मागोवा पुण्याच्या सांस्कृतिक जडणघडणीचा!!

Submitted by वरदा on 14 July, 2011 - 23:40

एकेकाळी पेन्शनरांचं गाव आणि विद्येचं माहेरघर म्हणून सर्वपरिचित असलेल्या पुणे नावाच्या छोट्याशा टुमदार शहराने पानशेतच्या जलप्रलयानंतर कात टाकली आणि केवळ ५० वर्षांत देशातलं एक अग्रगण्य शहर, माहिती तंत्रज्ञान - विविध उद्योग - शिक्षण इ. चे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून आघाडीचं स्थान पटकावलं हा इतिहास अगदी आत्ताचा. तुमच्या आमच्या डोळ्यासमोरचा. पण याआधीही पुण्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. पुण्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत फक्त या इतिहासाचाच नव्हे तर प्राचीन व अर्वाचीन पर्यावरण, इथली भौगोलिक परिस्थिती, इथली शिक्षण आणि संशोधनपरंपरा, कला, साहित्य यांची परंपरा अशा कितितरी गोष्टींचा यात समावेश आहे.

आपल्या सगळ्यांना सर्वसाधारणपणे शिवाजीमहाराज ते पेशवाईचा अंत या चौकटीत बसणारा पुण्याचा झालेला विकास ढोबळमानाने माहित असतो. पण मुळातच पुण्याची वसाहत आणि त्याचा विकास, सांस्कृतिक वाढ हे सगळं कुठल्या तत्कालीन ऐतिहासिक - सामाजिक - राजकीय - आर्थिक - पर्यावरणीय संदर्भात झालं हे क्वचितच माहित असतं. किंबहुना या विषयात आजपर्यंत विविध ज्ञानशाखेत काय संशोधन/ अभ्यास झाला आहे, चालू आहे हे ही फारसं कधी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचत नाही.
ही सगळी माहिती, यावर काम करणारे तज्ज्ञ यांचा मेळ घालून एक छोटंसं ४ दिवसांचं वर्कशॉप/ कार्यशाळा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि संविद्या सांस्कृतिक अध्ययन संस्था यांनी आयोजित केलं आहे.
मला स्वतःला हा उपक्रम, यामागची संकल्पना मनापासून आवडली म्हणून मी याची तपशीलवार माहिती देण्यासाठी हा धागा उघडलाय. (याची जाहिरात करायचा कुठलाही हेतू यामागे नाही याची कृपया नोंद व्हावी!!) या निमित्ताने पुण्याच्या इतिहासावर, सांस्कृतिक जडणघडणीवर चर्चा झाली तर हवीच आहे. (पुणेकर आणि अ-पुणेकर यांना वाद घालायला आणखी एक आखाडा? :P)

कार्यशाळा: ओळख पुणे आणि परिसराची

वेळः दि. १६ - १७ जुलै व २३ -२४ जुलै २०११ (पूर्ण दिवसभर)

स्थळः: टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,
१२४२, सदाशिव पेठ (खुन्या मुरलीधर मंदिराजवळ)
पुणे - ३०

प्रवेशशुल्कः रु. २०००/ (ज्यांना एकच शनिवार-रविवार जमणार आहे अशांनी व्यवस्थापकांना फोन करावा असं मला व्यवस्थापकांनी सांगितलंय..)

संपर्कः ९४२२०१०७८२; ९४२००८१९६५; ९८८१००९८२६

आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा
व्याख्यानांचे विषय आणि तपशीलः

दि. १६ जुलै:
१. प्रागैतिहासिक पर्यावरण प्रा. डॉ. शरद राजगुरु (माजी सहसंचालक, डेक्कन कॉलेज; आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भूपुरातत्त्वशास्त्रज्ञ/geoarchaeologist)

२. पुणे आणि परिसराची पुरातत्त्वीय ओळख वरदा खळदकर (व्याख्याता, डेक्कन कॉलेज)

३. भौगोलिक पार्श्वभूमी प्रा. डॉ. संजीव नलावडे (भूगोल विभागप्रमुख, फर्ग्युसन कॉलेज)

४. जैववैविधता प्रा. डॉ. संजीव नलावडे

५. पुणे आणि परिसराची ऐतिहासिक पार्श्वभूमी आनंद कानिटकर (हेरिटेज कन्सल्टंट व अभ्यासक)

दि. १७ जुलै:

१. पुण्यातील मराठी साहित्यिक आणि संस्था प्रा. विद्यागौरी टिळक (प्राध्यापिका, मराठी विभाग, पुणे विद्यापीठ)

२. पुणे आणि परिसरातील प्राचीन कलावशेष डॉ. मंजिरी भालेराव (विभागप्रमुख, भारतीय विद्या विभाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ; प्राचीन कला, स्थापत्य, पुराभिलेख तज्ज्ञ)

३. पुणे शहराचा विकास श्री. पांडुरंग बलकवडे, इतिहाससंशोधक, भारत इतिहास संशोधक मंडळ

४. पेशवाईतील प्रशासनव्यवस्था श्री. पांडुरंग बलकवडे

दि. २३ जुलै:

१. नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात पुण्याचे योगदान श्री. प्रसाद वनारसे (डीन, नाट्यविभाग, फ्लेम)

२. एकोणिसाव्या शतकातील पुणे प्रा. डॉ. राजा दीक्षित (इतिहास विभागप्रमुख, पुणे विद्यापीठ)

३. प्रबोधन आणि स्वातंत्र्यसंग्राम प्रा. डॉ. राजा दीक्षित

४. पुणे आणि परिसरातील मध्ययुगीन स्थापत्य साईली पलांडे-दातार (इतिहाससंशोधक)

५. पुण्याचे शास्त्रीय नृत्याच्या क्षेत्रातील योगदान श्री. परिमल फडके (नर्तक)

दि. २४ जुलै:

१. पुण्यातील संस्कृतविद्येची परंपरा प्रा. डॉ. श्री. शं. बहुलकर (माजी संस्कृतविभाग प्रमुख, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ; मुख्य संपादक, दुर्मिळ बौद्ध हस्तलिखित संशोधन विभाग, केन्द्रीय तिबेटी अध्ययन विद्यापीठ, सारनाथ, वाराणसी; अथर्ववेद आणि बौद्ध तांत्रिक साहित्य या विषयातील जागतिक कीर्तीचे विद्वान)

२. पुण्यातील संशोधनसंस्था: इतिहास आणि कार्य डॉ. श्रीनंद बापट (असिस्टंट क्यूरेटर, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर)

स्वातंत्र्योत्तर पुणे श्री. विजय परांजपे (पर्यावरण, जलसंपदा आणि शहरविकास तज्ज्ञ)

४. पुणे आणि सांगितिक परंपरा डॉ. अंबरीष खरे (संगीतज्ज्ञ, संस्कृतज्ञ)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

कार्यक्रमाला यायला आवडले असते, पण जमणारे नाहीये. वरदा, इथे तुम्ही जसजसे कार्यक्रम होतील, तसतसे कार्यक्रमांबद्दल अधिक लिहाल का?

रैनाला अनुमोदन
पण खरच खूप छान कार्यक्रम आहे. व्यावसायिक अडचणींमुळे जमणार नाही याचं मनापासून वाईट वाटतंय.... खूप चांगलं असं मिसलं Sad