.

Submitted by क्ष... on 4 August, 2011 - 00:25
लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

रंगित पापड्या छान दिसतात. आई/आत्या पापड्या करायच्या तेव्हा आम्ही मधे मधे जाऊन उगाच दुरंगी, तिरंगी पापड्या करायचो... धमाल असायची Happy

याला फेण्या म्हणतात ना?
माझी लहानपणाची एक आठवण. चाळीच्या व्हरांड्यात धावत येताना आमच्या शेजार्‍यांनी वाळत घातलेल्या फेण्यांवरून घसरून पडल्याची.

छान लिहीलाय लेख, आवडला. पापड्या करुन पहाव्याश्या वाटल्या लगेच, पण इथे पाउस आहे सध्या खुप... आता ऑक्टोबर मध्ये पाहु...

आली बाई रेसिपी Happy आता उद्या पावसाचा अंदाज दाखवलाय पण नंतर आठवडाभर मस्त ऊन पडणारे. त्यामुळे शनिवारी (न कर्त्याचा वार म्हणुन नाही हं!) करणार नक्की. बाकी सगळं सामान आहेच घरात. आणु सूर्यमामा सध्या ४.०० वाजल्यापासून गजर वाजवतातच Proud

खूप मस्त लिहीले आहे. अगदी तुझ्या स्वयंपाकघरात बसून सर्व धावपळ बघितल्यासारखे वाटले. पापड्या रॉक्स.

मस्त. इतक्या सोप्या असतात ह्या पापड्या करायला. मी उगाचच इतकी वर्ष बिचकून होते Happy आत्ता एप्रिलमध्ये केल्या एक वाटीच्या. मस्त झाल्या. एक बाजू वाळलेली पापडी, नंतर वाळलेली नुसतीच पापडी आणि नंतर तळल्यावर सणसणीत फुललेली पापडी खाणं म्हणजे निव्वळ आनंद! Happy
मी नुसत्या साबूदाण्याच्या केल्या, मीठ घालून. बटाटा, जिरं वगैरे नाही. पण आता पुढच्या वेळी करेन सर्व प्रकार Happy

मिनोती मस्तच. ह्या उन्हाळ्यात माझ्या करायच्याच राहील्या ग.

आज तुझ्यासारखी माझी धावपळ होती. नागपंचमीचा नैवेद्य करायचा होता म्हणुन ४.३० पासुनच उठले. सकाळी मोदक, दाणे, जेवण उरकले.

आमच्याकडे पुर्वी आई किलोभराच्या करायची. त्या संध्याकाळपर्यंत फक्त वरुन सुकायच्या. दुसर्‍या दिवशीच सोडवता यायच्या. प्लॅस्टीकचे कागद यायच्या आधी तर त्या कापडावर घालाव्या लागायच्या. त्या सोडवणे महाकठीण, उलट्या बाजूने पाणी मारुन सोडवाव्या लागायच्या.
आमच्या घरी व्हरायटी म्हणून त्यात टोमॅटोचे पाणी घालतात. छान रंग आणि स्वाद येतो. मासे खाणार्‍यांनी (जागू प्लीजच नोट) मासे उकळून त्याचे पाणी गाळून वापरायचे, मस्त फिश फ्लेवर येतो. (म्हणे.)

वा वा! Happy
मिनोती, गेल्याच वीकेन्डला गव्हाचा चीक तुझी आठवण काढत करून खाल्ला. Happy

भरत, या फेण्या नव्हेत. फेण्या तांदुळाच्या करतात. (त्यांना सालपापड्या असंही म्हणतात.)
यांना चिकवड्याही म्हणतात.

साबुदाण्याचा नुसता चीकही दही/ताक घालून सुंदर लागतो! हे सगळेच वाळवणांचे / साठवणांचे प्रकार वाळवून/साठवून नंतर कधीच्या काळा तळून जितके चांगले लागतात त्यापेक्षा कैक पटींनी करतांनाच्या प्रोसेसमधल्या प्रत्येक स्टेपमधे अशक्य चवदार लागतात. Happy

साबुदाण्याच्या पापड्या! वाळवणांमधला सर्वात सोप्पा पदार्थ.:) मी पण करते दरवर्षी. थोड्या साध्या पांढर्‍या करते आणि थोड्या तिखट, बटाटा घालून.

मिनोती, प्लीज डीलीट नका करु पोस्ट. मी मायबोलीवर केव्हाही पोस्ट सापडतात म्हणुन काही सेव्ह पण नाही करुन ठेवत. सो प्लीज कोणाच्या एकाच्या बोलण्यामुळे पोस्ट्स नका डिलीट करु.