आषाढि अमावस्या - दिव्याचि आवस

Submitted by सुनिल परचुरे on 1 August, 2011 - 04:03

परवाच शनिवारि आषाढि अमावस्या झालि. सध्या ति एका वेगळ्याच नावाने किंवा कारणाने प्रसिद्ध आहे. ते नांव म्हणजे "गटारि". पण तिला दिप अमावस्या किंवा आषाढि -अमावस्याहि म्हणतात. त्या दिवशि गव्हाच्या कणकेत गुळ मिसळुन त्याचे लहान पणतिच्या आकाराचे दिवे करतात. त्या ऊकडलेल्या गरमागरम दिव्यांवर तुप घालुन खाताना अशि काहि चव लागते कि व्वा.
आमच्या देवघरातिल देव्हार्‍यातिल हे दिपपुजन.

003_0.JPG009.JPG

गुलमोहर: 

.

फोटो सुंदर आलेत. देव्हारा कसल्या ग्लास मटेरिअलचा आहे का? तो पण छान आहे.
झब्बूसुद्धा आवडला !

आमच्या घरीही करतात ही अमावस्या..
धन्स आठवनींना उजाळा दिल्या बद्दल :)>>> अनुमोदन

"गटारि" ह्या नावामुळे आणि शब्द्शः दारु पिऊन "गटारात" पड्ण्याच्या नवीन प्रथेमुळे (???) अंधार उजळणार्‍या दिप अमावस्ये ला सर्वजण विसरु पाहात आहेत ..... अशी प्रकाशचित्रे आणि लेख हे विसरु देणार नाही Happy

मस्त फोटु ...देव्हारा काचेचा आहे का ? सुन्दर आहे ...
आठवणिना उजाळा दिल्या बद्दल आभार ....
मधेच दुपारचे खाणे म्हणुन पन असे दिवे खाउ शकतो कि आपण .....दिप अमावस्येची वाट का पहायची ? Happy

मस्त !!

मस्तच! Happy झगमगाट Happy

घरी दिव्याच्या आमावस्येला आई असे तेला, तूपाचे दीवे लावुन घर उजळायची. वीजेचे दीवे थोडावेळ मुद्दामहुन बंद ठेवायचो Happy

काचेचा देव्हारा खुप सुरेख आहे Happy

दोन्ही फोटो खूप सुंदर!!
सुनील, तुमचा देव्हारा फारच सुरेख आहे.