पोस्टमार्टेम - सनसनाटी बातम्या, ईमेल फॉरवर्ड यांचे

Submitted by असो on 29 July, 2011 - 07:45

काही बातम्या ऐकतानाच त्यावर विश्वास ठेवावासा वाटत नाही. हल्ली तर ब्रेकिंग न्यूजचा आणि सबसे तेजचा जमाना असल्याने विश्वासार्हता नावालाच उरली आहे. कधी कधी आपल्याला ईमेल मधे खळबळजनक अस काही तरी वाचायला मिळतं. मग अचानक कुठल्यातरी फोरमवर अशा ईमेल्सचा हवाला देत चर्चा सुरू होते.

या धाग्यावर अशा संशयास्पद बातम्या, ईमेल्स यांची आपण चर्चा करूयात. त्या बातमीच्या आशयाबद्दल चर्चा अपेक्षित नसून ही न्यूज का खोटी वाटते आणि तसं सिद्ध करता येत असल्यास त्याचे पुरावे दिले जावेत. लिंक पुरेशी आहे. आपण काही पत्रकार नाहीत ही मर्यादा आहेच.

सुरूवात कुठून करायची ?

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान जॉन हावर्ड यांनी एका समुदायाबाबत केलेल्या वक्तव्यांबाबतची एक मेल सर्वत्र फिरत होती. एका फोरमवर त्याबाबत चर्चा पाहीली. मला त्या मेलबाबत शंका येण्याचं कारण म्हणजे खरंच असं काही वक्तव्य केलं असेल तर सर्वप्रथम दृकश्राव्य माध्यमांणी ठणाणा करायला हवा होत्या आणि लगेचच मुद्रीत माध्यमांनी त्यावर भाष्य करणं अपेक्षित होतं. तसच या बातम्यांचा परिणाम म्हणून निषेध, मोर्चा वा तत्सम काहीतरी घडलं असतंच. यातलं काहीही .वाचनात वा पाहण्यात आल नाही.

थोडासा सर्च केल्यावर अशा बातम्यांच पोस्टमार्टेम करणारं एक संकेतस्थळ (त्यावेळी) सापडलं. तिथे अशा कितीतरी इमेल फॉरवर्डचं पोस्टमार्टेम करून वस्तुस्थिती मांडली गेली होती. त्यानंतर कुणालाच शंकेला जागा राहण्याचं काहीही कारण नव्हतं. या संकेतस्थळाची लिंक सर्वत्र दिली जाते हे ही दिसून आलं. अशाच प्रकारचि आणखीही काही संकेतस्थळं आहेत.

माझी शंका खरी ठरली. जॉन हॉवर्ड यांच्या वक्तव्यावाबतची ती मेल खोटीच निघाली. पण कित्येक फोरमवर त्याबाबत चर्चा झडल्यादेखील.

http://www.hoax-slayer.com/howard-muslim-speech.shtml

http://www.hoax-slayer.com/edmund-barton-immigration-quote.shtml

वरील संकेतस्थळावर वस्तुस्थिती दिली आहे. त्यावरून आपल्याला ठरवता येईलच.

हे झालं एक उदाहरण. सर्वांना नम्र आवाहन आहे कि, इथून पुढे जेव्हा अशा प्रकारच्या (संशयास्पद) बातम्या पाहण्यात येतील तेव्हा आपण त्यांच्या खरेपणाबाबतचा मागोवा इथे घेउयात.

गुलमोहर: 

असाच एक प्रकार नासाच्या चांद्रमोहीमेबाबत आहे. डिस्कव्हरीने आपल्या रिपोर्टमधे दोन्ही बाजूंना सारखेच महत्व दिले आहे. पण कुठल्याही निष्कर्षावर येण्याचे टाळले आहे. दोन्ही बाजू ख-या वाटतात. अर्थात नासाच्या विरोधकांकडे ( चांद्रमोहीमेच्या खरेपणाबाबतच्या) काही मुद्दे असे आहेत कि त्यांची समाधानकारक उत्तरे मिळायला हवीत असं वाटू लागतं.

अपोलोपासून चांद्रकुपी वेगळी होऊन पुन्हा ती अपोलोला जोडता येणे हा भाग जरा पचायला अवघड वाटतो खरा...

http://www.physicsforums.com/showthread.php?t=93093

http://www.salagram.net/MoonLandingHoax.htm

अनिल, नासाच्या चांद्रमोहीमेबद्दल शंका ही conspiracy theory झाली... अशा अजुन अनेक theory आहेत... दुसर्‍या महायुद्धातील ज्यु हत्याकांड, UFO, Area 51, 9/11 चा WTC वरील हल्ला वै वै Happy

खरंय. ज्यु हत्याकांडाबद्दल पण प्रवाद आहेत का ? त्याबाबत वाचायला आवडेल.

स्वामी विवेकानंद यांचं "ओरिजिनल" भाषण ही सध्या सर्वत्र फिरतय. कुणाकडे लिंक आहे का ?

सॅम

धन्यवाद या लिंकबद्दल.:)

स्वामी विवेकानंदांच्या आवाजाबाबत....

ते भाषण हा एक अमूल्य ठेवा आहे यात शंका नाही. पण त्या काळी स्टुडिओच्या बाहेर रेकॉर्डिंग शक्य नव्हते.
http://www.hindu-blog.com/2010/08/fake-or-real-audio-recording-of-swami_...

बर्‍याच ईमेल पडताळून पाहता येण्यासारखी एक साईट: www.snopes.com
या लोकांनी ईमेल मधुन फिरणार्‍या बर्‍याच खर्‍याखोट्या घटना/अफवांचा पाठलाग केलेला आहे.
आणि शोधणेही सोप्पे जाते. मी बर्‍याच वेळा आलेल्या ईमेल तिकडे तपासून बघतो..

तिथे Whats New नावाचं बटन आहे त्यावर रोजच्या अफवा/घटनाही कळतात.

असेच एक मध्ये 'लॉर्ड मेकोले याचे भारताबद्दलचे उदगार' असे इ-मेल फिरत होते, जरा संशोधन केल्यार ते धांदांत खोटे असल्याचे आढळले आहे.
जीद्यासुनी खालील संकेतस्थळ पाहावे:
http://sundayposts.blogspot.com/2008/01/lord-macaulays-quote-on-india.html

अनेक गोष्टी लोक स्वतः सहज तपासुन पाहु शकतात, पण आधी पासुनच कोणीतरी सांगीतले म्हणजे त्या व विश्वास ठेवायचा ही आळशीपणाची वृत्ती. या महिन्यातील (आज शेवटचा दिवस) वाराची खासीयत पाहु: १ तारीख शुक्रवारी, व ३१ रविवारी - एकाच जुलै मध्ये तीन शु-श-र केवळ ८२३ वर्षांनी एकदा येतात म्हणे.

Subject: July 2011: INTERESTING!

This year, July has 5 Fridays, 5 Saturdays and 5 Sundays. This happens once
every 823 years. This is called money bags. So, forward this to your friends
and money will arrive within 4 days. Based on Chinese Feng Shui the one who
does not forward ..... will be without money. I'm not taking any chances!

साधा हिशोब केला तर लक्षात येते की प्रत्येक महिना ७ पैकी एका वारी सुरु होणार. ३६५ ला ७ नी भाग जात नसल्यामुळे तो वार बदलणार. त्यामुळे सरासरी दर ७ वर्षांनी जुलै शुक्रवारी सुरु होणार व त्या महिन्यात शुशर ५ येणार. आणि येतातही. पण विचार करणार कोण? आणि का?

http://www.rhinocerus.net/forum/databases-pick/679601-five-fridays-july....
http://wiki.answers.com/Q/How_often_does_July_have_5_Fridays_5_Saturdays...

अरे वा प्रबोधनकार पुन्हा अवतरलेले दिसताहेत. नातवंडांची युती करून टाका. Happy
जोक अपार्ट...
अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेन्टर बद्दल पण अशी थिअरी आहे की ही घटना अमेरिकेने स्वतःच घडवून आणली आहे. गुगल, तुनळी(यूट्युब) वर शोधा म्हणजे सापडेल.

महेश

सँम ने सुचवल्याप्रमाणे conspiracy theory चा आपण स्वतंत्र विचार करूयात. कुणीतरी तसा धागा सुरू करावा. कारण एकच विषय घेतला तरी तो बरेच दिवस चालेल असं वाटतं.