एका कथेची कहाणी !

Submitted by कवठीचाफा on 27 July, 2011 - 10:01

ही कथा वाचायच्या आधी जर तुम्ही http://www.maayboli.com/node/27497 (अशीही प्रित ! ) वाचली असेल तर तुमचा कमी गोंधळ होईल.
****************

" ही स्मिताली कोण रे ? " संशयाने ओतप्रात भरलेल्या आवाजात सौ. ने विचारलं.

आता हा प्रश्न येण्याच्या मागे जे काही रामायण घडून गेलं ते थोडं तरी सांगावं लागेलंच.

त्या दिवशी काही लोकांच्या मते मला एस.एम.एस. फिव्हर झाला होता, म्हणजे झालं नेमकं काय की माझ्या नेटवर्कने नेहमीप्रमाणे चुकुन माझ्या मोबाईलवर एस्.एम्.एस. पॅक अ‍ॅक्टीव्हेट केलेला आणि तो ही नेमका पंधरा दिवसांच्या मुदतीचा, आता गेलेला पैसा परत येणार नाही याची खात्री असल्याने मी हाताला लागतील तेवढे एस्.एम्.एस. मित्रमंडळींना पोच करायला सुरुवात केली. हा सगळा उद्योग घरात बसुनच चालु असल्याने सौ.च्या चाणाक्ष नजरेतुन ते सुटलं नव्हतंच. त्यात मी नेहमी प्रमाणे ऑफलाईन न लिहीता नवीन कथा थेट ऑनलाईन लिहायला सुरुवात केलेली, संशय बळावला नसता तरच नवल.
" मी काय विचारतेय ? ही स्मिताली कोण ? " मघापेक्षा चढेल आवाजात आलेल्या तीच्या या प्रश्नाने माझी तंद्री भंगली ती डाव्या हाताला ठेवलेल्या कॉफीच्या कपासकट.
" माझ्या कथेतलं पात्र आहे " मी भाबडेपणे म्हणालो
" आणि तु त्या पात्राला प्रेमपत्र लिहीतोयस ?" आई गं ! केवढा हा उपहास.
" प्रेमपत्र ? अगं कसं शक्य आहे ? इमेलमधुन मराठीत प्रेमपत्र पाठवण्याइतपत मी तयार झालो नाहीये अजुन " बचावात्मक पवित्रा.
" का ? मायबोलीच्या संपर्कातुन नाही लिहीता येत ?" अरे देवा ! ही पण मायबोलीकरीण आहे हे विसरलोच की.
"तसं नाहीये गं ! ही बघ कथा लिहीतोय " माउसच्या मानगुटीला धरुन गरागरा पानावर फिरवत त्याला गुलमोहोरावर आपटत मी म्हणालो.
" नक्की का ?" संशय अजुन सरला नव्हता,
" आता दिसतय ना समोर ?"
" नाही, मागे एकदा ऑफीसची मराठी प्रिंट तु इथेच लिहुन काढलेलीस ना ?" हीचा मेंदु आठवणीबद्दल आइनस्टाईनचा बाप आहे.
" अगं बाई! नाही तसलं काही, वाटल्यास विशालला विचार ".......
आता इथे विशालचा काय संबंध असं वाटत असेल तर सांगतो, त्या एस.एम्.एस. पाउस नंतर काही निवडक एस्.एम्.एस. माझ्यात आणि विशालमधे झाले म्हणजे `नविन काय लिहीतोयस ?' वगैरे वगैरे, त्यामुळे मी असली काही प्रेमकथा लिहीणार आहे हे विशालला माहीत होतं म्हणुन म्हंटल त्याचीच साक्ष काढावी. विशालचा नंबर डायलही केला होता, पण नाही.. थांबलो,
विचार केला, आयला जर या ट्वीस्ट मास्टरच्या डोक्यात काहीतरी भन्नाट चमकलं तर हा माझ्याच्य आयुष्याला वेगळं वळण लावायचा आणि वर क्रमशः म्हणुन सटकायचा, नकोच ते.
शेवटी कथा काय असेल वगैरे असं व्यवस्थीत समजावल्यावर तीच्या मनातला संशय कमी झाल्यासारखा वाटला खरा.
" पण काय रे? ते तुफान पाउस वगैरे हे तर आजचंच वर्णन आहे ना ? तु ही लवकर आलायस आज. " मी कळवळून तिच्याकडे पाहीलं, म्हणुनच म्हणालो होतो की संशय कमी झाल्यासारखा वाटला खात्री नव्हे.
" आता जसं सुचलं तसं लिहीलं त्यात माझी काय चुक ? आणि एक आधी तुझा चष्मा घेउन ये नाहीतर उगीच काहीतरी चुकीचं वाचशील " मी मनापासुन म्हणालो. यात काही खोटं नाही, हीच्या बाबांना सगळे नाना म्हणतात म्हणुन मी हीच्या आईचे नामकरण नानी करुन टाकलेलं ते ही लग्नानंतर लगेचच. तर एकदा नानींचा फोन माझ्या मोबाईलवर आला आणि मी बाहेर सोफ्यावर तंगड्या पसरुन वाचत बसलेलो. ही आतुनच ओरडत आली,
" ही मनी कोण रे ?" डोळ्यावर चष्मा नसला की ही असा ना चा म करु शकते म्हणुन खबरदारी.

या सगळ्या प्रकारात माझ्या कथेच्या पहील्याच भागात चक्काजाम झालं. काही केल्या कथा पुढे सरकेच ना ! मग शेवटी मीच एक जालिम उपाय शोधुन काढला,
"बस आता इथेच माझ्या बाजुला" दोन फुटांवर खुर्ची सरकावत म्हणालो. माझा एक प्रॉब्लेम आहे जर मी लिहीत असलो आणि कुणी माझ्या खांद्यावरुन डोकाउन पहात असलं तर मला आजिबात लिहीता येत नाही हे तीलाही माहीताय म्हणुन ती शांतच राहीली.
"आता एक काम कर, मला पत्र लिहायला मदत कर, मी कधी आयुष्यात कुणाला प्रेमपत्र लिहीली नाहीयेत" हे मी मनापासुन सांगतोय
"मग काय मी रोजची हजारी पुर्ण करत होते की काय?" आईशपथ माझ्या बोलण्याचा हा अर्थ निघु शकत असेल असं मलाही वाटलं नव्हतं.
"बरं आपणच एकमेकांना पत्र लिहीतोय असं समजुन चालु बोल काय लिहु ?"
" डियर.." च्यायला हे असं ?
" तु लिहीत होतास ना ? तसंच लिही ना मग ! नाहीतर माझ्याकडे मदत नको मागुस "
" अगं विषय वेगळा आहे म्हणुन म्हणतोय"
" लेखकानं कसं चतुरस्त्र असावं ( म्हणजे काय ते कुणीतरी मला कळवा ) तुझ्या भयकथा लिहीताना काय आजुबाजुला मांत्रीक घेउन बसतोस की भुतं ?"
" बहुतेक भुतं असवीत, असा माझ्या बर्‍याच मित्रांना दाट संशय आहे" वाद वाढत चालला
पण अश्या किरकोळ वादानंतर एकदाचं तीनं मला मदत करायचं मान्य केल खरं, पण ते ही तीला त्यात मजा वाटली म्हणुन.

गाडं दोन पत्रांपर्यंत ठिक चाललं पण पुढे जशी भावोत्कट भाषा हवी तशी काही केल्या सुचेना ! एखाद्या संगणकीय किचकटाबद्दल विचारलं असतं तर तीची वाणी भरभरुन वाहीली असती. तेही कमी पडलं असतं तर एखाद्या संस्कॄत वचनाचा अर्थ विचारला असता तरी तेच. आधी मला हा प्रश्न पडतो की ही जर संस्कृतातली इतकी हौशी होती तर संगणक हा विषय निवडलाच का ? पण ते प्रश्न वेगळे आहेत.
कथेचा घोळ सुरुच राहीला.
मग एखादा प्रसंग शोधायचा आणि त्यावर आपल्या काय प्रतिक्रीया होत्या त्या उलगडायच्या असल्या विचीत्र मार्गानं आमचा हा प्रवास चाललेला. पण.......
.
गोंधळ अजुन संपायचे होतेच

मुळ कथेत बरेच भाग गाळलेत, गाळावेच लागले कारण आम्ही आपले आमच्या लग्नाआधीच्या कल्पनाविश्वात इतके रमलेलो की जे काही लिहीत गेलो ते पुन्हा वाचताना मलाच घाम फुटला. तरीही एक उल्लेख म्हणुनच सांगायचं तर, एका पत्रात ` तुझ्या पायातल्या पैंजणांची नाजुक छनछन मला माझ्या ह्दयाच्या ठोक्यांपेक्षा जास्त अनमोल आहे. तुझ्या मांडीवर विसावलेल्या माझ्या डोक्यावरच्या केसांतुन फिरणारा तुझ्या हातांचा मोरपंखी स्पर्श मला आत्ताही जाणवतोय,' असा उल्लेख आहे तिथे एक अ‍ॅडीशन होती ` तुझ्या मुलायम ओठांचे चुंबन घेताना उठलेले रोमांच मला अजुनही जाणवतायत' अशी.
मी इथपर्यंत लिहीलेलं आणि पुढे लिहीताना अडकलो म्हणुन मी तीला विचारलं
" आशु, मी तुझं चुंबन घेतल्यावर पुढे काय गं ?" मी माझ्या खणखणीत आवाजात हा प्रश्न उच्चारायला आणि घराचा दरवाजा उघडून शेजारच्या वहीनी आत यायला एकच गाठ पडली.
" इश्शSS, " वहीनी नको इतकं लाजुन पुन्हा दरवाजा बंद करुन परत गेल्या.
" काय रे, तु पण ना ... " डोळे मोठ्ठे मोठ्ठे करत ती ही लाजली, अर्थात ते त्या वहीनींच्या परत जाण्यावरुन.
ते ही खरंच होतं म्हणा आता या आख्ख्या सोसायटीत सांगत फिरतील की `या नवरा बायकोला काळवेळेचं काही बंधनच नाही म्हणुन'

हा एक नाजुकसा अपवाद वगळता एकुण आमचं स्नेहलेखन चांगल चाललेल पण पुन्हा एकदा गाडी विरहाच्या स्टेशनात थांबलेली. मला इथे नेमकं काय लिहावं हेच सुचत नव्हतं आणि सौ. ची पाटी कोरीच,
" अरे, पण मी माहेरी गेल्यावर तुला कसं वाटतं तसा विचार करुन बघ की " ती उवाच.
आता मला एक सांगा बायको माहेरी गेली की नवर्‍याला कसं वाटतं याचं खरं उत्तर किमान बायकोला तरी कुठला नवरा देईल का ?
" तसं नको, आपण आपली कल्पनाच केलेली बरी " मी आपला हात झटकुन मोकळा झालो.
" तु सांगतेस तुला कसं वाटतं ते ? " वरुन मी पुष्टी जोडली
" असं, असं म्हणजे अं...." गाडी अडकली
" असं लिही ना ! तेरे बीना जिंदगीसे कोई शिकवां तो नही," दुसरा पर्याय सुचवला
" हिंदी गाणं ? ते ही मायबोलीवरच्या कथेत ? अगं ही काय गीतमाला वाटली की काय ?" मला नाहीच पटलं
यावर मग बरीच खलबतं झाल्यावर काहीसा मजकुर पडला एकदाचा कथेत.
" तु एखादा शेर लिही ना ! " तीनं योग्यच कल्पना मांडली पण महत्वाचा मुद्दा हा की शेर, मग तो जंगलातला असो की मुशायर्‍यातला माझं आणि त्याचं जमत नाही, म्हणजे शेर ऐकायला बरे वाटतात पण ती इतकी अवजड भाषा ऐकुन माझा इवलासा जीव दडपुन जातो. त्यामुळे शेरही बाद झाला, आणि याचाच शेवट म्हणुन त्यात कविता पडली.

असं काहीबाही होतं एकदाची कथा शेवटापर्यंत आली आणि मी तीला म्हणालो
"आता तु जा, मी पहातो शेवट कसा करायचा ते "
" नको SS मी नाही जात, नाहीतर शेवटी तु तीला मारुन टाकशील" कळवळुन सौं म्हणाली, तसं तीचं मन हळवं आहे कथेतल्या पात्राचाही शेवट तीला वाचवत नाही म्हणुन बर्‍याच कादंबर्‍या ती अर्धवट वाचुन टाकत असावी.
पण तीच्या शेवट्च्या वाक्याचा एकच परीणाम झाला तो म्हणजे मघापासुन आपल्या खोलीत शांतपणे वाचत असलेल्या माझ्या आईचा गैरसमज झाला की मी एखादी पाल वगैरे मारुन टाकतोय की काय !
" मारु नको रे तीला, शेवटी काही झालं तरी एक मुका जीव आहे तो, सोड तीला घरबाहेर आधी ! " बाहेर नक्की काय चाललय हे जाणुन घेण्याचा प्रयत्नही न करता माझी पक्की अहींसावादी आई म्हणाली.

मोठ्या मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत एकदाची माझी अर्धांगीनी पुन्हा आपल्या कार्यक्षेत्रात परतली.
मी ही मला हवा तसाच कथेचा शेवट केला,

पण काही असो, त्या कथेनं मात्र माझ्या आयुष्यातली एक संध्याकाळ अविस्मरणीय केलीच.
.
.
.
.
.
.

गुलमोहर: 

<<<" लेखकानं कसं चतुरस्त्र असावं ( म्हणजे काय ते कुणीतरी मला कळवा ) तुझ्या भयकथा लिहीताना काय आजुबाजुला मांत्रीक घेउन बसतोस की भुतं ?">>>
Happy

आयला जर या ट्वीस्ट मास्टरच्या डोक्यात काहीतरी भन्नाट चमकलं तर हा माझ्याच्य आयुष्याला वेगळं वळण लावायचा आणि वर क्रमशः म्हणुन सटकायचा, नकोच ते.>>>>>>>>>>>> Rofl

" ही मनी कोण रे ?" >>> Lol

" लेखकानं कसं चतुरस्त्र असावं ( म्हणजे काय ते कुणीतरी मला कळवा ) तुझ्या भयकथा लिहीताना काय आजुबाजुला मांत्रीक घेउन बसतोस की भुतं ?">>>> Rofl

मी एखादी पाल वगैरे मारुन टाकतोय की काय !>>>>>>>> Rofl

मुळात ही कथा आहे, आणि ती कथा म्हणुनच वाचावी उगीच भलते गैरसमज नकोत>>>>>> Happy

सही.... आवडली कथा Happy

माउसच्या मानगुटीला धरुन गरागरा पानावर फिरवत त्याला गुलमोहोरावर आपटत मी म्हणालो. >> Lol

आयला जर या ट्वीस्ट मास्टरच्या डोक्यात काहीतरी भन्नाट चमकलं तर हा माझ्याच्य आयुष्याला वेगळं वळण लावायचा आणि वर क्रमशः म्हणुन सटकायचा, नकोच ते.
>> Lol

मी ही मला हवा तसाच कथेचा शेवट केला,>> Happy

लेखकानं कसं चतुरस्त्र असावं ( म्हणजे काय ते कुणीतरी मला कळवा ) >>
मला असं वाटतं की, हातात असेल ते (माऊस वगैरे) अस्र म्हणुन वापरता येण्याइतकं तरी चतूर असावं Lol

धन्यवाद मित्रमंडळी,
वाचकांबद्दल किती ती खात्री चाफ्या >>>>> Happy
विशाल, माझा निषेध मलाच परत करतो काय ? Wink
मला असं वाटतं की, हातात असेल ते (माऊस वगैरे) अस्र म्हणुन वापरता येण्याइतकं तरी चतूर असावं >>>>> जुई माउस बिचारा काय करणार ? Happy
आवडली कथा. कल्पित असो वा सत्य >>> तुम्हाला काय वाटते सत्य की कल्पित ? Happy
वाचली कथा म्हणुन आणि गैरसमज झाला >>>>> कसला गैरसमज तृप्ती ?

आता मला एक सांगा बायको माहेरी गेली की नवर्‍याला कसं वाटतं याचं खरं उत्तर किमान बायकोला तरी कुठला नवरा देईल का ?
" तसं नको, आपण आपली कल्पनाच केलेली बरी ">>> :हहपुवा:
बाकीचे पंचेसपण सही..

<" लेखकानं कसं चतुरस्त्र असावं ( म्हणजे काय ते कुणीतरी मला कळवा ) तुझ्या भयकथा लिहीताना काय आजुबाजुला मांत्रीक घेउन बसतोस की भुतं ?">
.
जबरा.....

सही Happy

आयला जर या ट्वीस्ट मास्टरच्या डोक्यात काहीतरी भन्नाट चमकलं तर हा माझ्याच्य आयुष्याला वेगळं वळण लावायचा आणि वर क्रमशः म्हणुन सटकायचा, नकोच ते. >> Rofl

विश्ल्या तुझा 'क्रमश:' काय्यच्च्च्याकाय फेमस आहे रे... Proud

तुझ्या भयकथा लिहीताना काय आजुबाजुला मांत्रीक घेउन बसतोस की भुतं ?" >>> Lol

आता मला एक सांगा बायको माहेरी गेली की नवर्‍याला कसं वाटतं>>> Proud

प्रसंग वर्णन छान केले आहे.

इतकी सुंदर 'रोमँटीक' अ‍ॅडीशन मुळ कथेतुन गहाळ केल्या बद्दल जाहीर निषेध.
आणि हो.....पात्राचे नाव काय्य्य्य्य्च्च्याक्क्क्क्काय्य्य आवडले Wink Happy

Sad चाफ्या, तुझ्याकडून जास्तीची अपेक्षा आहे रे. तुझ्या सार्‍या कथा मी वाचल्या आहेत.
आता हे काय लिहित बसलायस? हे काहीच आवडलं नाही अजिबात. मूळ कथाही नाही.

खंडेराव चालायचंच कधी कधी एखादा किडा चावायचाच माणसाला Happy रच्याकने इतकी सौम्य प्रतीक्रीया वाचुन मला चुकल्यासारखं वाटलं राव. माझा जुना कान पकडणारा मित्र कुठाय ??

Pages