व्यर्थ प्रयत्न हे सुटायचे..

Submitted by जुई on 15 July, 2011 - 05:16

राहून राहून आठवण पुन्हा
वास्तव असह्य तू नसण्याचे..
रमते अशी गुजगोष्टित पुन्हा
भास पुन्हा तुझ्या असण्याचे..

बंधने जाचक, नियम जगाचे
हो, होतेच मला ते पाळायचे..
हळुवार वाहिलेस मैत्र असे की
ना, नव्हतेच तुला ही टाळायचे..

भाव जागले मनी अनेक पण
नव्हते तुला मज सांगायचे..
भावले क्षणभर नाते मला पण
नव्हते खेळ मज मांडायचे..

नको रे मना चक्रे अशी ही
उगाच काहून अडकायचे?
सुगंधी शृंखला, काटेरी जरी ही
व्यर्थ प्रयत्न हे सुटायचे..

गुलमोहर: 

भाव जागले मनी अनेक पण
नव्हते तुला मज सांगायचे..
भावले क्षणभर नाते मला पण
नव्हते खेळ मज मांडायचे..

>>>
एकदम भारी!!
आवडली..

जुई,
तुझी कविता एकदम बहरत आहे!!
अजून खूप खूप लिही..
शुभेच्छा.. Happy

छान? काहून सुटायचे जी? आपल्यासाठी नियम; नियमांसाठी आपण नाही. हृदय तर मुळीच नाही.

Happy हम्म उमेश तुमच पण बरोबर आहे...
पण सोन्याचा असला तरी पिंजरा तो पिंजराच...
सुटकेचा प्रयत्न ही करू नए म्हणता की काय?

नको रे मना चक्रे अशी ही
उगाच काहून अडकायचे?
सुगंधी शृंखला, काटेरी जरी ही
व्यर्थ प्रयत्न हे सुटायचे..

मस्त्...भेदक