उंबर - श्रावणी शुक्रवार स्पेशल

Submitted by deepac73 on 5 August, 2011 - 05:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ वाटी बारीक चिरलेला गूळ
१/२ वाटी तान्दूळाची पिठी
१ केळे कुस्करून
तळायला तूप

क्रमवार पाककृती: 

१. गूळ १/२ वाटी पाण्यात विरघळून घ्या
२. त्यात पिठी आणि केळे घालून एकजिव करून घ्या
३. १५ मिनीटे ठेवा
४. तूप तापत ठेवा
५. चमच्याने छोटे गोळे तूपात सोडून तळा (gloden brown)

अधिक टिपा: 

आमच्याकडे श्रावणी शूक्रवारी जिवतीच्या नैवेद्याला हे करतात.

माहितीचा स्रोत: 
सासूबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकत्र केलेले पीठ असे दिसते

05082011764.jpg

आणि हा तयार पदार्थ. बरोबर अर्धचन्द्राकार दिसते आहे ते आहे साण्दण, शितळासप्तमी साठी केलेले (इडलीच्या पिठ ताट्लीन ठेवून वाफवले)

05082011762.jpg

नवीन रेसिपी वाटतेय.

फक्त गृप सभासदांसाठी मर्यादित झाली आहे, त्यामुळे गृपमधे नसलेल्यांना दिसणार नाही. संपादन टॅब वापरून सार्वजनिक करणार का?