वर्षाविहार २०११ - "चिंब भिजलेला हँगओव्हर"

Submitted by भुंगा on 27 July, 2011 - 12:30

बरोब्बर १०.४५ ला रात्री मी बसमधल्या उरल्यासुरल्या मेंबर्सना बाय बाय करून आरे फ्लायओव्हरच्या सुरुवातीला पेट्रोल पंपजवळ उतरलो तेच मनात ताज्या राहिलेल्या दिवसभराच्या आठवणी घेऊनच.

खांद्यावरची बॅग सावरत पेट्रोल पंपावरून निघालो तर काय...... पंपावर पेट्रोल भरणारा पोर्‍या सेम टू सेम आपला "जिप्सी"..... च्या मारी, हा काय लोच्या.......???
चक्रावल्या नजरेने थोडा पुढे जातो तर पानाच्या ठेल्यावर आपल्या लाल झालेल्या तोंडाने गुणगुणत बसलेला पानवाला म्हणजे "आनंदसुजू"....... त्याच्या बाजुला उभा राहून लायटरने सिगारेट शिलगावणारा पोरगा "आनंदमैत्री" आणि याच्याच बाजुला उभा राहून आपलं ठेवणीतलं पान मागणारा गोल गरगरीत देह म्हणजे आपला "बागुलबुवा"....... आईचा घो, काय चाललय काय??? Uhoh

रिक्षावाल्याला हाक मारली आणि रिक्षेत शिरणार, बघतो तर काय..... रिक्षावाला "यो रॉक्स"..... आता हा लंगडी घालत रिक्षा चालवेल; तर मेलोच आपण Proud

स्टेशनला उतरून घराकडे चालत जाताना समोरून येणारा धोतरातला भैया म्हणजे "घारुअण्णा", सोसायटीच्या गडाचे बंद झालेले दरवाजे माझ्यासाठी उघडणारा आमचा नेहमीचा वॉचमन म्हणजे हट्टाकट्टा "गिरीविहार"..... ब्बास ब्बास ब्बास.......
लिफ्टपर्यंत पोचलो तेंव्हा माझी खात्री झालेली होती की, समोर घराचा दरवाजा उघडल्यावर दिसणारी आई ही आज "अश्विनी के" च असणार..... बिचकत बिचकत दारावरची बेल मारली आणि खरोखरच दारात "अश्विनी माय" उभी...... बाजुला बहीण होती ती "पारिजातक".... माझी छोटी छोकरी सेम टू सेम "ज्यु. मंजुडी"........ अरे हे काय चाललय....!!!! मै कहां हूं.....!!!!!
तोंडावर थोडं पाणी मारलं आणि आरश्यात बघतोय तर आरश्यात दिसतोय तो "कौतुक शिरोडकर". हे भगवान....... आता ह्याला काय म्हणावं??????
क्षणात मनात प्रश्न पड्ला आणि पंचेंद्रियांनी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितलं.....

हॅंगओव्हर हँगओव्हर हँगओव्हर.........!!!!!!

आता मी जरा भानावर आलो आणि इतका वेळ अजून आपण वर्षाविहाराच्या सुखद आठवणीतून बाहरेच पडलेलो नाही याची जाणीव झाली. कसला सुखद आणि हवाहवासा हॅंगओव्हर आहे हा.... तसे हँगओव्हर बर्‍याच प्रकारचे असतात, पण हा म्हणजे अगदी,

अजुनी सुगंध येई दुलईस मोगरीचा
गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली

अगदीच असल्याच धाटणीचा हवाहवासा हँगओव्हर..............!!!

नकळत गादीवर मान टेकली आणि गाढ झोपलो तोच आजच्या दिवसाच्या क्षणा-क्षणाचा हिशोब करतच.

***************************************************
गजर न लावताच भल्या पहाटे ४.४५ ला उठलो. तयार होऊन बरोब्बर ६ वाजता ओबेरॉयच्या कॉर्नरवर मी हजर होतो. यो रॉक्सला फोन लावला तेंव्हा गाडी कांदिवलीला पोचलेली होती. समोर गाडी पोचली आणि यो रॉक्स उतरेल असे वाटत असतानाच "विन्या" उतरला..... पहिला सुखद धक्का. रात्री कळलं होतं की काही कौटुंबिक कारणास्तव विन्याला जमणार नाही. पण हा पठ्या कसला ऐकतोय, सकाळी हजर. हा असला की गाडीत जान येते असं ऐकून होतो, पहिलाच एकत्र प्रवास होता.... पण आनंद झाला बघून.
गाडीत योरॉक्स, दिपिका, देव काका, त्यांची मुलगी, तिच्या दोन मैत्रीणी असे लोक हजर होतेच. एक आयडी आपल्या नवरोबा आणि मुलाला घेऊन होता पण शेवटी उतरेपर्यंत दिवसभरात मला आयडीच कळला नाही तिचा.... असो. प्रतिसादात कोणी ना कोणी माझ्या अज्ञानात भर नक्कीच टाकेल....
"दुसर्‍याचं अज्ञान हक्काने चारचौघात दूर नाही केलं तर ते मायबोलीकर कसले" Biggrin

देवकाकांशी गप्पा मारेपर्यंत गाडी जेव्हीएलारला पोचली आणि ढोलकीबहाद्दर वैभव आयरे आणि पारिजातक यांनी एंट्री मारली. तिथून थेट गाडी थांबली ती गांधी नगरच्या सिग्नलला. नेहमीप्रमाणे इकडच्या तिकडच्या कोपर्‍यातले फोटो काढण्यात "जिप्सी"ने यायला अंमळ उशीरच केला. पण हा उशीर काहीच नाही असं म्हणायची वेळ आमच्यावर मुलुंडला येणार याची तेंव्हा मला पुसटशी पण कल्पना नव्हती.

गाडी मुलुंड पिक्-अप स्पॉटला पोचली आणि घोळक्याने काही मायबोलीकर उभे दिसले.
लांबूनच पहिली दिसली आणि ओळखली ती "बागेश्री"...... आता हिला बहुतेक संयोजकांनी कर्जतला आपण विमानाने जातोय असं सांगितलं असावं..... छानपैकी ट्रॉली बॅग घेऊन श्री व सौ बागेश्री वाट पहात उभे होते..... त्यातच सर्वांचा गळाभेटीचा कार्यक्रम चालू असताना श्री देशमुखांनी बागेश्रीचे दोन चार सेपरेट फोटो काढलेच Proud
नीलवेदच्या तोंडाचा पट्टा एव्हाना सुरू झाला होता. तेवढ्यात एक गुटगुटीत सुधृढ गोरागोमटा संयोजक इथे आला... हा होता आपला "डुआय" उर्फ दिपक कुलकर्णी उर्फ कुलदीप. मग इंद्रा त्याचं कुटुंब, मंजुडी आणि ज्युनिअर मंजुडी, "मोनाली पी" आणि कुटुंब, आनंदसुजू, आनंदमैत्री, केदार सोमण, श्री व सौ राजगुरू, जुई, तोष्दा, प्रणव सगळेच होते. गाडी आता भरत आली, तरी बागुलबुवाचा पत्ता नाही. अखेर बागुलबुवा हजर झाला तोच "अरे दोन बायकांना तयार करून घेऊन यायला वेळ लागणारच ना" अशी आरोळी ठोकतच. आता दोन बायका आणायला गेला होता की मुखवट्याच्या गौरी हे त्याचं त्यालाच ठाऊक.... Happy बागुलबुवा, ज्युनिअर बागुलबुवा आणि मिसेस बागुलबुवा यांच्या जोडीला अश्विनी के होती...... तिने गाडीतून जमिनीवर पहिले पाऊल टाकताच "अन्नपूर्णा माता की जय" चा एकच उत्स्फुर्त गजर झाला.....

अजुनही किशोरने कळवा क्रॉस केलेय वगैरे गोष्टी ऐकुन काही धुरांडी बाजुला कोपर्‍यात गेली तर इतर जण चहाच्या तलफेने टपरी शोधत बाजुच्या गल्लीत घुसली. सगळे काम आटोपुन फायनली गाडी निघाली तीच वौभ्याच्या ढोलकीच्या थापेने आणि गजाननाच्या गजरात.
निदान पहिल्या गाण्यात तरी "दारू" येता कामा नये अशी गळ सर्वांनी आनंदसुजूना आधीच घातली होती Proud नंतर सुजूला रान मोकळंच मिळणार होतं... Wink
मग ऐरोलीला गिरीविहार, पुढे रीना, चेतना असं करत कोरम एकदाचा फुल्ल झाला आणि सुरू झाली एक बहारदार सांगितीक धावती मेहफिल.......... क्या बात है...!!!!

मला वाटतं शहारुख खान, अमिर खान इतकी एनर्जी आणतात कुठून असे फुटकळ प्रश्न विचारत फिरणार्‍या पत्रकारांनी एकदाच "आनंदसुजूला" भेटा.......... लहान पोरं परवडतील सहलीला गेलेली, इतका दंगा हा एकटा माणूस घालतो आणि संपूर्ण दिवस ह्याची एनर्जी जैसे थे...... लईच भारी.
गाण्यांचा इतका अद्ययावत स्टॉक इतर कोणाकडेही नाही...... पुन्हा त्याच्या जोडीला दर्दभरे और रोमँटिक गीतफेम आनंदमैत्री आणि लावणी पैलवान विनय भिडे...... बहारा बहारा...!!!
यंदा त्यांच्या साथीला उबा राहून मी चांडाळचौकडी पूर्ण केली.
वैभ्याच्या जोडीला मोनालीचा नवरा मंदार याने पण सही ढोलकीची साथ दिली.

मध्येच पुण्याच्या गाडीतून ८.४५ ला एक समस मला आला. "मिल्या, **** अजून आम्ही पुण्यातच"... छान.... "आता टाटा करायला संध्याकाळी भेटा" असा रिप्लाय पाठवून पुन्हा आम्ही गाण्यात दंग झालो.
गाण्यांच्या ओघात कधी चौक फाटा आला कळलं च नाही. सर्वांनी "एकीचे बळ" इथे दाखवायला हरकत नाही असा बागुलबुवाचा निरोप आला आणि सगळे टगे रस्त्याच्या दुतर्फा पांगले Proud
थोडावेळ गप्पा आणि चहापान झाल्यावर पुन्हा कर्जकडे कूच केले......
मधल्या वेळेत पुन्हा एकदा श्री. देशमुखांनी सौ. बागेश्री देशमुख यांचे काही सेपरेट फोटो काढलेच Wink

मला वाटतं घरून निघताना यंदाचा "ववि कपल ऑफ द इअर" आपल्यालाच मिळाला पाहिजे अशी सक्त ताकद बागेश्रीने दिलेली होती...... त्यांना तशी टफ द्यायला फारसे कोणी नव्हतेच. पल्ली आणि तिचे अहो होते, पण ऑलरेडी त्यांना "हॉल ऑफ फेम" मध्ये बसवल्याने यंदा बागेश्रीला फुल चान्स होता.

रस्त्यात उजवीकडे आणि डावीकडे कुठे कुठे देवळं आहेत आणि कुठे बीअर शॉपी याची खडानखडा माहिती आनंदसुजूला होती....... पायलट वविला येऊन गेलेली मंडळी फॉर्मात होती. सगळ्या गृपचा लिडर घारुअण्णा ड्रायव्हरजवळ बसून रस्ता सांगत होता......... मला वाटतं असं एकही हिंदी आणि मराठी गाणं आम्ही शिल्लक ठेवलं नव्हतं ज्यात "घारुअण्णा" नाहीत...... Lol
थोडक्यात आज घारुअण्णा, मुन्नी आणि शीलापेक्षा बदनाम झाले होते.

चिंचोळ्या रस्त्याने पुढे जात जात अखेर गाडी फार्म लाईफ मध्ये पोचली. मध्ये दिसणारा एक ओहोळ हाच बंधारा आहे हे आम्हाला डुआयने सांगितलं , तेंव्हा या बंधार्‍याच्या आठवणी आयुष्यभर राहणार आहेत याची कल्पनाही नव्हती.

आमच्या स्वागताला "लिंबुटिंबू" आपल्या मुलीसह आधीपासून हजर होते. मागोमाग हळूहळू एक एक गाड्या आल्या पुण्याहून. तोपर्यंत नाश्ता चापून झालेला होता. मिसळ पाव, कांदेपोहे, भुर्जीपाव आणि चहा-कॉफी. पोट आणि मन तुडुंब भरलं...... पुढे मन ओव्हरफ्लो होणार होतं याची कुणकुण लागलीच.

पाऊस बहुधा आमची पोचायची वाट पहात होता...... जो काही त्याने कोसळायला सुरूवात केली की ब्बास........ विन्या, यो रॉक्स, रोहित वैभ्या सरळ घुसलेच पावसात आणि मग सुरू झाला एक धमाल धिंगाणा........!!!! उडी मारून काढायचा फोटो असो किंवा चिखलात उड्या सगळे रंगून गेले होते.

पुण्याच्या गाड्या आल्या त्याच बर्थ डे बॉय कौतुक शिरोडकरला घेऊन. कौ, राम, हिम्सकुल, दक्षिणा, मल्ली आणि कुटुंबिय, साजिरा, शुभांगी आणि ज्यु. शुकु, आर्या आणि तिचा मुलगा तनिष्क, सखीप्रिया सगळा कोरम फुल्ल झाला. मग पल्ली आणि कुटुंबिय, निंबुडा, मोदक आणि छोटा राजस सगळेच हजर झाले........
अब देर किस बात की...... चलो स्विमिंग पूल.....!!!!

रेन डान्ससाठी केलेला धबधबा, स्विमिंग पूलमधली दहीहंडी, व्हॉलीबॉल मनसोक्त तासभर घालवला. आता जरा "बंधारा" बघुया अशी टूम निघाली आणि सगळी फलटन बंधार्‍यावर निघाली. गिरी, रोहित, मी आणि वैभ्या आम्ही पुढे निघालो आणि बंधार्‍याच्या भिंतीजवळ पोचलो. मागोमाग कौतुकही आला. कौतुक मला उगाच खाली उतरू नकोस सांगेपर्यंत रोहित पाण्यात उतरला होता, मागोमाग गिरी आणि वैभ्या.... मग मीही न रहावून उतरलोच.
रोहितला क्रॉस करून गिरीविहार आता बंधार्‍याच्या मध्यभागी होता त्याच्या मागे रोहित, नंतर वैभ्या आणि मी. सगळे पाण्याच्या खोलीचा अंदाज घेत होतो. हळूहळू बाकीची मंडळी काठावर जमा झाली. इतक्यात रोहित ओरडला अरे मला धर जरा. मग मी वैभ्याला, वैभ्याने रोहितला धरला आणि तो उचलला जात असताना अक्षरशः त्याची चड्डी पकडून खेचला. पण एवढ्या वेळात गिरी चपलेचा बंद लावायला वाकला आणि कळायच्या आतच बंधार्‍याच्या भिंतीवरून पाण्यासकट खाली गेला..... भिंत ८ ते १० फूट उंच होती म्हणून विशेष वाटलं नाही पण किनार्‍यावरच्या लोकांचे चेहरे आणि हावभाव बघून आम्ही तिघं पाण्याबाहेर आलो. तोपर्यंत गिरी प्रवाहात अडकला होता. पाण्याचा जोर इतका होता की कोणी मधे शिरणे कठीण होते. आता सगळे जरा टेन्स्ड झाले. एव्हाना सगळे जमले आणि हरतर्हेचे साखळी करायचे प्रयत्न झाले पण पाण्याच्या जोरापुढे कोणाचे काही चालेना. मग बांबू, दोर्‍या सगळे आणून झालं आणि मग शेवटी नायलॉनचा दोर वापरून गिरीविहार किनार्‍याला लागला. हुस्श्श......!!!!!
एक थरारक अनुभव. सगळे घाबरलेही होते आणि शेवटी सगळ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन एंजॉयही केले.

"इथूनपुढे कोणत्याहे वविला लोकेशन सिलेक्ट करताना किमान एकतरी "बंधारा" असलाच पाहिजे असा एक ठराव सर्वानुमते पास झाला" Proud Wink
त्याचप्रमाणे याचे फुटेजेस सौ. गिरीविहार यांच्यापर्यंत पोचता कामा नयेत अशी सक्त ताकीद प्रत्येकाला कोपर्‍यात घेऊन देण्यात आली ती वेगळीच. Happy

पुन्हा एकदा स्विमिंग पूलकडे कुकूचकू करण्यात आले आणि मनसोक्त बागडल्यावर स्पिकरवरच्या फर्माईशी गाण्यांवर रेन डान्सचा सिलसिला सुरू झाला........ श्री व सौ पल्ली, श्री व सौ बागुलबुवा आणि सर्व मंडळींनी मनसोक्त डान्स केला....... त्यातला "पिसारा डान्स" लक्षवेधी ठरला. आनंदसुजू नाचतोय म्हटल्यावर कोणाला संधी नाही याची नोंद घेऊन काही महिलांनी आपला एक वेगळाच फेर धरला आणि सरतेशेवटी मूळ प्रवाहात तो सामील केला. संयोजकांची हाक आली आणि सगळी फरड निघाली "स्नेहभोजनाला".

अहाहा......
उसळ, बटाटा भाजी, गरम पोळ्या, कोशिंबीर, लोणचं, पापड, श्रीखंड, जीरा राईस, दाल फ्राय, अळूवडी एकदम झक्कास स्वयंपाक होता....... तुटून पडलो त्याच्यावर.
बरं या सर्व कार्यक्रमात पाऊस कायमच साथीला होता....... हा सर्वात सुखद भाग.

जेवण, दंगामस्ती, आपापले कपडे बदलण्याचे प्रोग्राम हे सर्व झाल्यावर उरलेल्या वेळात आता सांस्कृतिक कार्यक्रम करायचे होते. पहिला अर्धा तास तर गृप ठरवण्यात गेला. "आता गृप ठरले ना, मग आता गेम्स खेळायला पुढच्या वविला या" अशी पिंक कोणीतरी टाकली आणि खसखस पिकली.
हबाने एव्हाना माईकचा ताबा घेतला होता. त्याच्या हातात असला की माईकपण हबकून असतो...
लंगडीचा कार्यक्रम, मग केळे खाण्याची स्पर्धा, गृप पेंटिंग खूप धमाल आली.

लंगडीच्या फायनल राऊंडला आपला डावा हात काटकोनात ठेऊन समोरच्याला आऊट करायचा असा नियम हबाने काढला आणि त्याने धमालच आली. मग डावा हात उजव्या कानाला लावायच्या अ‍ॅक्शनने मी लंगडी घातली आणि मग ती आयडिया सगळ्यांनाच लागू पडली धमाल आली. तुडतुडे पार्टी मध्ये यो रोंक्स आणि वैभ्या बरोबर "पारिजातक"चाही समावेश करायला हवा.

नंतर होती एक अनोखी स्पर्धा ती म्हणजे कमीतकमी वेळात केळं खाणे. आमच्या गृपमधून मी आणि बागेश्री गेलो होतो. समोरासमोरच्या खुर्चीत बसायचं, दोघांचे डोळे बांधलेले आणि एकाने दुसर्‍याला केळं भरवायचं. एकंदर एकमेकांचे तोंड कुठे येतेय याचे अंदाज घेऊन झाले पण डोळे गच्च बांधलेले असल्याने काहीच दिसत नव्हते. खुर्चीतले अंतर वाढवण्यात आलं होतं. तश्यात आम्हाला दोघांनाही केळं आवडत नव्हतं..... आता खाणार कोण हा प्रश्न होता, आणि अर्थातच ते केळं खाण्याची जबाबदारी माझ्यावर आली.
कोणी भरवणार असेल तर मी केळं काय "पडवळ" पण खायला तयार आहे म्हणा Proud Light 1 (हे जरा संबंधितांनी हलकेच घ्यावे.)
मग काही प्लॅन्स आम्ही ठरवले आणि अख्ख केळं सोलून ठेव, एकदा माझ्या तोंडाला केळं लागलं की मी संपवतोच Proud असा प्लॅन ठरला. झालं वेळ सुरू झाली, एका क्षणात एक केळं माझ्या तोंडाजवळ आलं आणि काही सेकंदात ते स्वाहा झालं..... मला आजुबाजुचं काहीच कळत नव्हतं फक्त राम, हिम्सकुल, साजिरा हे अत्यानंदाने ओरडत होते...... केळं संपून वेळ झाला तरी टायमर लावलेला म्हणतोय अरे पटकन खा... आता मला तोंड उघडून दाखवावं लागलं की केळं केव्हाच संपलय. बाकीच्यांची अजून चाचपणीच चालू होती आणि आमचं केळं खाऊन संपलेलं होतं.... पुन्हा धमाल राडा. Happy
थोडक्यात माझा "भुंगा" आयडी बदलून मी "मोगली" घ्यावा का असा एक प्रश्न काही लोकांना पडला होता.

या सगळ्यात संयोजक म्हणून सतत लगबगीने इकडून तिकडे करणारा आपला सर्वांचा लाडका सुधृढ बालक "डुआय" खूपच कष्ट घेताना दिसत होता. अशी लगबग एखाद्या लग्नात करता तर किमान एक दोन आज्या आपल्या नातींचे प्रपोसल घेऊन ह्याच्याकडे नक्की आल्या असत्या. Proud
त्याच्या जोडीला आर्या, राम, हबा, आनंदमैत्री, घारुअण्णा सगळेच जीव तोडून काम करत होते.

एकंदर फुल टू धमाल...... तिथे फोनला रेंज नव्हती हे सर्वांसाठीच सुखाचे होते.....

रिसोर्टच्या मालकांचे आभार मानून सर्वांना भेट म्हणून दिलेली रोपटी घेऊन सगळी गँग परतीच्या वाटेला निघाली. पुणेकरांना बाय करून सगळे मुंबईकर बसमध्ये बसले आणि पुन्हा सुरू झाला सांगितीक प्रवास.

आता पहिल्या गाण्यात दारू असलीच पाहिजे अशी गळ संयोजकांनीच आनंदसुजूंना घातली.... आणि भर संध्याकाळी आनंदसुजूचा चेहरा फुललेल्या सूर्यफुलासारखा झाला Happy आणि त्यानंतर मुलुंड येईपर्यंत पुन्हा एकदा धमाल धमाल आणि फक्त धमाल..... आता इतरही नवे चेहरे गाणी म्हणायला सामील झालेले होते. आयडी नसलेल्यांना आयडी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

पुन्हा एकदा चौक फाटा, पुन्हा तेच ते "एकीचे बळ".... Proud
चहापान, स्प्राईटचे घोट आणि पुन्हा मुंबईकडे कूच. मुलुंडला सगळ्यांना अलविदा करत आमची स्वारी उपनगराकडे वळली. एक एक करत सगळेच उतरत होते. ठीक १०.४५ ला सगळ्या उरलेल्या आयडींना बाय बाय करत मी आरेच्या पेट्रोल पंपवर उतरलो...........
वविने मनावर प्रचंड गारुड केलेले होते.........
हँगओव्हर हँगओव्हर हँगओव्हर....!!!!!!!!!!

*****************************************************
सगळा हिशोब मांडताना पुन्हा पहाट झाली. उठून तोंड धुवायला गेलो. आरश्यात कौतुक नाही मीच दिसत होतो, चहा घ्यायला हॉलमधे आलो..... समोर आई...... ती चक्क "अश्विनी के" सारखी दिसत नव्हती.
ऑफिसला निघताना खालचा वॉचमन "गिरीविहार" नव्हता..........

गाडीने ऑफिसला पोचलो. चहावाला पोर्‍या आला तेंव्हा बघतो तर काय.... अरे हा आपला "मल्लीनाथ"......

ओह्ह्ह नो.... नॉट अगेन......... पुन्हा वविचा हँगओव्हर..........!!!!! Uhoh

अरे आता दिवसभर काम कोण करणार.......!!!
कलिगकडे सहज बघितले तर "विनय भिडे" माझ्याकडे बघून हसत होता......... !!!!!

ओ छड यार....!!!! काम तो चलता रहेगा........ येतायत आठवणी तर येऊ देत की....... Happy

अजुनही तोच हँगओव्हर कायम आहे.... आणि तो पुढच्या वविपर्यंत रहावा हीच ईच्छा आहे मनापासून.

या सर्व सुखद अनुभवासाठी मायबोली आणि सर्व संयोजकांचे मनापासून आभार.

तळटीपः सर्वसमावेशक वृत्तांत असावा म्हणून सगळ्या आयडींचा उल्लेख केलेला आहे, कोणी राहात असेल तर प्लीज कळवा. ईतक्या सुखद आठवणीतून आपण राहून गेलो असं कोणाला वाटायला नको.

गुलमोहर: 

कडक

भुंग्या, सह्हीच रे!!!! Happy

सुपर्ब वृतांत. खुपच आवडला.

पेट्रोल भरणारा पोर्‍या, पानवाला, सिगारेट शिलगावणारा पोरगा, पान मागणारा गोल गरगरीत देह, रिक्षावाला, धोतरातला भैया, दरवाजा उघडल्यावर दिसणारी आई, हट्टाकट्टा वॉचमन, बहीण, छोटी छोकरी, आरश्यातला तू, चहावाला पोर्‍या, तुझा कलिग हे सगळे कॅरेक्टर जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहिले. Proud

भुंगा.. खासच यार !!! एकदम रिपीट टेलिकास्ट झाले.. गप्पाटप्पा इतक्या झाल्यात की सगळे शब्दांकन करणे कठीण आहे.. त्या बाफ चे काय झाले.. 'गिरीविहार' बदली दुसरा आयडी असता तर... Proud होउन जाउदे.. ! Wink

बाकी वविच्या आदल्या रात्री विन्या नाही म्हणून मला उत्साहच नव्हता.. वेस्टर्नसाइडच्यांना पिकअप करण्याच्या जबाबदारीचे टेंशन नव्हते.. ! पण विन्या नाही म्हणून निराश होतो.. काय करणार.. गेली सलग सहा वर्षे आनंदमैत्री व आनंदसुजू या जोडीची गाणी वविच्या प्रवासात एंजॉय करत आलोय.. पण यांच्याजोडीला कडक आवाजात गायला विन्या हवाच.. जो गेली सलग तीन वर्षे आम्हाला लावणी ऐकवतो.. Happy मग कसे धम्माल गायकांचा कोरम पुर्ण झाल्यासारखा वाटतो.. मालकांनी पहाटेच फोन करुन कळवले मीपण आहे रे... नि खरच माझ्यात जान आली.. Happy या तिन्ही दोस्तांना हॅटस ऑफ !

त्या बाफ चे काय झाले.. 'गिरीविहार' बदली दुसरा आयडी असता तर... होउन जाउदे.. >>>>खरंच, होऊन जाऊ देच Happy :वाट पाहणारा बाहुला: Wink

झक्कास!
<< त्या बाफ चे काय झाले.. 'गिरीविहार' बदली दुसरा आयडी असता तर... >> मीही :वाट पाहणारा बाहुला: Happy

जहबहरी... सगळ्या आयडी सकट म्हणजे जरा जास्तच होतय... आणि तू १० सेकंदात केळं खाल्लंस ते कसं काय विसरलास लिहायचं...

माझा वविचा हँगओव्हर अजूनही तसाच आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. आणि तो पुढच्या वविपर्यंत नक्की टिकेल्. मस्तच लिहिलंयस.. सहीच.... धन्यवाद!

भुंगा, वृत्तांतात तुझ्याही खास शैलीचं वेगळेपण जाणवलंस रे मित्रा. एकंदरीत धम्माल फुल्टू झक्कास मांडलीस. आवडला वृत्तांत. जियो !

मिल्या अप्रतिम वर्णन... वविचं... Happy
आज ऑफिसला (चुकून) वेळेत पोहोचले आणि नविन लेखनात हा धागा दिसल्यावर आधी वाचून काढला..:)

चाबुक परफॉर्मस..... तोडलस, फोडलस, कुटुन काढलस, चुरा केलास मित्रा Proud
अगोदर मलाही खरं वाटलं की खरच पेट्रोल पंपवर जिप्स्या होता की काय Proud हॅंगओव्हर हँगओव्हर हँगओव्हर.........!!!!!!

.

मस्त लिहीलय Happy झकास
तो गिरीविहार च्या ऐवजी दुसरा कोण अस्ता तर काय हा बीबी काढाच
शिवाय गिरीविहार करता (तिथेच कुणीतरी सुचविल्याप्रमाणे) नविन पदवीदानही करा Proud

(तिथेच कुणीतरी सुचविल्याप्रमाणे) नविन पदवीदानही करा>>>>>:हहगलो:

तो "कुणीतरी" मीच होतो Proud Wink

आणि तो धागा आजच्या दिवसात येईलच...... काही आयड्यांचे लिहून झालेले आहे, इतरांवर वेळ मिळताच विचार करून लिहिण्यात येईल..... थोडी कळ सोसावी ही विनंती. Happy

. काही आयड्यांचे लिहून झालेले आहे, इतरांवर वेळ मिळताच विचार करून लिहिण्यात येईल.>>>>>>>>>>>>> ती काळजी इतर माबोकर घेतील तु प्रदर्शित कर

Pages