आदरांजली....

Submitted by के अंजली on 23 July, 2011 - 00:36

प्रसिध्द गजलाकार श्री सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे निधन..

वर्तमानपत्रात आज बातमी वाचली आणि मन काही वर्ष मागे गेले..

वाडीयामध्ये असताना आम्हांला प्राणीशास्त्राला नाडकर्णी सर होते.. अतिशय ऋजू व्यक्तिमत्व असलेले सर त्यांचा विषय अतिशय सोप्या पध्दतीने शिकवत.
वागण्याबोलण्यात कुठेही ताठा नसायचा. बोलतानाही हळू आवाजात बोलणं होतं त्यांच.
शिकवता शिकवता ते फॅन खाली उभे रहायचे तेंव्हा त्यांच्या डोक्यावरचे पांढरे केस भुरुभुरु उडायचे..
आम्हां विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर होते ते..

त्यांचा गजलांवरही अभ्यास होता हे मला नंतर सकाळ वृत्तपत्रांतल्या लेखावरुन समजले. आणि हळूहळू तेही नित्यनेमाने वाचायची सवय झाली होती..

अशा माझ्या प्राध्यापकांना विनम्र आदरांजली........

गुलमोहर: 

पृथ्वीवरचा माणुस उपराच ही दै.सकाळ मधे गाजलेली लेखमाला मी मनापासुन वाचली होती.

मी कुस्त्रो वाडियात होतो पण नौरोजी वाडीयात ते शिकवत होते हे आजच समजले.

विवीध विषयात रस असलेले अनेक लोक असतात. सुरेशचंद्र नाडकर्णी प्राणिशास्त्राचे प्रोफेसर, त्यांचा गझल विषयावरचा अभ्यास व स्वतः गझलकार आणि त्यांची ऐतीहासिक लेखमाला हे काँबिनेशन जरा विरळाच.

भावपुर्ण श्रध्दांजली.

त्यांचा गझल विषयावरचा अभ्यास व स्वतः गझलकार आणि त्यांची ऐतीहासिक लेखमाला हे काँबिनेशन जरा विरळाच.>> खरयं नितीनचंद्र.