पाणी..पाणी

Submitted by अनन्या२२२ on 1 August, 2011 - 07:15

पाण्याची रूपे किती अनेक
कधी इवलासा थेंब जरासा
कधी खळाळ

णारा निर्झरा
सारी रुपे पाण्याची
कशी किमया देवाची
कधी वाहते संथ जलधारा
कधी सागरोत्सुक सरिता
व्हावे कधी नत दिव्य प्रपाता
तुझी रुपे होती प्रतिबिंबीत
प्रकटे निर्मीती करुनी अचंबित..!!
कधी वाटते क्षुद्र डबके
तर कधी असे पवित्र जलाशय
प्रकटतो निरनिराळा आशय...!!
डोळ्यातला थेंब ट्पोरा
ते तर कसले रुप निराळे
कधी शिवशंभूच्या पिंडीवर
ओंकारचा अभिषेक तुझा
जीवन लुप्त होता होता
' हाय' म्हणते सारी जनता
अन् करीतो गर्जना रत्नाकर
सार्‍या जीवनांचा प्राणपिता...!!!!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: