पाऊस

Submitted by चाऊ on 17 July, 2011 - 01:51

पाऊस म्हणजे नुस्तच पाणी नव्हे
डबक्यातल्या बेडकांची गाणी नव्हे
पाऊस म्हणजे असते जीवन
आभाळभर सावळे घन
पाऊस म्हणजे गोड गारवा
तुषार, थेंबांचा लाघट शिरवा
पाऊस म्हणजे नवोन्मेश
सार्‍या सृष्टीला करतो हिरवा
पाऊस म्हणजे बरंच काही असतं
ओल्या पाखरासारखं मन थरथरतं
पाऊस असतो थेंब चातकाचा
भिजलेला हरएक क्षण पूर्ततेचा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

"भिजलेला हरएक क्षण पुर्ततेचा"
..... अगदी बरोबर.
-------------------------------------------------

फक्त 'पूर्ततेचा' असा बदल करणे आवश्यक.