बापू कुटी, सेवाग्राम

Submitted by अजय जवादे on 16 July, 2011 - 04:16

बापू कुटी, सेवाग्रामचे काही फोटोज.

प्रार्थना स्थळ

बापू कुटी

बापू कुटी प्रवेश द्वार

गांधिजींची अभ्यासाची रुम

साप पकडण्यासाठी चिमटा आणी पेटी.

गांधीजींचे कार्यालय

प्रार्थना स्थळ आणी बा-कुटी

बा-कुटी

बा-कुटी दरवाजा

गुलमोहर: 

फोटो छान काढले आहेस अजय. कवडसेवाला मस्त आहे, अजून कवडसे हवे होते ना? Happy आणि कवडसेवाल्याच्या फोटोच्या वरचा आहे, तोही मस्त आहे, भिंतीलगत खिडकीचा.

पण जो काही साधेपणा दिसतो आहे, तो अगदी डिझाइनर साधेपणा वाटतो आहे हे वै मत.

खूप छान अजय

महिनाभरापूर्वी टीव्ही वर पाहीलं होतं सेवाग्रामच्या दुरवस्थेबद्दल आणि व्यवस्थापनातील भांडणांबद्दल.. वाईट वाटतं. एका महानायकाची ही आठवण असलेला राष्ट्रीय ठेवा आपल्याला नीट जपता येत नाही ..

छान प्र्.चि.बद्दल अभिनंदन व धन्यवाद.
त्या अत्यंत साध्या बापू कुटीरमधे गांधी, नेहरू, सरदार पटेल, शास्त्री इ. मातब्बर मंडळी जमिनीवर पसरलेल्या बैठकीवर बसून [ फक्त मौलाना आझाद पाठीचा त्रास असल्याने स्टूलावर बसत] अत्यंत गंभीर विषयाची चर्चा करत, हे पाहून भारावून जायला होतं.
<< तो अगदी डिझाइनर साधेपणा वाटतो आहे हे वै मत >> असं आतां वाटलं तरी खरं तसं नसावं. माझ्या महितीनुसार प्रथम गांधीजीनी चंद्रपूरच्या पूर्वेला ' मूळ' या गावानजीक यासाठी जागा निश्चित केली होती व तिथं वास्तव्यही सुरूं केलं होतं. पण तिथं रेल्वे किंवा महामार्गाची सोय नसल्याने इतर नेत्यानी गांधीजीना वर्ध्याला वास्तव्य करण्याची गळ घातली. त्यामुळे तिथलं सेवाग्राम थोडंसं नियोजनबद्ध व कांहीशी सौंदर्यदृष्टी ठेऊन झालं असावं. [ 'मूळ' येथील साधा आश्रम मी पूर्वी पाहिला आहे व तो अजूनही कार्यरत असावा असं वाटतं ].

सगळ्यांना धन्यवाद Happy
योगेशः मागे नाही पुढे बाग आहे.
सेवाग्राम माझ जन्मगाव, आजोळ आणि आता सासर असल्यामुळे नेहमी जाण होत. यावेळी वेळात वेळ काढुन धावती भेट दिली.

छान आहेत फोटो.
आता तारा गावच्या युसुफ मेहेर अली सेंटरमध्ये पण कुटी उभारली आहे. त्याचे छत पुर्ण बांबुचे आणि ओंडक्यांचे आहे.