लाँग ड्राईव्ह करता गाणी/अ‍ॅलबम्स

Submitted by निराली on 26 July, 2011 - 23:36

हल्ली आपल्या पैकी बरेच जणं कार नी प्रवास करतात. कामा निमित्त, सहली निमित्त, सुट्टीत वेळ मिळाला कि, अगदी वीकेंड ला थोडासा जरी वेळ असला तरी आपण गाडी काढून जवळ पास कुठे तरी प्रवासा ला जातो.
पावसाळ्या साऱखं रोमँटिक कारण असेल तर घरात बसणं म्हणजे महापाप. तेंव्हा तर जायलाच हवं

अश्या वेळेस प्रवासाची तयारी करताना, पैसे/क्रेडिट कार्ड, कॅमेरा बरोबर अजून एका गोष्टी ची भर पडते ती म्हणजे आपल्या आवडत्या गाण्याच्या सीडी ज ची. नवी/ जुनी, उडत्या चालीची, गझल्स, दर्दभरी,
स्लो साँग्स, डँस बीट असलेली, आयटम साँग्स, आणी रोमॅन्टिक साँग्स.:)

काहीं ना नाट्यगीते आणी क्लासिकल आवडतं, काही इन्स्ट्रुमेंट्ल ऐकतात, आणी काही जणं फक्त वेस्टर्न म्युझिक. भक्ती गीते, भजनं हे पण कलेक्शन मधे असतं.

माझ्या कडे एक सी डी आहे,"sounds of nature "म्हणून, त्यात फक्त समुद्राचा धीर गंभीर आवाज, वार्‍याचा शीळ घालणारा आवाज, पावसांच्या सरीचा आवाज,धबधब्याचा खळाळता आवाज, जंगलातल्या पक्षांचे आवाज, असे आहेत आणी ती सीडी ऐकत ड्राईव्ह करताना आपण इतके तल्लीन होउन जातो कि असं वाटतं कि खरचं आपण पावसातून गाडी चालवतोय.

काही जणं स्वताचे कलेक्शन फक्त आवडीच्या सिंगर्सचेच करतात. काही मूव्हीझ प्रमाणे.

पण दुकानात सीडी विकत घ्यायला जेंव्हा आपण जातो तेंव्हा प्रत्येक कव्हर मागे डोळे ताणून ती गाण्याची लिस्ट वाचणे हा एक भयानक प्रकार अगदी नको वाटतो. पुष्कळ वेळेस हे पण लक्षात येतं कि एका अ‍ॅल्बम मधे आपल्याला आवडणारी एखाद दोनच गाणी आहेत, बाकी सगळं न ऐकणेबल.
अश्या वेळी तर जाम वैताग तर येतोच पण त्या बरोबर ड्रायव्हिंग चा मूड पण जातो.
(एखादे वेळी बरोबर कंपनी नसली तरी चालेल, पण छान छान गाणी ही हवीतच.

तर अश्या गाण्याचे कलेक्शन एका ठिकाणी केलं तर प्रवासाला निघताना गडबड होणार नाही.

आवडती गाणी देताना त्या गाण्याची पहिली ओळ, गायक, (मूव्ही मधलं असेल तर त्या मूव्ही च नाव) आणी गाण्याचा कोणता प्रकार आहे उदा. गझल, सॅड साँग असं

जर खूप गाणी जमली तर मी ती इंडेक्स प्रमाणे पहिल्या पानावर च्या मजकूरात ठेवीन म्हणजे सापडायला सोप्पी जातील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages