायचा!