स्व. बाबुजी उर्फ़ सुधीर फ़डके यांचा ९ वा स्मृतीदिन

Submitted by विशाल कुलकर्णी on 29 July, 2011 - 06:47

आज बाबुजींचा ९ वा स्मृतीदिन आहे. २९ जुलै २००२ रोजी या नश्वर जगाचा निरोप घेतलेले बाबुजी आजही त्यांच्या चिरतरूण संगीताच्या आणि गाण्यांच्या माध्यमातून आपल्यात जिवंत आहेत.

बाबुजींनी दिलेली आणि गायलेली गाणी कायम आपल्या स्मरणात राहणार आहेतच.
पण बाबुजी आजही तूम्ही आहात आमच्यामध्ये आणि कायम राहाल !

स्व. बाबुजींना माझी सश्रद्ध आदरांजली !

विशाल..........

गुलमोहर: 

बाबुजी शब्दोच्चाराबाबतीत आग्रही असायचे.

गाण्यातला पोटफोड्या (ष) आणि शहामृगाचा ( श ) याचे उच्चार ऐकाणार्‍याला कळले पाहिजेत इतपत उच्चार स्पष्ट हवा हा आग्रह अन्य कोणत्या संगीतकाराने/गायकाने धरल्याचे ऐकीवात नाही.

श्रीधर फडके त्यांच्या आठवणी सांगताना

धुंद येथ मी स्वैर झोकीतो मद्याचे प्याले आणि धुंदी कळ्यांना यातला धुंद बाबुजी कसा वेगवेगळा उच्चारायचे याच प्रात्यक्षीक करुन दाखवतात.

जग हे बंदिशाळा म्हणताना असो की जाऊद्या सोडा मधली उत्कटता त्यांचा सुरातुन आज ही रेंगाळते आहे असा भास होतो.

बाबुजींनी एक मुलाखत दुरदर्शनवर दिली होती. त्यांच्या जीवनातले उतार चढाव, त्यांच्या जीवन निष्ठा त्या निमित्ताने ऐकल्या होत्या.

गोवा मुक्ती संग्राम असो की राम जन्म भुमी आंदोलन बाबुजींनी संघनिष्ठा संभाळताना वयाचा, प्रतिष्ठेचा कधी अडसर होऊ दिला नाही.

बाबुजी आज नश्वर दुनियेत आपण नाही पण स्वरांच्या दुनियेतले आपले स्थान अद्याप अबाधीत आहे.