रसग्रहण स्पर्धा - अकथीत सावरकर - लेखक मदन पाटील

Submitted by केदार on 2 August, 2011 - 23:57

अकथीत सावरकर
लेखक मदन पाटील
प्रकाशक - जिजाऊ प्रकाशन
मुल्य - ३०० रू
प्रथमावृत्ती - २३ मार्च २०११

खरेतर लेखक आणि प्रकाशनाचे नाव पाहून मी पुस्तक विकत घेणार नव्हतो कारण दोहोंवरून त्याची दिशा नक्की झाली होती, केवळ ब्राह्मणांचा तिरस्कार करणारे लेखन. तरी धीर धरून हे पुस्तक घेतले, म्हणलं सावरकरांबद्दल जे आधी कळाले नाही ते वाचायला मिळेल.
प्रस्तावना वाचली आणि हतबुद्ध झालो, सावरकरांवर बोलायच्या ऐवजी संघ, ब्राह्मण, टिळक, आर्य, वैदिक ब्राह्मण, जिनोम प्रोजेक्ट व त्याची भलतीच माहिती आणि मुस्लीम आज देशात का जास्त झाले ह्याचे श्रेय (अर्थातच ब्राह्मणांना) आणि गांधी हत्या व त्यातून होणार्‍या ब्राह्मण समाजाच्या सामूहिक हत्यांबद्दल चे जोरदार समर्थन (उदा " वाघाप्रमाणे खवळलेल्या जनतेंन जी कृत्यं केली, ती इतकी नैसर्गिक व शंभरातील नव्याण्णव बाबतीत अचूक होती की, देशातील बहूजन समाजाचं डोक व हिम्मत अजून शाबूत आहे हेच सिद्ध झाले" हे वाचून मला लेखकाची किव करावीशी वाटली. हे वाक्य ज्या गोर्‍यांनी लिहिले त्यांनी कदाचित आज मी चुकीचे बोललो असे विधान केले असते, पण ही व अशा कोट करून हे पुस्तक चालू होते. पेशन्स ठेवून पुढे वाचायचे ठरविले.

एक भन्नाट उदाहरण, ते (पाटील) म्हणतात की "सावरकरांना अभिप्रेत असलेला हिंदू धर्म म्हणजे वैदिक धर्म होय" आता ज्या माणसाने थोडेफार सावरकर वाचले आहे त्याला कळेल की सावरकर म्हणाले, "श्रृती-स्मृती इ ग्रंथानां आज अवास्तव महत्त्व द्यायचे कारण नाही" ," गाय हा पशू आहे, पशू सारखे वाटले तर मारावे व खावे", "पंचंगव्याला जे महत्त्व देतात ते माणसाला पशू हून हिण वागवतात व पशूला देवस्थानी माणतात", " गायीच्या शरीरात जर ३३ कोटी देव असले तर, एखाद्याने जर सहज तिला काठी मारली तर पाच पन्नास देव धारातिर्थी पडायचे, हे कसे परवडेल? आणि तो देवच काय जो स्वतःचे रक्षण करू शकणार नाही?" "गायीच्या पोटात हा देव, पाठीत हा देव इतकेच काय पायात हा देव असे माणने म्हणजे देवालाही पशूपेक्षा हिण समजणे हे होय", ही सर्व वाक्य सावरकरांचे आहेत, माझे नाहीत. जो माणूस असे लिहू शकतो त्याच्या हिंदूत्वाचा कल्पनेला वैदिक म्हणता येईल का? केवळ ब्राह्मण आहे म्हणून उचलली जीभ असे कसे करता येईल?

दुसरे एक महान वाक्य म्हणजे "सावरकरांच्या लिखाणातून बहुजन दु:स्वास स्पष्ट दिसून येतो आणि स्वजातीयांची वारेमाप भलावण व कौतूक द्सितं." काय म्हणावे ह्याला हे काही कळत नाही. अहो ज्या माणसाला खुद्द गांधी पण म्हणाले की तुम्ही जे काम रत्नागिरी, नाशकात केलं त्याला तोड नाही, कित्येक देवळ, पानवटे हे अस्पृश्यांना खुले केले ते पाटीलांना दिसत नाही वा केवळ जातीमुळे मान्य नाही. अहो खुद्दा सावरकर सत्यनारायण घालायला नको कारण त्याची गरज नाही असे म्हणत होते हे पाटील विसरले! पुढे ते म्हणतात की "काही नाटकांचे प्रयोग लोकांनी बंद पाडले ह्यावरूनच त्यांचं सामाजिक लेखन बहुजन संमत नव्हत हे दिसत", अरे बा पाटला, जो माणूस सर्वणांविरुद्ध खुद्द ब्राह्मण असून आवाज उठवत होता, त्याला सर्वण विरोध करणारच. की ते सत्यनारायणविरोधी नाटक पाहायला ज्यांना दोन वेळचे जेवन मिळत नव्हते ते अस्पृश्य येणार? उलट बा पाटला तू दोन्ही वाक्ये सलग मांडून ती दोन्ही परस्परविरोधी आहेत हे तुज कळले नाही असे खेदाने म्हणावे वाटते.

पुढे पहिल्या प्रकरणात पाटील गाजलेल्या उडीचा आढावा घेतात. ह्या उडी बद्दल अनेक प्रवाद आहेत. धनजंय कीर (चरित्रकार) जरी ही उडी महान होती असे मांडत असले तरी खुद्द उडी तितकी महान नव्हती हे य दि फडके म्हणतात, ज्यावर सावरकरांनी मौन बाळगले व आम्हास य दिं फडक्यांचे म्हणणे पटते. पण ही उडी लाक्षणिक दृष्ट्या महान होती असे आमचेही मानणे आहे कारण ह्यात खुद्द क्रिया (म्हणजे उडी) जरी महान नसली तरी ज्या रितीने तिचा प्रसार व प्रचार झाला. ब्रिटीशांना कोणी असेही टक्कर देऊ शकते हेच त्यातून साध्य झाले त्यातून अनेक क्रांतीकारक जन्माला आले हे सत्य कसे नाकारता येईल? पाटलांनी नेमके हेच नाकारले आहे. ब्राह्मण लेखकाबद्दल ते पुढे म्हणतात की " एका सामान्य दर्जाच्या कृतीला आंतरराष्ट्रीयख्यातीची कृती ठरवणे आणि तिचे बेसुमार उदात्तिकरण करणं, ह्यामागे "जातीनिष्टा" ही एकच बाब असल्याचे दिसून येते" अहो पाटील, अहो जरा य दि फडके वाचा हो, आणि ते ही ब्राह्मणच आहेत तरी त्यांनी ही उडी सामान्य होती पण तिच्यामुळे जे बुडबुडे निर्माण झाले ते असामान्य होते असे मांडले आहे.

पुढे ते म्हणतात की १९०७ साली जो माणूस मुस्लीम हिंदू भाई भाई म्हणतो, तो पुढे अचानक हिंदूत्वाकडे का वळतो? त्यांनी वैचारिक कोलांटउडी मारली असे लेखक म्हणतो. जे त्याचा दूरदृष्टीला कळाले नाही ते आम्ही इथे सांगू इच्छितो. सावरकरांनी १८५७ चे बंड पुनः जागृत केले व त्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिले. त्याची प्रसिद्धी केली, इतकी की हे पुस्तक ज्या कडे मिळेल त्याला तुरूंगात जावे लागत होते. ह्या बंडाला त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक आयुध म्हणून वापरले. बहादुरशहा जफरचा एक शेराचा त्यांनी फारच प्रचार केला तो म्हणजे
"गाझियोमें बू रहेगी जबतलक इमान की,
तब तो लंडनतक चलेगी तेग हिंदूस्थान की "
तेंव्हा सावरकरास उर्दू माहिती नव्हते. गाझी म्हणजे मुस्लीम योद्धा, जो धर्मासाठी व मुस्लीम राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण करतो, अल्लाचेच राज्य स्थापण्यात झगडतो. होमवर्क म्हणून आमची पाटलांना विनंती आहे की बहुजन समाजातीलच एका लेखकाने, श्री शेषराव मोर्‍यांनी लिहिलेले, "१८५७ चा जिहाद" हे पुस्तक वाचावे. लेखक ब्राह्मण नाही, त्यामुळे कृपया वाचाच असा आग्रह. मग आपल्याला कळेल की ही कोलांटौडी का? उर्दूत एक शब्द आहे दार-उल-इस्लाम व दार-उल-हरब . दार-उल-हरब म्हणजे हे इस्लामचे राज्य नाही असे येथील मुस्लीमांचे म्हणने आहे व होते. त्यामुळे १८५७ च्या पत्रांमध्ये तसे उल्लेख आहेत जे शेषराव मोर्‍यांनी व्यवस्थित मांडले आहेत.

बरं हे अजून एक बघा, " प्रामुख्याने उत्तर भारतात झालेल्या उठावात किती हिंदू सहभागी होते, ते पाहिलं तर मोजकी नावे समोर येतात, नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि मंगल पांडे. सावरकरांनी ह्या सर्वांना रणदेवता, संग्रामदेवता असे गौरविले आहे आणि ते सगळे ब्राह्मण आहेत" असे मांडून पुढे लगेच आम्ही वरच्या प्यारात जे म्हणत आहोत तेच ते मांडतात, " दार-उल-इस्लाम" चा विचार स्वत्;च्या ताकदीवर अंमलात आणंण मुस्लीमांना शक्य नव्हतं, त्यासाठी त्यांना हिंदूंची मदत लागणार होती, परंतू हिंदू माणसिकता तेवढी कडवी नव्हती हे उठाव कर्त्यांना ठावूक होते" आता घ्या. दोन्ही कडून आपलीच टिमकी अन वर परत ब्राह्मणांना मोठे केले म्हणून ओरडा.

एके ठिकाणी अजून एक गमतीदार वाक्य बघा, " प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ आणि 'रामदास हे शिवरायांचे गुरू नसून अदिलशहाचे हेर होते' असे पुराव्यानिशी हायकोर्टात सिद्ध करणारे प्रा मा म देशमुख ह्यांच्या मते, सावरकरांना अवघे दोन आठवडे कोलू ओढण्याचं काम दिलं गेलं. आणि काथा कुटण्याचे काम अवघं महिना भर दिलं गेलं." अशी कष्टाची काम बहुजनसमाजातील महिला देखील शेतात नांगरणी करताना विना थकवा करतात.

आता ह्या वाक्यातून महाशय दोन उद्दिष्ट साध्य करतात ब्राह्मण रामदास अदिलशहाचा हेर होता, हे त्यांना इथे सांगायचेच आहे, अन्यथा ह्या वाक्याची गरजच नव्हती पण ते सावरकरांवर वरील आरोपही करतात की त्यांना तेवढी सजा नव्हतीच म्हणे कारण मा म देशमुख तसे म्हणतात म्हणे! शिवाय हे काम महिला देखील करते ते सावरकरांनी कधी कधी केले व त्याचा प्रचार केला!! अहो पाटील किती तो द्वेष! अन लगेच पुढे सावरण्यासाठी ते लिहितात, "दिल्ली दरबार महोत्सवाची तयारी चालू होती तेंव्हा कैद्यांना वर्षाला १ महिन्याची सवलत (म्हणजे सावरकरांना ५० महिने) मिळणार होती, पण सावरकरांकडे एक आक्षेपार्ह पत्र सापडल्यामुळे तीन महिने एकातंवासाची शिक्षा दिली व सात दिवस हातकडीत राहण्याची शिक्षा दिली." म्हणजे वरच्या प्यार्‍यात शिव्या द्यायच्या व लगेच खाली असे लिहायचे. पण पाटील तुम्हाला एक कळतं का? की ही अशी शिक्षा कधी होते? तर इंग्रजांविरुद्ध कोठडीतून काही तरी केले म्हणून. उलट तुम्ही वर तर इंग्रजांनी त्यांना सवलतीत राहायला दिले असे म्हणता अन हे ही लिहिता? अहो काही तरी एकावर राहा. म्हणजे एकीकडे सावरकरांच्या शिक्षा कश्या साध्या असताना ब्राह्मणी प्रचारकांनी गवगवा केला हे म्हणायचे व पुढे लगेच नाही हो, त्यांना एकांतवासाशी शिक्षा केवळ पत्र सापडल्यामुळे झाली हे ही म्हणून मी तसा द्वेष करत नाही बरं हे ही साध्य करायचे.

एके ठिकाणी पाटील म्हणतात की "सावरकरांनी ने मजसी ने" हे गीत कोठडीत लिहिले कारण आपल्या जीवनाकडे (भविष्याकडे) पाहून ते उदास झाले, त्यांनी मृत्यूपत्र तयार केले त्या उदासीतच हे गीत लिहिले. आम्ही पाटलांस मराठी काव्याचे धडे गिरवायला पाठवावे असे इच्छितो. कारण ते काव्य ब्रायटन इथे लिहिले आहे, तेंव्हा मदनलाल धिंग्रा एपीसोड चालू होता, अशातच त्यांना त्यांचा मुलगा वारल्याचे पत्राने कळले म्हणून त्यांनी " तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥ सागरा प्राण तळमळला" अशी रचना केली. ज्यांना साधे हे गीत कधी व कुठल्या परिस्थितीत लिहिले गेले हे माहिती नसते त्यांनी पुस्तक लिहिण्याच्या अट्टहास का करावा? हे कळले नाही.

आणखी एके ठिकाणी ते म्हणतात, " सावरकरांनी आपली लेखणी राबविली ती खुज्यांचं कौतूक करण्यासाठीच. चंद्रगुप्ताला दासीपुत्र, धनानंदाला भेकड, जुलमी रंगवून आणि पळपुट्या चाणाक्याला मात्र राष्ट्र निर्माता ठरवून सत्य इतिहासाचा मुडदा पाडला" ह्यावर मी टिपण्णी करणार नाही कारण ह्या विषयावर भरपुर साहित्य उपलब्ध आहे. खोट कोण लिहितं ते वाचल्यावर कळेल. आणि शिवाजीची आठवण त्या काळच्या मृतप्राय जनतेत सतत तेवती ठेवली ती सावरकरांनी हे मात्र पाटील विसरतात.

इतर अनेक शुल्लक घटनांना देखील त्यांनी बाऊ करून मांडले आहे. गांधी हत्या, संघ इत्यादी मध्ये ते कुठेही ब्राह्मणाला शिव्या देण्याचे कमी करत नाहीत. इतकेच नव्हे तर सावरकर क्रांती कारक की इंग्रज मित्र? असा प्रश्न ते विचारतात. आम्ही त्याचे उत्तर देत नाही, गरज वाटत नाही पण पूर्ण पुस्तकच असे विरोधाभासाने व केवळ बाम्हणद्वेषाने भरले आहे. इतकेच काय त्या कुठल्याश्या जिनोम प्रोजेक्टने म्हणे ब्राह्मण हे आर्य असल्याचे सिद्ध झाले आणि ते युरोशियनच आहेत असे मत टिळकांपासून अनेक ब्राह्मणाचे होते असे लेखक म्हणतो. टिळकांच्या काळी मॅक्समुलर मुळे आर्य बाहेरून आले हे सर्वमान्य होते, तो इंग्रजी प्रचाराचा एक भाग होता, पण पुढे जाऊन हडप्पा-मोहंजदाडोचा शोध लागल्यावर (१९२१) ते आजपर्यंत अनेक नवीन संशोधन होऊन ही थेअरी बाद असल्याचे निष्पन्न होत आहे, तरी लेखकू जुन्याच थेअरीस कवटाळून बसले आहेत व ब्राह्मण हे बाहेरचे आहेत असे प्रतिपादत आहेत.

आम्ही ब्राह्मण आहोत म्हणून आम्हास ते खपले नाही असा कीव करण्याजोगा विचार कृपया करू नये तर आम्ही केवळ पुस्तक परिचय घडवून देत आहोत. पुस्तक परिचय का? तर पुस्तक कसे लिहू नये? ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक होय. सावरकरांचे विचार खोडायला काहीच हरकत नाही पण ते जातीय चष्मा लावून पाहू नये. सावरकर व्यक्ती म्हणून पाहावे व सारासार विचार करून त्यांचे विचार खोडावेत असे आम्हाला वाटते. पुढे असे पुस्तक पाटलांनी लिहिले तर आम्ही त्याचे स्वागतच करू. तूर्तास पाटील जातीय द्वेष वाढीस लावत आहेत असे मात्र आम्ही म्हणू इच्छितो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ जागोमोहनप्यारे {छान नाव आहे. अनेक कल्पक जालीय नावे घेतली जातात हे मला काहीसे माहीत होते, त्यापैकी हे एक आहे. असो}

"थोडक्यात यशस्वी व्यक्तीने आपल्याला हवा तसा इतिहास लिहावा, हाच अर्थ झाला.."

~ 'लता' उदाहरण मी वर योग्य स्वरूपात मांडण्यात कमी पडलो आहे असे वाटते. 'कारण" असेल तर शारदा जे काही लिहितील आणि जर ते मला वाचावे असे वाटेल तर त्यातील भाषेला मी प्राधान्य देईन. माझा रोख यशस्वी व्यक्तीने आपल्याला हवा तसा इतिहास लिहिणे वा त्याच्या/तिच्याबद्दल इतरांनी लिहिणे इकडे नसून 'सत्यस्थिती आणि कारकिर्दी' ची मांडणी संयत भाषेत समाजासमोर आणणे. हवे तर कारकिर्दीचे विश्लेषणही क्रमप्राप्त असेल तर जरूर करावे, पण विकृत भाषेला टाळावे.

मला वाटते अशी मागणी मनी ठेवली तर ते कुठल्याच पक्षी अन्यायाचे होणार नाही.

@ नीधप ~
"पुस्तक निवडू नये किंवा त्याची जाहिरात होतेय हे मला पटले नाही."

~ नित्याच्या पातळीवर हा कस लावायचा असेल तर या मताशी सहमत आहेच. पण घरात एके ठिकाणी आग लागली असताना दुसर्‍या खोलीत गरम होते म्हणून पंखा चालविणे तर्कशास्त्राच्या दृष्टीने अस्वीकृत आहे.

ब्रिगेडच्या भूमिकेने याच राज्यातील दोन मोठ्या जातीत यापूर्वी कधीही जाणवला नसलेला दुरावा नजरेसमोर असताना तो सांधण्याचे प्रयत्न करणार्‍यांना दुजोरा द्यावा की याच ज्वालाना वारा मिळत राहावा यासाठी मदन पाटील फॅक्टरीतील पंखे लोकांसमोर आणावेत? याचा संतुलीत विचार होणे गरजेचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे बाबी मान्य. पण समाजस्वास्थ्य बिघडवू शकणारी गांधील माशी आपण हाती घ्यावीच का?

"तमाम मराठा समाज या पुस्तकाच्या मागे लागणार नाहीये या अशोक यांच्या मुद्द्याशी सहमत..."

~ याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. हा विचार जालिय दुनियेत जितका जाईल तितकी दोन्ही समाजाची तडकलेली मने एकसंध राहाण्याचा दृष्टीने वाटचाल करतील.

अशोक यांच्या मुद्द्याशी सहमत....

केदार >> मदन पाटील मराठा आहेत व केदार जोशी ब्राह्मण आहे हा योगायोग आहे. >> मान्य...
आपण सर्व मराठी-महाराष्ट्रीय आहोत...

मामी, पराग, अंजली, सिंडरेला, बंडुपंत + १.
मृण्मयी शी सहमत. केदार कडुन अशी अपेक्षा नाही. एखाद्या सुन्दर पुस्तकाची ओळख करुन द्यावी ही नम्र विन्तती.

रसग्रहण हे वाचनात आलेल्या कुठल्याही पुस्तकाचे असु शकते, आवडलेल्या - न आवडालेल्या, असे मला वाटते. ज्यांचे वाचन आणि ऐकीव माहीती अगदीच थोडी आहे अशा एखाद्या व्यक्तिला केदारचे रसग्रहण किमान दुसरी बाजु शोधण्यास प्रव्रुत्त करेल. अन्यथा लेखकाची मते हीच अंतीम सत्य मानली जाउ शकतात.

बाकी केदार चे लिखाण रसग्रहणा पेक्षा समीक्षणा कडे झुकलेले आहे, पण त्याबद्दल परिक्षक टिपण्णी करतीलच. आपण वाचु आनंदे Happy

~ याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. <<
धन्यवादासारखं काही नाही. स्वतःच्या घरातली परिस्थिती तुमच्या मतासारखीच दिसली इतकंच. Happy

परिक्षण, समिक्षा, रसग्रहण, आस्वाद...... नाव बदलले तरी भूमिका जवळजवळ तीच असते... त्यामुळे हा लेख म्हणजे रसग्रहण नाही, समिक्षा आहे, हे काही पटले नाही..

चित्रपट आवडला/नावडला यापैकी काहीही समिक्षा/आस्वाद्/रसग्रहण याअंतर्गत येऊ शकते. पुस्तक्/लेख याला मात्र हा नियम का लागू नाही?

ब्राम्हणांविरुद्ध कुणी काहीही लिहले तर मायबोलीवर असेच रसग्रहण आणी प्रतिक्रीया येणार याची खात्री होती.. मायबोलीचे नाव बदलुन आता ब्राम्हणबोली करावे.. Happy

चला आता तलवारी उपसणार, वार-प्रतिवार होणार मग शेवटी माबोवरची फॅट लेडी येउन गाणं म्हणणार आणि या धाग्याला टाळं लागणार. आय हॅव सीन धिस मुव्ही मेनी टाइम्स बिफोर... Happy

राज Proud

राम,
>> असेच रसग्रहण आणी प्रतिक्रीया येणार याची खात्री होती..
खात्री होतीच ना? मग ब्राह्मणबोली नाव आहेच असं समजून वाचायचे कष्ट घेऊ नका. त्यात काय!

केदार,

(१) तू केलेले वरील रसग्रहण हे रसग्रहण वाटत नसून तुझी मते वाटत आहेत.

(२) वरील रसग्रहण हे खूप संक्षिप्त व अपूर्ण वाटत आहे.

(३) ह्या लेखकाचे व पुस्तकाचे नाव आजच समजले. असे काही पुस्तक आहे हे माहितच नव्हते. हा मदन पाटिल ब्रिगेडशीच संबंधित असणार. अशा द्वेषमूलक विचारांना इथे विनाकारण प्रसिध्दी मिळत आहे.

(४) पुस्तकातील एकंदरीत विचार बघता त्याचे वाङमयीन मूल्य शून्य आहे असे दिसते. त्यामुळे रसग्रहणासाठी तू चुकीचे पुस्तक निवडले आहेस असे वाटते.

>>अकथीत सावरकर
लेखक मदन पाटील
प्रकाशक - जिजाऊ प्रकाशन
मुल्य - ३०० रू
प्रथमावृत्ती - २३ मार्च २०११>> ह्या सुरुवातीच्या नोंदीमुळे हे 'सगळे' कशाविषयी चालले आहे ते समजणे फार सोप्पे गेले...
कुणीही कुठल्याही जातीसंदर्भात अनुद्गार काढु नयेत. कुणाचाही असा अवमान अत्यंत हीन वृत्तीचे लक्षण आहे. किंबहूना मी महाराष्ट्रीय, मी भारतीय हे सुद्धा संकुचित विचारसरणीचे लक्षण वाटते, आधुनिक शास्त्र कुणीकडे चालले आहे आणि आपण हे कुठल्या सीमांबद्दल बोलत आहोत! मी मराठी-ब्राम्हण-इस्लाम-ख्रिस्ती असा वाद स्वतः अनुभवला आहे. मराठा समाजात ९६ कुळींचे वर्चस्व! ब्राम्हणात -कर्‍हाडे/कोकणस्थ/देशस्थ!इस्लाम मध्ये शिया-सुन्नी! ख्रिस्तींमध्ये कॅथलिक-आर्थोडॉक्स.... वगैरे वगैरे. काही अर्थय का ह्या सार्‍याला? जन्म घेणारा म्हणत नाही मी कोण जातीचा. मरणारा म्हणत नाही की मी कोण म्हणुन मरतोय. भूक लागते त्याला जात नसते. काम करणार्‍याला जात नसावी.... आपल्या स्वतःच्या जातीबद्दल तरी कितपत बोध असतो प्रत्येकाला?? (जरा जास्तच 'नाना इष्टाइल झालंय बहुधा) देवाशपथ मनापासुन सांगते हे असंच मला वाटतं. दुसर्‍याचा आदर करणं हे प्रथम शिकावे लागेल माणुस म्हणुन जगताना.
केदार, माफ कर मित्रा पण... मला वाटतं रसग्रहणासाठी चुकिचे पुस्तक निवडले आहे, अशा पुस्तकांचा कुठे उल्लेख सुद्धा टाळावा.

मागे एका पत्रकाराने indian express मधे लेख लिहिला होता, त्याचा आशय असा काहीसा होता "सर्वसामन्य पाकिस्तानी लोक गरीब आहे, त्यांना भारताशी शत्रुत्व राखण्यात काडीचेही स्वारस्य नाही ,लष्करशहाना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी युध्य/दहशतवाद पेटते ठेवायचे असते पण मग सर्वसामान्य पाकिस्तानी माणुस हे रस्त्यावर उतरुन का सांगत नाही की आम्हाला भारताशी युध्य/शत्रुत्व नको?"
ह्याच चालीवर जर तमाम मराठा समाज या पुस्तकाच्या मागे लागणार नाहीये तर ते publicly विरोध का करत नाहीत?

सर्वसामान्य पाकिस्तानी माणसाला निदान जीवाची भीती तरी असते इथे तर तसेही नाही. हा म्हणजे पाकिस्तानी कलाकार ,खेळांदुंसारखा दांभिकपणा झाला , खासगीत म्हणायचे भारताशी शत्रुत्व म्हनजे मुर्खपणा आहे पण public stand काही तरी वेगळाच असतो.
बर अशी पुस्तके छापुन स्वतःच्या समाजाचे तरी काय डोंबल भले करनारा आहेत देवच जाणे.

@ arc

"ह्याच चालीवर जर तमाम मराठा समाज या पुस्तकाच्या मागे लागणार नाहीये तर ते publicly विरोध का करत नाहीत?"

~ मी एक मराठा आहे. आणि श्री.केदार यांच्या पुस्तक रसग्रहणाच्या निमित्तानेच नव्हे तर अन्य ठिकाणीही ब्रिगेड चळवळ व तिचे जनक उपयोगात आणीत असलेली तेढ माजविणारी भाषा याबद्दल आम्ही समविचारी मंडळींनी लेखी तसेच जाहीर [अगदी तुम्ही म्हणता तसे Publicly] निषेध नोंदविले आहेत. त्याबद्दल धमक्याही स्वीकारल्या आहेत. चांगली गोष्ट सांगायची झाल्यास स्थानिक पोलिसांनी आमच्या भूमिकेला विरोध न करता सामंजस्याची भूमिका घेऊन उलटपक्षी त्या धमक्यांचानिमित्ताने आम्हाला एक प्रकारे संरक्षणच दिले होते. [ही पोलिस दप्तरी लेखी नोंद झालेली घटना आहे] एका आठवड्याच्या आत सारे काही शांत. याचाच अर्थ असा की, एकजुटीने समाजातील अपप्रवृत्तीबद्दल आवाज उठविला [त्याला संविधनानुसार परवानगीही असते] तर उपद्रवी मूल्य कमी होते.

चांगली परिस्थिती निर्माण करण्यासाठी वर्तमानपत्रांनीही जातीय तेढ माजविणार्‍या बातम्यांना किती स्थान द्यावे याकडे कटाक्षाने लक्ष देणे फार जरूरीचे आहे. विकृत पत्रकांतील लिखाणामुळे समाज बिथरला की सर्वदूर पोचणार्‍या वर्तमानपत्रातील त्या पत्रकाच्या बातम्यामुळे ? हा आपण सर्वांनी विचार केला तर मर्क्युरी कुणामुळे वर चढला याचे उत्तर मिळेल.

काहीही असो... त्या धर्तीच्या लिखाणाबाबत 'इन टोटो इग्नोरन्स इज द बेस्ट सोल्यूशन' असेच मी म्हणेन.

अशोक पाटील

अशोक, सहमत. आणि तुम्ही केलेल्या प्रयत्नांबद्दल धन्यवाद!

पण अशीही शक्यता आहे की वर्तमानपत्रातून ते सतत लोकांवर मारले जावे अशी काहीतरी राजकीय चाल त्यामागे होती. काही दिवसांनी यातील "प्याद्यांची" खालच्या लिन्कवरील कवितेसारखी अवस्था होईल Happy
http://www.maayboli.com/node/6745

"वर्तमानपत्रातून ते सतत लोकांवर मारले जावे अशी काहीतरी राजकीय चाल त्यामागे होती."

~ नक्कीच, त्याबद्दल दुमत असणार नाही. पूर्वी वर्तमानपत्र चालविणार्‍यांचा कुणीतरी 'गोएंका', 'जैन' सम शेठ असत, त्यानंतर साखर कारखान्याच्या ग्राऊंडवर बॅटिंग करून मोठे झालेले राजकारणातले 'दादा' आले आणि ते ठरवू लागले की अमुक एका वर्तमानपत्रातून उद्या कुणाची लंगोटी फेडायची. त्यामुळे मने बिथरवाणारा शब्दमारा कुणावर व किती मारावा याचे कंपोझिंग प्रेसमध्ये न होता 'वाड्या'वर होत असे आणि मग तो मजकूर थेट प्लेटलाच जात असे.

पण हेही दिवस आता राहिलेले नाही, त्याला कारणही स्वतंत्र विचाराच्या वर्तमानपत्रांची जिल्हा पातळीवर वाढत असणारी संख्या. यांच्यावरच समाजस्वास्थाचे संतुलन न बिघडले जाईल हे पाहण्याची जबाबदारी आहे. ~ लेट अस होप दॅट समथिंग कॉन्क्रीट शाल कम आऊट हीअरइनआफ्टर फ्रॉम धिस केऑस.

["प्याद्यां" ची अवस्था भन्नाटच चितारली आहे श्री.कुलकर्णी यानी. मस्तच]

>>> काहीही असो... त्या धर्तीच्या लिखाणाबाबत 'इन टोटो इग्नोरन्स इज द बेस्ट सोल्यूशन' असेच मी म्हणेन.

संपूर्ण सहमत. असे विकृत लिखाण अनुल्लेखाने मारणेच योग्य.

भांडारकरच्यावेळी आपण जरी अनुल्लेख केला तरी ब्रिगेडने कारवाई केलीच, ह्याचाच अर्थ की सर्व जण अनुल्लेख करत नसतात. (मी समर्थन करत नाही पण सर्व अनुल्लेख करत नसतात हे सांगत आहे)

आनंद यादवांना (तुकाराम) ते लिखाण का मागे घ्यायला लावले? ते खरे पण होते असे लोकांचे म्हणने आहे.

तुम्ही अनुल्लेख केला म्हणजे सर्व संपते का? अनुल्लेख हे उत्तर प्रत्येक प्रश्नावर कसे होऊ शकेल?

परत सर्वजण इथे ब्राह्मण / मराठा आणत आहेत ते लेखकामुळे वा ह्या लेखामुळे. पण मी मुळात गाभ्याला हात घालत आहे की सावरकरांवर लिखाण करायचे असेल तर करा, टिकाही करा, बेसलेस नको इतकेच म्हणने आहे. त्याचा अनुल्लेख एखादा नॉर्मल वाचक करू शकेलही पण ज्यांना इतिहासाबद्दल प्रेम असते ते अनुल्लेख करतील का नाही हे माहीत नाही. ह्या पुष्ट्यर्थ एक उदाहरण देतो. छत्रपतींना काही इतिहासकारांनी व विचारवंतांनी (भारतीय सुद्धा!) लोकल गुंड म्हणून चित्रित केले. राजवाड्यांनी व अनेक इतिहासकारांनी त्याविरुद्ध लेखणी उचललेली आपल्या सर्वांना माहीत असेल. खरेतर ते सर्व अनुल्लेख करून वा फाट्यावर मारून गप्प बसू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. तर काही इतिहासकार आणि विचारवंतांनी अनुल्लेख केला. दोघात कोण बरोबर?

केदार,
६ जाने १९२४ साली सावरकरांची येरवडा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्या नंतर त्याना रत्नागिरीत नजरकैदेत ठेवण्यात आले. रत्नागिरी जि. सोडुन जाण्यास मज्जाव होता. ईतर कुठल्याही राजकीय कार्यात सहभाग घेण्यास बंदी होती. या कालावधित त्यानी अस्पृश्यांशी सहभोजनाचे व मंदिर प्रवेशाचे कार्य केले. पण १९३७ ला नजरकैद हटविल्या नंतर ते थेट राजकारणात उडी मारतात. समाजकार्याला तिलांजली देतात. त्यामूळे सावरकरांचे समाज कार्य निस्वार्थ मनाने केलेले नव्हते. नजरकैदेतून सुटका करण्यासाठी वापरलेले तंत्र होते. अन्यथा त्यानी नंतरही समाज कार्य केले असते. पण तसे होत नाही. याचाच अर्थ त्यांच समाजकारण हे विशिष्ट हेतूनी प्रेरीत होतं हे मात्र उघड आहे.

>>> त्यामूळे सावरकरांचे समाज कार्य निस्वार्थ मनाने केलेले नव्हते. नजरकैदेतून सुटका करण्यासाठी वापरलेले तंत्र होते. अन्यथा त्यानी नंतरही समाज कार्य केले असते.

जर नजरकैदेतून सुटण्यासाठी त्यांनी हे तंत्र वापरले होते तर १९२४ सालीच किंवा त्यानंतर लगेचच त्यांची नजरकैदेतून सुटका झाली असती. त्यासाठी १३ वर्षे लागली नसती. त्यांचे समाजकार्य १९३७ नंतर सुध्दा थांबलेले दिसत नाही.

>>> मास्तूरे, १९३७ नंतरच्या समाज कार्याची/सहभोजनाची एखादी तरी नोंद (घटना) सांगाल काय?

वीर सावरकरांनी १९२४ ते १९३७ या काळात केवळ ते नजरकैदेत असल्याने समाजकार्य केले हा चुकीचा समज आहे. किंबहुना अंदमानहून सुटका होण्याआधी १९२० मध्ये त्यांनी एका पत्रात खालील वाक्ये लिहिली आहेत.

"ज्याप्रमाणे भारतभूमीवरील परकीय सत्तेविरूध्द मी बंड केले पाहिजे, त्याचप्रमाणे जातिभेद व अस्पृश्यतेविरूध्द देखील बंड केले पाहिजे असे मला वाटते."

म्हणजे अस्प्रूश्यतेविरूध्द कार्य करण्याचा विचार त्यांच्या मनात १९२४ च्या पूर्वीपासूनच घोळत होता. १९२४ ते १९३७ या काळात राजकीय हालचालींना बंदी असल्याने त्यांनी नजरकैदेचा उपयोग समाजकार्यासाठी केला. पण १९३७ नंतर देखील ते कार्य थांबविलेले नाही.

१९३७ नंतर हिंदू महासभेचा अध्यक्ष या नात्याने ते ज्या शहरांना/गावांना भेटी देत, त्या ठिकाणच्या अस्प्रूश्यांच्या घराला देखील ते भेट देत असत. अस्पृश्यांना उपस्थित राहण्याला मज्जाव करणार नाही या अटीवरच ते गणेशोत्सवातील व्याख्याने देत असत.

१७ फेब्रूवारी १९३९ या दिवशी ते बंगाल मधील खुलना येथे बंगाल प्रदेश हिंदू परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी व्याख्यानात अस्पृश्यता नष्ट व्हायला पाहिजे अशी जोरदार मागणी केली. निव्वळ सभेत बोलूनच ते थांबले नाहीत, तर, व्याख्यानानंतर, स्थानिक अस्पृश्य नेते श्री ढाली यांच्या घराला त्यांनी भेट देऊन भंगी, नामशूद्र, पटणीस व बंगालमध्ये अस्पृश्य मानल्या गेलेल्या इतर अनेकांबरोबर एकत्र भोजन केले. त्यावेळच्या "अमृतबझार" या वृत्तपत्राने, सहभोजनात सहभागी झालेले सर्वजण आपल्याबरोबर सावरकरांनी एकत्र भोजन केल्याने किती भारावून गेले होते, त्याचे आपल्या अग्रलेखात भावपूर्ण वर्णन केले होते. ते निव्वळ व्याख्यान देऊन न थांबता आपले विचार कृतीतून दाखवून द्यायचे.

१९३९ सालीच आपल्या मुंघेर (बिहार) येथील भेटीत त्यांनी "अस्पृश्यता परिषदेत" भाषण केले व नंतर तिथल्या अनेक अस्पृश्यांबरोबर एकत्र भोजन केले.

१९४४ मध्ये त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याची योजना करणार्‍या त्यांच्या हितचिंतकांना त्यांनी त्यांचा वाढदिवस हा "अस्पृश्यता निर्मूलन सप्ताह" म्हणून साजरा करावा असे सांगितले.

ते स्वतः अस्पृश्यता अजिबात पाळत नव्हते व अस्पृश्यता निर्मूलनाचे महत्व सर्वांना व्याख्यानातून, लेखनातून व प्रत्यक्ष कृतीतून इतरांना पटवून देत होते.

मास्तूरे अशी भाषणं तर गांधी जागो जागी दयायचे. गांधीनीतर चक्क हरीजन नावाचं पत्रकही काढला होता. मग काय गांधीला सुद्धा दलित उद्धारक म्हणायचे काय? असा दिखावा करणे गांधी/सावरकरांची वृत्तीच होती. सावरकर किंवा गांधी यानी दलितांसाठी भरीव कामगिरी केली नाही हेच सत्य आहे. उगीच त्यांचं उदात्तीकरण करण्यासाठी तोकडी उदा. देण्याचे टाळावे. आता असल्या खोटया पुराव्यांना कुणीच बळी पडणार नाही.
--------------------
मे १९५६ चे तीन पत्र वाचा. ज्या शेषराव मोरेनी १८५७चा जिहाद लिहलाय त्यांच्याकडे सावरकरांची ती ३ पत्रं आहेत. त्या पत्रांनी असे सिद्ध होते की सावरकर अत्यंत जातीयवादी होते. हिंदू महासभेने छापलेल्या ३ खंडात सावरकरानी जातीयवाद दाखवून दिला.

मे १९५६ चे तीन पत्र वाचा. ज्या शेषराव मोरेनी १८५७चा जिहाद लिहलाय त्यांच्याकडे सावरकरांची ती ३ पत्रं आहेत. त्या पत्रांनी असे सिद्ध होते की सावरकर अत्यंत जातीयवादी होते.
>>>
हा निश्कर्ष तुमचा की शेषराव मोर्‍यांचाही? ही पत्रे रा. मोर्‍यांच्या कुठच्या पुस्तकात वा इतर कुठे प्रसिद्ध केलेली आहेत की अप्रकाशित आहेत?
शेषराव मोर्‍यांचे (ज्यांच्याकडच्या पत्रांचा तुम्ही दाखला दिला आहे) सावरकरांबद्दलचे मत तुमच्या मतापेक्षा खूपच वेगळे आहे.

बकासुर,

गांधीजी व स्वातंत्र्यवीर सावरकर हे अत्यंत जातीयवादी होते या आपल्या अनोख्या व अमूल्य संशोधनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद!

आवडले रसग्रहण.

जातीव्देष करण्यापलिकडे ज्यांना दुसरे काहीच येत नाही, त्यांच्याकडून यापेक्षा दुसरी अपेक्षा करने ही आपलीच चूक ठरते.

सावरकर ब्राम्हण आहेत म्हणुन त्यांनी केलेले कार्य व विद्रोह नजरेआड करुन चालणार नाही .
सावरकरांना मुळात हिंन्दु धर्मातील जाती परंपरा मान्य नव्ह्तीच , त्यांना झालेली शिक्षा , तुरंगवास , हाल या त्यांच्या समकालिन कोण्या पुढार्याने भोगले आसतील आसे मला वाटत नाही .

सावरकर भक्त .
लक्ष्या .
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
मला पुस्तक आणी रसग्रहण दोन्ही आवडलेली नाही ..... हे म्हण्जे तुम्ही आसे लिहता तर आम्ही आसे लिहतो , जशास तसे याने काय होणार , यामुळे जास्तीच चिखल फेक होइल .

गोबेल्स पद्धतीने प्रचार करणारे काही मुख्य पद्धती अवलंबतात :

- एकच गोष्ट लोकांना पुन्हा पुन्हा सांगितली की खरी वाटते.
- लोकांच्या दृष्टीने जे पवित्र, वंदनीय आहे त्याच्यावर थेट हल्ला केला की लोकांच्या श्रद्धा डगमगून जातात, असे गोंधळलेले लोक नंतर आपल्या कार्यासाठी उपयोगात येतात.
- ज्याला केवळ प्रचार करायचा आहे त्याने पुरावे, नोंदी इत्यादीच्या भानगडीत पडायचे कारण नाही, बेधडक आपल्याला वाटते ते बोलावे.
- शत्रू कायम असा निवडावा कि पहिल्या हल्ल्यातच आपण प्रसिद्ध होवून जावू, भले हल्ल्यात हार झाली तरी हरकत नाही, ती पुढच्या विजयाची नांदीच असते.
- अशा हल्ल्यात कोणताही विधिनिषेध बाळगण्याचे कारण नाही, केवळ अंतिम लक्ष्य महत्वाचे.

प्रस्तुत पुस्तक व त्या मागील संघटना ह्या वरील विचारांच्या कट्टर समर्थक आहेत आणि मुख्य म्हणजे 'सावरकर' व त्यांचे आयुष्य हा पुस्तकाचा खरा विषय नसून फक्त जातीद्वेषाचा प्रचार करणे हा मुख्य हेतू आहे.

उदा. " प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ आणि 'रामदास हे शिवरायांचे गुरू नसून अदिलशहाचे हेर होते' असे पुराव्यानिशी हायकोर्टात सिद्ध करणारे प्रा मा म देशमुख "
ही शुद्ध थाप आहे, असे काहीही, कोणीही, कुठेही सिद्ध केलेले नाही, मात्र नकळत आपण तिला प्रसिद्धी देवून गेलात.

मंडळी, माफ करा पण त्यामुळे हे रसग्रहण अनावश्यक वाटते, याने संकुचित विचार प्रसाराला हातभारच लागेल

टीप: 'प्रबोधनकार' हे उपनाम निव्वळ 'प्रबोधन + आकार' अशा अर्थाने घ्यावे, थोर विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी सार्धम्य दाखवण्याचा कोणताही हेतू नाही.

Pages