विषण्ण..

Submitted by सुलेखा on 24 July, 2011 - 14:10

नुकतीच घडलेली ही एक हृदयविदारक सत्य घटना आहे..एका आनंदी घराचे सगळेच वासे जमीनदोस्त झाले आहेत.आपल्यातल्याच एका मध्यमवर्गीय कुटुंब प्रमुखावर कोसळलेला प्रसंग आहे हा. व्यक्तिगत ओळख नाही माझी.पण वर्तमानपत्रात बातमी वाचल्यापासुन अस्वस्थता जाणवते आहे.
आश्लेषा लहानपणापासुन हुशार,हरहुन्नरी एकुलती एक मुलगी.इंदोरला इंजिनियरिंग चे पहिले वर्ष होस्टल मधे राहुन पुर्ण झाले.जेवणाचे तन्त्र जमले नाही त्यामुळे आजारी झाली.म्हणुन महिन्याभरापुर्वी एका संभ्रांत कॉलनीत एक महिन्यापुर्वी भाडयाचे घर घेतले..तिथे आईसौ मेघा देशपांडे व आश्लेषादोघीच रहात होत्या.श्री देशपांड्यांची बँकेतली फिरतीची नोकरी त्यामुळे ते इंदोर बाहेर होते..अजुन घर ही नीटसे लागले नव्हते..मेघा देशपांडेंची आई नातीला व मुलीला भेटायला देवास हुन त्यांच्याकडे आली होती..
सौ मेघा देशपांडे ओरिफ्लमे च्या कंन्सल्टंट होत्या.या संदर्भात कामानिमित्त त्या एका मॉलमधे असलेल्या ओरिफ्लेम च्या ऑफिस मधे जायच्या.गळ्यात सोन्याचे ठसठशीत मंगळसुत्र,बांगड्या नीटनेटके रहाणीमान्,प्रसन्न व्यक्तिमत्व हे सगळे त्या ऑफिस शेजारी असलेल्या एका स्पा मधे काम करणार्‍या २२ वर्षाच्या नेहा च्या लक्षात आले..तिने मेघाशी ओळख करुन घेतली व ओरिफ्लेम ची कंसल्टंट होण्याची इच्छा दर्शविली.मोबाइल नंबरची देवाण-घेवाण झाली..अर्थात पुन्हा घरी भेटण्याचेही ठरले..
नेहा अगदीच साधारण घरातली बी.कॉम करणारी इंग्रजी बोलता येणारी 'हाय' सोसायटीची स्वप्न पहाणारी अतिमहत्वाकांक्षी मुलगी.राहुल नांवाच्या शिक्षण,नोकरी,घर,कौटुंबिक स्थिरता-पत काहीही नसलेल्या दोनदा तुरुंगात जाउन आलेल्या मुलावर दिड वर्षापासुन प्रेम करत होती.दोघांनी लग्न करायचे ठरवले होते.त्यासाठी खुप पैसे मिळवायचे होते.त्यासाठी काही बेत [??]आखुन ठेवले होते..मेघा देशपांडेला लुबाडण्याचा बेत त्यानी ठरवला..या कामात राहुलचा मित्र मनोज याची सक्रिय मदत घेतली.
ठरवल्याप्रमाणे दुपारच्या वेळेस नेहाने मेघा देशपांडे यांना आपण ओरिफ्लेम च्या कंन्सल्टंसीसाठीचे फॉर्म भरण्यासाठी त्यांच्या घरी येत आहे असे मोबाईल वर कळवले.मद्यधुंद अवस्थेतील राहुल व मनोज [पिस्टन व चाकु सह]बरोबर नेहा त्यांच्या घरी स्कुटी व बाईक वर पोहोचली. नेहाने कॉलबेल वाजवली तेव्हा राहुल्,मनोज आडोशाला उभे होते..मेघा देशपांडेनी दार उघडताच राहुल ने पुढे होउन मेघाच्या कपाळावर पिस्टन ने गोळ्या झाडल्या.त्या खाली पडल्या.आवाज ऐकुन आतुन मेघाच्या आई आल्या तर त्यांच्यावर दोघानी चाकुचे असंख्य वार केले.तेवढ्यात आश्लेषा आतल्या खोलीतुन आरडाओरडा ऐकुन बाहेर आली..आई-आजीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले आणि ती दोघा नराधमांशी जीवाच्या आकांताने लढली..राहुलने तिच्यावर रोखलले पिस्टन वळवण्यात ती यशस्वी झाली..पिस्टन मधुन निघालेली गोळी राहुलच्याच पायाला लागली न पिस्टन खाली लांबवर पडले.तेव्हा तिच्यावर चाकुने असंख्य वार करण्यात आले..त्याच अवस्थेत तिला कपाटा़जवळ नेवुन त्यात असलेले रोख्,एटीम कार्ड्,कॅमॅरा घेतले.त्या दरम्यान नेहाने दोघींच्या अंगावरचे दागिने,३ मोबाईल ,पर्स मधील रोख पैसे गोळा केले.व चाकु,पिस्टन तिथेच सोडुन तिघेही आपापल्या गाडयांवरुन पळुन गेले..
दुपारच्या वेळेस भर वस्तीत घडलेली घटना.पण शेजारी व खाली रहाणार्‍या घर मालकांना काही सुद्धा कळले नाही.पोलिसांच्या अथक प्रयत्नाने दोन दिवसांत नेहा,राहुल्,मनोज पकडले गेले.त्याना योग्य शिक्षा होईलच.पण निरपराध आश्लेषा,मेघा आणि त्यांच्या आई या जगातुन कायमच्या गेल्या आहेत.आश्लेषाच्या वडीलांचे सांत्वन कसे,कोणत्या शब्दात करायचे?

गुलमोहर: 

वाचून वाईट वाटलं. या नालायकांनी तिघींनाही मारलं हे वाचून संताप आला.

>>> राहुल नांवाच्या शिक्षण,नोकरी,घर,कौटुंबिक स्थिरता-पत काहीही नसलेल्या दोनदा तुरुंगात जाउन आलेल्या मुलावर दिड वर्षापासुन प्रेम करत होती.

दोनदा तुरुंगात जाऊन आलेला म्हणजे हा राहुल मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असणार. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या, दारू पिणार्‍या व शिक्षण, घर, नोकरी, करिअर इ. काहिही नसलेल्या मुलावर त्या नेहाला प्रेम करावंसं वाटलं तरी कसं?

मला ह्या मूर्ख मुलीच्या विचारसरणीचीच कीव आली. त्याच्या संगतीने आता तीही तुरूंगात जाऊन पडली. वाईट संगतीचे परिणाम वाईटच होतात.

बापरे!!!आता ह्याला काय म्हणायच?destiny? karma? past life?

कुणाच्या अध्यात मध्यात नसणारे लोकं हे. असं का व्हाव?

Sad दुर्दैवीच दुसरे काय!! यावरुन एक बोध आपण घ्यावा तो म्हणजे अनोळखी व्यक्तिला फक्त सार्वजनिक जागीच भेटावे. उगाच सार्‍या दुनियेशी मैत्री करायला जायची काही गरज नाही. त्या मुलीला मेघा अगदीच जुजबी ओळखत होत्या पण भोळा विश्वास ठेवुन घरी बोलावले. दुर्दैवी आहेच..

मास्तुरेंच्या प्रतिसादाशी सहमत.

माझे बाबा ज्या कोलनीत रहातात त्याचा जवळच हा प्रकार घडला. ही गोश्ट मी त्यन्न्चाकडुन ऐकलेली आहे. खुपच भयानक होत हे.

खरच भयंकर ..पण यातुन बोध घ्यायलाच हवा.....सतर्कता..खबरादारी..बाळगायलाच हवी.... विश्वास यावर परत एकदा प्रश्न चिन्ह ??????